Thursday, February 15, 2024

 वृत्त क्र. 135 

महिलांसाठी शनिवार 17 फेब्रवारी रोजी विशेष रोजगार मेळावा  

 

·   बेरोजगार महिला उमेदवारांनी सहभाग नोंदवावा

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांसाठी शनिवार 17 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार महिला उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरीता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 10 वा. रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

 

या रोजगार मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध नामांकित कंपन्यांनी आपली रिक्तपदे अधिसूचीत केली आहे. नांदेड जिल्हयातील ज्या काही इतर आस्थापनांना रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे अशा आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आपली रिक्तपदे अधीसूचीत करावीत. याबाबत काही अडचण आल्यास 8830807312 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

महास्वयम पोर्टलवर या कंपन्यांनी आपली रिक्त पदे अधिसूचीत केली

मधुरा मायक्रो फायनान्स लि. नांदेड या कंपनीत ट्रेनी केंद्र मॅनेजरच्या एकुण 10 पदासाठी बारावी / पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी वेतन 8 हजार रूपये असेल तर नोकरीचे ठिकाण नांदेड राहील.  

 

परम स्किल छत्रपती संभाजीनगर कंपनीत ट्रेनीच्या एकुण 150 पदासाठी दहावी/बारावी/आटीआय/पदवी उत्तीर्ण असावे लागेल. या पदासाठी 17 हजार रूपये वेतन असून नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर राहील.

 

धृत ट्रान्समीशन छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीत ट्रेनी ऑपरेटरच्या 500 पदासाठी दहावी/बारावी/आटीआय/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी वेतन 12 हजार 500 रूपये असून नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर असेल.

 

एल.आय.सी.ऑफ र्इंडिया नांदेड येथे इन्शुरन्स अॅडव्हायझरच्या 83 पदे असून दहावी/बारावी/पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. या पदासाठी 15 हजार रूपये वेतन असून नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी नोकरीचे ठिकाण राहील.

 

श्री जगदंबा सेंद्रीय कृषी सेवा केंद्र हदगाव येथे सेल्स एक्सुकेटिव्ह पदाच्या 15 जागेसाठी पदवी व संगणक शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 7 हजार रूपये वेतन दिले जाईल. हदगाव येथे नोकरीचे ठिकाण असेल.

 

कैलास फर्टिलायझर नांदेड येथे डाटा ऑपरेटरच्या 20 पदासाठी दहावी/बारावी/पदवी/संगणक शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 8 हजार रूपये वेतन असून नोकरीचे ठिकाण नांदेड असेल.

 

नवकिसान बायोप्लॅनटेक नांदेड कंपनीत फ्रंट ऑफिस एक्सुकेटिव्ह एका पदासाठी दहावी/बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 10 हजार रूपये वेतन असून नोकरीचे ठिकाण नांदेड असेल.

 

तिरूमला इंडस्ट्रीयल ॲन्ड अलायड सर्व्हिसेस लि. पुणे या कंपनीत ट्रेनी/ज्युनीयर मॅनेजमेंटच्या 100 पदांसाठी बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. वेतन 10 हजार रूपये असून पुणे, शिरूर, रांजणगाव येथे नोकरीचे ठिकाण असेल.  

 

ज्युट्रीविडा न्युट्रॉस्युटिकल प्रा. लि. संभाजीनगर या कंपनीत मेडिकल रिप्रेजेंटेटिव्ह या  पदासाठी 2 जागा असून शिक्षण पदवी आवश्यक आहे. वेतन 15 हजार रूपये दिले जाईल. या पदासाठी नोकरीचे ठिकाण नांदेड, छत्रपती संभाजीनगर असेल.

 

सालासार सेल्स कॉर्पोरेशन नांदेड कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटरच्या 30 पदासाठी दहावी/बारावी/पदवी/पदविका शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 9 हजार रूपये वेतन आहे. नोकरीचे ठिकाण नांदेड राहील.

 

क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि. पुणे कंपनीत ट्रेनी केंद्र मॅनेजरच्या 100 पदासाठी बारावी/पदवी/पदविका शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 8 हजार रूपये वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण नांदेड राहील.

