Monday, January 1, 2024

 वृत्त क्रमांक 4 

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेचे अर्ज

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- केंद्रवती अर्थसंकल्प (न्यक्लिअस बजेट) योजना सन 2022-23 व 2023-24 वर्षाच्या गट अ निहाय या कार्यालयास प्राप्त निधीच्या, मंजूर प्रारूप आराखड्याच्या अधिन राहून वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अर्ज 4 जानेवारी पासून सकाळी 9.45 ते 19 जानेवारी 2024 रोजी सायं. 6.15 वाजेपर्यत नांदेड जिल्ह्यातून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे मागविण्यात आले आहे.

 

या योजनांची यादी व योजनानिहाय अर्ज प्रकल्प कार्यालय, किनवट येथील सेवायोजन कक्षात उपलब्ध आहेत. वैयक्तीक लाभाच्या योजना या अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी 85 टक्के अनुदानावर ताडपत्री, फवारणी स्प्रे-पंप, तारकुंपन (काटेरी तार), बोअरवेल, तुषार सिंचन, ठिंबक सिंचन, शेळी गट (3 शेळी व 1 बोकड) खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे व 100 टक्के अनुदानावर अदिम (कोलाम) जमातीच्या लाभार्थ्यासाठी ताडपत्री, फवारणी, स्प्रे-पंप, तारकुंपन, बोअरवेल या योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी सदर लाभार्थ्याकडे अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र, शेती विषयक योजनेसाठी सातबारा दाखला व योजनेच्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.

 

लाभार्थ्यांनी अर्ज केला म्हणजे त्यांना योजनेचा लाभ मिळेल असे नसून शासनाकडून प्राप्त झालेल्या लक्षांक, निधी व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता विचारात घेवून निवड समितीद्वारे लाभार्थी निवड करण्यात येईल. पात्र व ईच्छूक लाभार्थ्यांनी या योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केले आहे.

0000  

वृत्त क्रमांक 3

 सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी

हदगाव येथे 3 जानेवारी रोजी मेळावा

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवार 3 जानेवारी 2024 रोजी पंचायत समिती सभागृह, हदगाव येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या मेळाव्यात कर्ज मंजुरी प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावेअसे कळविले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2023-24 नांदेड जिल्हयास एकु 900 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे.

मेळाव्यास येताना आधार कार्ड. पॅन कार्ड,रहिवासी दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,दोन फोटो,व्यवसायाचा प्रकल्प अहवाल,जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.  ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 2

 मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा योजनेला

10 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ  


नांदेड, (जिमाका) दि. 1:-  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबतची योजना शासनाने सुरु केली असून शासन निर्णयान्वये योजनेच्या अटी व शर्ती निश्चित केलेल्या आहेत. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 10 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 


या योजनेंतर्गत इच्छूक लाभार्थ्यांचे प्रस्ताव विहित नमुन्यात व शासन निर्णयातील अटीशर्तींची पूर्तता करुन घेऊन पात्र बचतगटांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास 29 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख दिली होती. परंतु विविध संघटनांनी दिलेली तारीख पुन्हा वाढवून मिळण्याबाबत विनंती केल्याने 10 जानेवारी 2024  पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहेअसे समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्रमांक 1

 श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन

कृषि विभागामार्फत कृषिनिष्ठ पुरस्काराचे होणार वितरण

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- श्रीक्षेत्र माळेगांव यात्रेनिमीत्त जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत माळेगांव येथे भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात फळेभाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व भाजीपाला प्रदर्शन स्पर्धाचे आयोजन केले आहे. तसेच 10 जानेवारी 2024 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण कृषि प्रदर्शनाचे उदघाटन व डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहेअसे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय बेतीवार यांनी कळविले आहे.

 

जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत यात्रेच्या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील फळे, मसाला पिके व भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फळे, भाजीपाला व मसाला पिकांचे उत्कृष्ठ नमुने आणून ठेवावेत. प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके, भाजीपाल्याच्या नमुन्यास प्रत्येक वाणातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येईल.  विजेत्या शेतकऱ्यांना रोख बक्षिस व प्रमाणपत्रही देण्यात येईल.

