Wednesday, March 3, 2021

 जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 5 मार्चला

नांदेड (जिमाका) दि. 3:- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार 5 मार्च 2021 रोजी दुपारी 1 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृहजिल्हा परिषदनांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.

00000

                                                      नांदेड जिल्ह्यात 69 व्यक्ती कोरोना बाधित तर

       1 हजार 474 अहवालापैकी 1 हजार 385 निगेटिव्ह  

नांदेड (जिमाका) दि. 3 :- बुधवार 3 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 69 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 19 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 50 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  50 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

 

आजच्या 1 हजार 474 अहवालापैकी 1 हजार 385 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 906 एवढी झाली असून यातील 22 हजार 435 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 655 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 20 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 602 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 19देगलूर कोविड रुग्णालय 2खासगी रुग्णालय 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, किनवट कोविड रुग्णालय 2, हदगाव कोविड रुग्णालय 2 असे एकूण 50 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 93.85 टक्के आहे.  

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 6, हिमायतनगर तालुक्यात 2मुदखेड 1किनवट 7, लोहा 1, हिंगोली 2 असे एकुण 19  बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 30, अर्धापूर तालुक्यात 1माहूर  2मुखेड 2, किनवट 7, नांदेड ग्रामीण 1, देगलूर 2 , मुदखेड 1, लोहा 3, धुळे 1 असे एकूण 50 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 655 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 43, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 77, किनवट कोविड रुग्णालयात 24, मुखेड कोविड रुग्णालय 7, हदगाव कोविड रुग्णालय 6, महसूल कोविड केअर सेंटर 52, देगलूर कोविड रुग्णालय 9, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 256, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 105, खाजगी रुग्णालय 76 आहेत.  

 

बुधवार 3 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 142, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 28 एवढी आहे.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 33 हजार 961

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 5 हजार 758

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 906

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 435

एकुण मृत्यू संख्या-602                           

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 93.85 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-13

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-188

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-655

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-20.    

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...