 

संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी येथे शिक्षिका 3 तर अधिक्षिका 1 पदासाठी बीए/बीएड/एमए/एमएससी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 15 हजार रुपये वेतन असेल. नोकरीचे ठिकाण सगरोळी, नांदेड राहील.

 

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कॉ.लि. नांदेड येथे ॲडव्हायजर असेट अलोक्टेड मॅनेजरच्या 50 + 20 जागा असून दहावी/बारावी/पदवी/पदविका शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 8 हजार रूपये वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण नांदेड असेल.

 

CAIT Edusys pvt ltd pune येथे अप्रेंटिस ट्रेनीच्या 150 पदासाठी दहावी/बारावी/आयटीआय शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 14 हजार 500 रुपये वेतन असेल. नोकरीचे ठिकाण पुणे राहील.

 

डोमिनोज पिज्जा नांदेड येथे ऑपरेटरच्या 5 पदांसाठी दहावी/बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 10 हजार रूपये वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण नांदेड असेल.

 

भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि. नांदेड येथे फिल्ड ऑफीसरच्या 50 पदासाठी दहावी/बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 14 हजार 250 वेतन असेल. नोकरीचे ठिकाण नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली असेल.

ज्र्युक्लीयस टेक्नॉलॉजी नांदेड येथे मार्केटिंग एक्सुकेटिव्हच्या 20 पदासाठी दहावी/बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 10 हजार रूपये वेतन असेल तर नोकरीचे ठिकाण नांदेड राहील, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000


 वृत्त क्र. 134

सैनिक कल्याण विभागातील सरळ सेवेच्या

पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 15 :-जिल्हा सैनिक कल्याण विभाग व अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेतील गट-क पदे भरण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी वेब बेस्ड www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट टँबवर 3 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. त्यानंतर वेबलिंक बंद होईल यांची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

सैनिक कल्याण विभाग व अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सरळसेवेची पदे पुढीलप्रमाणे भरण्यात येणार आहेत. कल्याण संघटक-40, वसतिगृह अधीक्षक 17, कवायत प्रशिक्षक 1, शारिरीक प्रशिक्षण निदेशक 1, गट क या पदासाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षीका गट क 3 या पदासाठी भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पुर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवाराकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील पदापैकी 1 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारी चा विचार करुन गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. ही भरती प्रक्रिया  टिसीएस-आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन स्विकारण्यात येणार आहेत इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत यांची नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 वृत्त क्र. 133

जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्हा रुग्णालयात १३ फेब्रुवारी  रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन राबविण्यात आला. या मोहिमेचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एच.के.साखरे, डॉ. पुष्पा गायकवाड हे उपस्थित होते. या मोहिमेच्या माध्यमातुन जंताच्या प्रादुर्भावामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात याविषयी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर १ वर्ष ते १९ वर्ष वयोगटातील बालकांना अल्बेंडाझोल (जंतनाशक) गोळी खाऊ घालण्यात आली. या दिवशी गैरहजर असलेल्या बालकांना  २० फेब्रुवारी २०२४ रोजी मॉप अप दिनी अल्बेंडाझोल (जंतनाशक) गोळ्या देण्यात येणार आहेत. तरी सर्व बालकांनी  अल्बेंडाझोल (जंतनाशक) गोळी खावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 132

 

इयत्ता 10 व 12 वीच्या परीक्षेत

गैर प्रकार केल्यास गय केली जाणार नाही

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी, 12 वीच्या सन 2024 परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत असून सर्व केंद्रावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. याबाबत तक्रार निवारण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. या परीक्षा सुरळीत होण्यासाठी सर्वांनी सकारात्मकतेने काम करावे. या परीक्षेत गैरप्रकार केल्यास कोणतीही गय केली जाणार नाहीअसे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे.

