Thursday, July 18, 2019

अर्धापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे रविवारी उद्घाटन



            नांदेड, दि. 18 :- अर्धापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांचे हस्ते रविवार 21 जुलै 2019 रोजी सकाळी 10.30 वा. संपन्न होणार आहे.
            मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती किशोर सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया राहणार आहे. अर्धापूर अभिवक्ता संघाचे किशोर देशमुख, अर्धापूर येथील दिवाणी न्यायाधीश क स्तर मयूरा यादव यांची उपस्थिती राहील, अशी माहिती प्रबंधक जिल्हा न्यायालय नांदेड यांनी दिली आहे.
000000

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा



            नांदेड, दि. 18 :- राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            शुक्रवार 19 जुलै 2019 रोजी सकाळी 10 वा. माहूर तालुक्यातील रामनगर तांडा येथील डॉ. गणेश उकंडराव जाधव यांचे आईचे निधनामुळे त्यांचे कुटूंबियांची सांत्वनपर भेट. दुपारी 12 वा. शासकीय वाहनाने दारव्हा जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.
00000


प्रज्ज्वला योजनेतून महिलांचे सक्षमीकरण 
- प्रज्वला समितीच्या अध्यक्षा दिपाली मोकाशे

            
नांदेड, दि. 18:- प्रज्ज्वला योजनेतून महिलांचे शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक,राजकीय सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन प्रज्ज्वला समितीच्या अध्यक्षा श्रीमती दिपाली मोकाशे यांनी केले.  
            येथील स्टेडियम परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आज आयोजित महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने प्रज्ज्वला योजनेतंर्गत बचतगटांचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. यावेळी  महापौर श्रीमती दिक्षाताई धबाले, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, बालकल्याण समितीच्या उपसभापती डॉ. अरशया कोशर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, मनपा आयुक्त लहुराज माळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र रोटे, गुरुप्रितकौर सोडी, दिलीप कंदकुर्ते अदिंची यावेळी उपस्थिती होती.   
            
श्रीमती मोकाशे म्हणाल्या की, बचत गटातील महिलांमध्ये आर्थिक सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी प्रज्ज्वला योजनेतंर्गत प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. या योजनेतून “एक जिल्हा, एक वस्तू असे क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहे. यातून प्रत्येक जिल्ह्याला एक ओळख आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यात बचतगटांच्या उत्पादनांना शाश्वत बचतगट बाजार जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन असल्याचेही श्रीमती मोकाशे यांनी सांगितले.
            महिलांसाठी विविध कायदे आहेत, त्या कायद्याची माहिती व्हावी, त्याचबरोबर महिलांसाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येतात. या योजनांचा त्यांना लाभ घेता यावा, यासाठी या प्रज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम बचतगटांसाठी आयोजित केलेले आहे. तसेच बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मार्केटींग, विक्री करण्यासाठी शहरात जागा, अशा पध्दतीने काम केले जात आहे.
            जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव राजेंद्र रोटे म्हणाले की, कायदेविषयक माहिती महिलांनी घेणे आवश्यक आहे. महिलांनी कायद्याची माहिती करुन घेणं आणि महिलांच्या कायद्याची जनजागृती होणे आवश्यक आहे, असे ही श्री. रोटे यांनी सांगितले.
            
मनपा आयुक्त लहूराज माळी म्हणाले की, शासकीय योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देवून या प्रशिक्षणाचा बचत गटांच्या महिलांनी घ्यावा, असेही मनपा आयुक्त श्री. माळी यांनी सांगितले.
नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल म्हणाले की, महिलांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हायला हवी. महिलांनी सदैव सक्षम व्हावं, अशीही श्री. मुत्याल यांनी अपेक्षा व्यक्त केली.
            बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित वस्तूंची बाजारपेठ, त्यासाठी विक्री व्यवस्था, विविध योजनांचा  त्याचा लाभ घेण्यासाठी करावयाची कार्यवाही आदिंची तपशीलवार माहिती दिली. राज्य महिला आयोगाने प्रकाशित केलेल्या सखी संवाद, कायदे तुमच्यासाठी, प्रज्ज्वला या पुस्तिकांचे वाटप बचत गटाच्या महिलांना करण्यात आले.
            या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा समन्वयक माधव डोम्पले, आभार महाराष्ट्र महिला आयोगाच्या जनसंपर्क अधिकारी कपालिनी सिनकर प्रास्ताविक केले तर जिल्हा संरक्षण अधिकारी गणेश जोंधळे यांनी आभार मानले. 
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...