 

डॉ. शंकरराव चव्हाण कृषि प्रदर्शनात एकूण 130 स्टॉलचे नियोजन केले आहे. त्यामध्ये बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपनी, रासायनिक खते उत्पादन करणाऱ्या कंपनी, किटकनाशक औषधे उत्पादन करणाऱ्या कंपनी, ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या कंपनी, शेती उपयोगी औजारे उत्पादन करणाऱ्या कंपनी, सेंद्रीय उत्पादने करणारे शेतकरी, महिला बचत गट , आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण, समाज कल्याण, तसेच कृषी विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग महाराष्ट्र शासन, महाबीज, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, खादी ग्रामोद्योग इत्यादी विविध प्रकारचे स्टॉल्स प्रदर्शनात असणार आहेत.

 

जिल्हास्तरीय फळे,भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यात प्रथमद्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना अनुक्रमे 4 हजार रुपये, 3 हजार रुपये व 2 हजार रुपये याप्रमाणे बक्षीस देण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पुरस्कार समारंभासाठी उपस्थित राहावे व पाच दिवस चालणाऱ्या कृषि प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने केले आहे.

0000

 

दि. 29 डिसेंबर 2023 वृत्त क्र. 911

 थेट कर्ज योजनेतील लाभार्थी निवड

5 जानेवारी रोजी लॉटरी पध्दतीने होणार

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेड यांच्यामार्फत प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये केवळ थेट कर्ज योजनेअंतर्गत 10 जुलै ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत कर्ज मागणी अर्ज स्विकारण्यात आले आहेत.

 

या कर्ज प्रकरणांची ईश्वरी चिठ्ठी (लॉटरी) द्वारे निवड करण्यासाठी अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड तथा ईश्वर चिठ्ठी समिती यांनी दिलेल्या मान्यतेनुसार चिठ्ठीद्वारे लॉटरी पध्दतीने निवड करावयाची आहे. त्यासाठी 5 जानेवारी 2024 रोजी ठिक सकाळी 12 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृह, ग्यानमाता शाळेसमोर, नांदेड येथे अध्यक्ष लाभार्थी निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी अर्जदारांनी या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे. पात्र अर्जदारांची यादी महामंडळाच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

 

या योजनेअंतर्गत एकूण 71 अर्ज मागणी अर्ज प्राप्त झाले आहेत. हे सर्व कर्ज प्रस्ताव जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती समोर सादर केले असता त्यापैकी 71 अर्ज मागणी अर्ज पात्र आहेत. मागील वर्षातील उदिष्टा अभावी असलेले 311 कर्ज प्रस्ताव असे एकूण 382 पात्र प्रस्ताव आहेत.

00000  

दि. 29 डिसेंबर 2023 वृत्त क्र. 910

अन्नसुरक्षा अभियानांतर्गत घरगुती साठवणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्यव पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत घरगुती साठवणुकीची कोठी (प्रती शेतकरी क्विंटल क्षमता मर्यादेतया घटकांचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (अर्जामधील अटींची पुर्ततेसहतालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे  यांनी केले आहे.

 

अनुसूचित जातीजमातीमहिला शेतकरीअल्प व अत्यल्प भुधारक इतर शेतकरी पात्र असतील. क्विंटल साठवणूक क्षमतेच्या कोठीसाठी किंमतीच्या 50 टक्के किंवा रूपये 2 हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान दर लागु असेलतसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लकी ड्रॉ पध्दतीचा अवलंब केला जाईलया घटकाची खरेदी झाल्यानंतर शेतकरीशेतकरी प्रतिनिधी समवेत अक्षांश व रेखांशासह फोटो घेतल्यानंतर तपासणी करुन लाभार्थ्यांना डी.बी.टीपध्दतीने त्यांच्या बँक खातेवर अनुदान देण्यात येईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

दि. 29 डिसेंबर 2023 वृत्त क्र. 909

 अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :-  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथनिराधारनिराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षापर्यंत निवाऱ्याची आवश्यकत असणाऱ्या निराधारविधवाकुमारी मातापरित्यक्ताअत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्नवस्त्रनिवारासमुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते.

 

तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना मानसिकसामाजिकआर्थिकशैक्षणिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठीपुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गाने न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याचा लाभ घ्यावा. प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी ते यावेळेत अधिक्षक माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 येथे संपर्क साधावाअसे आवाहन शासकीय महिला राज्यगृहचे अधीक्षक वर्ग-एस. एम. पुजलवार यांनी केले आहे.