 

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक परीक्षा इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व गटशिक्षणाधिकारीविस्तार अधिकारीकेंद्रप्रमुखपरीक्षकप्राचार्यमुख्याध्यापक,‍ संस्था प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक नुकतीच कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालपोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटेलातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंगप्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदीची उपस्थिती होती. उत्तीर्ण होण्यासाठी गैरप्रकार अथवा कॉपी करणे हा पर्याय नाही. यासाठी शिक्षकविद्यार्थी व पालक यांनी एकत्रित सामंजस्याने विचार करुन अभ्यासाला द्यावे. उत्तीर्ण होण्यासाठी जास्त मेहनतीची आवश्यकता नसूनप्रॅक्टीकलचे गुण सोडले तर केवळ 15 गुणांची आवश्यकता उत्तीर्ण होण्यासाठी आहे. यासाठी अभ्यासाचे चांगले नियोजन केल्यास कॉपी करण्याची अथवा गैरप्रकार करण्याची गरज भासणार नाही असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. 


कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार होणार नाही व अनावश्यक जमाव दिसणार नाहीयाची दक्षता घ्यावी. यासाठी परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरावर 100 टक्के बंदी घालावी. कारण सध्याच्या काळात याच कारणाने मोठया प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे यावर्षीची परीक्षा ही भयमुक्त व कॉपी मुक्त वातावरणात होईल या दृष्टीने सर्वांनी नियोजन करावे. मुख्याध्यापककेंद्रसंचालकसंस्था प्रतिनिधी यांनी गैरप्रकाराला कोणत्याही प्रकारे समर्थन देवू नयेतसे आढळल्यास त्यांचे विरुध्द कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावीअसेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 


मागील वर्षी ज्याठिकाणी अनुचित प्रकार घडलेमोठया प्रमाणावर जमाव होता अशा केंद्रावर आम्ही अधिकची कुमक तैनात करणार आहोत. परीक्षार्थ्यांकडे परीक्षेच्या साहित्या व्यतिरिक्त अनावश्यक साहित्य असल्यास ते त्वरीत जप्त करावे. याबाबत काही अडचण आल्यास त्वरीत नजीकच्या पोलीस स्टेशनशी केंद्रावरील पोलीस कर्मचा-यांच्या मदतीने संपर्क साधावा. पोलीस प्रशासन पुर्णपणे सहकार्य करेल असे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या सांगितले कीयावर्षी पाणी वाटप करण्यासाठी वॉटर बॉय ठेवण्यात येणार नाहीभरारी पथकाच्या सदस्यांना ओळखपत्र देण्यात येतीलकॉपीला संपूर्णपणे आळा घालण्याची जबाबदारी ही आपल्या शिक्षण विभागाची आहे. त्यामुळे आपण सर्वांनी कॉपीला व गैरप्रकाराला संपूर्णपणे आळा घातला पाहिजे. मागील वर्षी पुरवणी परीक्षेला लातूर विभागाचा निकाल राज्यात चांगला लागला. परंतु यावर्षी एकाही विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेला बसण्याची आवश्यकता भासणार नाही यासाठी सर्व शिक्षकांनी अध्यापन उत्कृष्ट करण्याचा निर्धार करावा. परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास जिल्हा शिक्षण विभाग व मंडळ कार्यालयाचे संपर्कात नेहमी रहावे. यावर्षीची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात घ्यावी असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी केले. 


मुख्याध्यापक संघाचे विभागीय अध्यक्ष संजय शिप्परकर यांनी सर्वाच्या वतीने यावर्षीची परीक्षा ही कॉपीमुक्त वातावरणातच होईल याची ग्वाही दिली. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