00000 

दि. 29 डिसेंबर 2023

 वृत्त क्र. 908


सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सोमवारी भोकर व हिमायतनगर येथे

आणि मंगळवारी किनवट व माहूर येथे मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 29 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी  सोमवार 1 जानेवारी 2024  रोजी  पंचायत समिती सभागृह  भोकर  पंचायत समिती सभागृह हिमायतनगर आणि मंगळवार 2 जानेवारी  2024 रोजी पंचायत समिती सभागृह  किनवट व पंचायत समिती सभागृह  माहूर येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या मेळाव्यात कर्ज मंजुरीचे प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावे, असे कळविले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2023-24 नांदेड जिल्हयास एकु 900 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. 

मेळाव्यास येताना आधार कार्डपॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने  ही आवश्यक  कागदपत्रे सोबत आणावीत.  ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

000000

दि. 29 डिसेंबर 2023

वृत्त क्र. 907

गुणवत्तापूर्ण कामे करणे ही सुद्धा देशसेवा

 - कर्नल मनकंवल जीत 

§  पर्वत से सागर तिरंगा’ या साहसी अभियानात आज चार छोटी विमाने नांदेड विमानतळावर

नांदेड (जिमाका) दि. 29 :- बॉम्बे सैपर्स युध्द स्मारक शताब्दी आणि कारगिल विजयाच्या 25 व्या वर्षानिमित्त पर्वत से सागर तिरंगा’ हे साहसी अभियान भारतीय सैन्याच्या शौर्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी हाती घेतले आहे. या अभियानाअंतर्गत नांदेड विमानतळावर अनुभवी वैमानिकांनी आज चार छोटी विमाने उतरविली. कारगिल युध्दात शहीद झालेल्या जवानांचे शौर्य व त्यागाची माहिती नवीन पिढीपर्यत पोहोचावी तसेच युवा वर्गाने अशा अभियानापासून प्रेरणा घेवून देशसेवेसाठी गुणवत्तापूर्ण काम करण्यातच देशसेवा असल्याचे प्रतिपादन कर्नल मनकंवल जीत यांनी केले.

राष्ट्रीय सैन्य माइक्रोलाइट अभियानांतर्गत आज मायक्रोलाइट विमानाचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी लेफ्टनंट कर्नल एबी टीएमलेफ्टनंट कर्नल जितेंद्र सिवाचनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरअपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमारउप विभागीय अधिकारी विकास मानेविमानतळ सुरक्षा अधिकारी बोरगावकरकॅप्टन संघमित्रा राईमेजर गरिमा पुनियानीकॅप्टन प्रियदर्शनी के आदींची उपस्थिती होती. राष्ट्रप्रेमाची भावना वृध्दीगत व्हावी तसेच नव्या पिढीला देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाचे शौर्य याबाबतची माहिती व्हावी या उद्देशाने भारतीय सैन्याच्यावतीने काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत चार माइक्रोलाईट विमानाने माइक्रोलाइट अभियान 2023-24 सुरु करण्यात आले आहे. या अभियानात ही विमाने काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यत एकूण हजार 500 किमीचा प्रवास पार करतील. या अभियानाच्या माध्यमातून साहसाचे व सांघिक कामाचे प्रदर्शन होणार आहे. हे अभियान देशाच्या प्रादेशिक विविधता आणि सुंदरतेचे प्रतिक असल्याचे कर्नल मन कंवलजीत यांनी सांगितले.

विमानाचे वैमानिक राष्ट्रीय व सैन्य ध्वजाला गर्वाने अवकाशात फडकवणार आहेत. सैन्याचे हे अभिनव अभियान असून यापूर्वी कधीही असे अभियान झालेले नाही. भारतीय सैन्य माइक्रोलाइट अभियानात ही विमाने एकूण 37 ठिकाणी थांबणार असून 37 दिवसांचा प्रवास करणार आहे. हे अभियान महुपासून सुरु झाले असून आज या विमानाचे अमरावती येथून नांदेड विमानतळावर आगमन झाले आहे. नांदेड विमानतळावरुन ही माइक्रोलाइट विमाने उद्या बिदरकडे प्रस्थान करणार असल्याचे भारतीय सैन्याचे कर्नल मन कंवलजीत यांनी सांगितले.

00000




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...