0000





वृत्त क्र. 131

 चित्तथरारक,रोमहर्षक शिवकालीन

साहसी क्रीडा प्रकाराने महासंस्कृती महोत्सवाला प्रारंभ

·         शुक्रवार पासून तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- राज्यात सुरू असलेल्या सांस्कृतिक महोत्सवातील एक अभिनव सुरुवात नांदेड जिल्ह्यातून आज झाली आहे. राज्याच्या संस्कृतीला उजागर करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला नांदेड जिल्हा प्रशासनाने शिवकालीन साहसी क्रीडा प्रकाराची जोड दिली. मैदानाशी संबंध तुटलेली पिढी या चित्तथरारक रोमहर्षक क्रीडा प्रकाराला बघून स्तिमित झाली. आजपासून पुढील पाच दिवस क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नांदेडकरांना अनुभवायला मिळणार आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महासंस्कृती महोत्सव आजपासून सुरू झाला आहे. आज सकाळी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवकालीन पारंपारिक खेळाच्या स्पर्धांनी या आयोजनाची सुरुवात झाली. यात खो-खोकबड्डीलेझीमकुस्तीमल्लखांबआटयापाटयालाठीकाठीरस्सीखेचगतकालगोरी या खेळाच्या आकर्षक प्रात्यक्षिकांने उपस्थितीतांचे लक्ष वेधून घेतले. मोठ्या संख्येने शाळकरी मुले यावेळी उपस्थित होती. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊतपोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटेनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरउपविभागीय अधिकारी विकास मानेजिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडेशिवछत्रपती पुरस्कार विजेते एस.एम. पटेलअभिनेता शुशांत शेलार आणि पारंपारिक खेळाचे जिल्हा प्रतिनिधीखेळाडूप्रशिक्षक आदी मान्यवरांची उपस्थिती होती. खो -खोकबड्डीलेझीमकुस्तीमलखांबआट्यापाट्याघुंगुर- काठीलाठी-काठीरस्सीखेच गतका,लगोरी आदी खेळांच्या संदर्भातील अद्यावत माहिती तसेच या खेळातील निष्णात खेळाडूंची प्रत्यक्ष उपस्थितीत्यांच्याकडून झालेले सादरीकरण लक्षवेधी होते. या सर्व खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळाचे प्रात्यक्षिकच नव्हे तर यांची स्पर्धा असून उद्या दुपारी तीन वाजता क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण होणार आहे.

 

आजचे कार्यक्रम

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदाननवा मोंढा नांदेड येथे उद्या शुक्रवारी सायंकाळी ते रात्री 10 या कालावधीत सुप्रसिध्द सिने व नाटय कलावंताचे बहारदार कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. यात संकल्पना आणि दिग्दर्शन शुशांत शेलार यांचे असून निवेदन संदीप पाठक हे करणार आहेत. तर माधुरी पवारअभिजीत केळकर यांच्या नृत्यांचा कार्यक्रम होणार आहे. ज्ञानेश्वर मेश्राममनीष राजगिरेपद्यनाभ गायकवाड यांच्यासोबत 45 कलाकारांचा संच गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील निमंत्रित प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार असून यात पाटा गायनलोक वाद्यवृंदपारंपारिक मंगळागौरदंडार नृत्यछ. शिवाजी महाराज पोवाडासनईहलगी वादनलोकसंगीतपारंपारिक कोलाम समुह नृत्यलेहंगी नृत्यदिवली लोकनृत्यछ. शिवाजी महाराज दर्शन इ. कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.

 

प्रवेश निःशुल्कपासेसची गरज नाही

 

जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम सामान्यातील सामान्य माणसाने बघावा यासाठी आयोजित केलेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवेशिका या ठिकाणी आवश्यक नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित रहावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

१७ ते १९ काळात विविध आयोजन

 उद्याच्या सांस्कृतिक सोहळ्याच्या सुरुवातीनंतर 17 फेब्रुवारीला आदिमाया आदिशक्ती तर 18 फेब्रुवारीला सिने नाट्य कलावंतांच्या सहभागातील जल्लोष कार्यक्रम होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवा मोंढा नांदेड येथे होतील. याचवेळी नागरिकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावरील प्रदर्शनीय दालनांना भेट द्यावीही विनंती करण्यात आली आहे. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी विविध वस्तू तसेच बचत गटांचे स्टॉल असतील. खानपाणाची देखील अनेक स्टॉल या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिवचरित्रावरील आधारित रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन 18 व 19 फेब्रुवारीला आयटीआय कॉलेजनांदेड येथे दहा ते आठ या कालावधीत होत आहे. सांस्कृतिक मेळाव्याच्या निमित्ताने प्रशासनाने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.


0000















  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...