Friday, January 11, 2019


सामाजिक न्याय राज्यमंत्री
दिलीप कांबळे यांचा दौरा
नांदेड, दि. 12 :  राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
रविवार 13 जानेवारी 2019 रोजी मुंबई विमानतळ येथून विमानाने सकाळी 9 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.15 वा. हेलिकॉप्टरने नांदेडहून हिंगोलीकडे प्रयाण करतील.
000000



ज्येष्ठ माजी सैनिक, विधवांना अनुदान
            नांदेड दि. 11 :- जिल्हयातील वयोवृद्व पात्र माजी सैनिक / विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क साधून या कल्याणकारी निधी योजनेची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार यांनी  केले आहे.
वृद्वाश्रमात वास्तव्यास असलेले तसेच अन्य ठिकाणी उत्पादक कार्य करत असलेल्या जेष्ठ माजी सैनिक, विधवा ज्यांचे जे वय 70 वर्षे वरील आहेत व सध्या वृद्वाश्रम, आधार गृहामध्ये वास्तव्यास आहेत तसेच जे माजी सैनिक, विधवा शासकीय / निमशासकीय कार्यालये, शाळा / कॉलेज, शासकिय वसतिगृहे / विश्रामगृहे इत्यादी ठिकाणी त्यांची  क्षमता व अनुभवानुसार रोज किमान तीन तास सेवा बजावत आहेत अशा माजी सैनिक / विधवा यांना त्यांच्या उत्पादक कार्यातील सहभागापोटी कल्याणकारी निधीतून दरमहा 2 हजार रुपये अनुदान देण्याची शिफारस करण्यात येत आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
00000


व्यवसायकर विशेष नोंदणी अभियान
नांदेड दि. 11 :- महाराष्ट्र व्यवसायकर कायदा 1975 अन्वये नाव नोंदणीकृत व नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, मालकांना व्यवसाय कर नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी व्यवसाय कर विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून विशेष नोंदणी अभियान 14 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2019 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
व्यवसायकर कायद्यांतर्गत नाव नोंदणीकृत व नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तींनी, मालकांनी व्यवसाय कराची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमानुसार व्यवसाय कर अधिकारी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी अथवा परिसराला भेट देणार आहेत. अनोंदीत असल्यास जागेवर नोंदणी करुन घेतली जाणार आहे. तसेच नोंदणीसाठी बाजारपेठ, मॉल, व्यवसाय केंद्रे, औद्योगिक वसाहत या ठिकाणी नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहेत.
त्याबाबतचे ठिकाण तारीख www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबरोबरच वस्तू व सेवाकर कार्यालय, रेल्वे स्टेशन जवळ नांदेड येथे मदत कक्ष उपलब्ध करण्यात येणार आहे. अनोंदीत नाव नोंदणी, नोंदणी करदात्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवसाय कर विभाग नांदेड राज्यकर सहआयुक्त एस. जी. शेख व व्यवसाय कर अधिकारी डॉ. अविनाश चव्हाण यांनी केले आहे.
00000


शिक्षणाची वारीचे आयोजन
नांदेड दि. 11 :-  शिक्षणाची वारीचे आयोजन 16 ते 18 जानेवारी 2019 या कालावधीत चांदोजी पावडे मंगल कार्यालय डिमार्ट जवळ लोकमित्र नगर कॅनाल रोड वाडी बु. नांदेड येथे करण्यात आले आहे. या वारीमध्ये लातूर व औरंगाबाद विभागातील लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड ही सात जिल्हे सहभागी होणार आहेत, असे प्राचार्य तथा समन्वयक जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000


स्व. यशवंतराव चव्हाण
राज्य वाङमय पुरस्कार
नांदेड दि. 11 :- राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार योजनेंतर्गत सन 2018 या वर्षासाठी 1 जानेवारी ते डिसेंबर 2018 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या प्रथम आवृत्ती पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2018 पर्यंत प्रवेशिक मागविण्यात आल्या आहेत. असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ रविंद्र नाट्यमंदीर दुसरा मजला सयानी रोड प्रभादेवी मुंबई- 400025 यांचे पत्रान्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
00000


मुदखेड, अर्धापूर भागातील केळीवर  
थंडीच्या परिणामापास करावयाच्या उपाययोजना
नांदेड दि. 11 :- थंडीमुळे केळीच्या बुंद्यावर तसेच घडाच्या दांड्यावर, पानावर काळपट तपकिरी चट्टे दिसून येतात पाने पिवळे पड वाळण्यास रुवात होते. त्यामुळे केळी पक्व होण्याचा कालावधी 15 ते 30 दिवसांनी वाढतो. थंडीच्या काळात प्रामुख्याने करपा या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात असे आवाहन केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी यांनी केले आहे.
केळी संशोधन केंद्र नांदेडचे प्रा. आर. व्ही. देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. धूतराज तसेच मंडळ कृषि अधिकारी जी. पी. वाघोळे, बी. आर. नेम्माणीवार, कृषि पर्यवेक्षक यु. के. माने, यांनी मुगट, मेंढका, पाटणूर, लोण (खु.) येथे पाहणी रु केळी पिकावर मागील 8 ते 10 दिवसापास तापमाणात होणाऱ्या घटमुळे केळीवर त्याचा विपरीत परिणाम आढळुन येत आहे.
नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयांतर्गत मुदखेड अर्धापूर या तालुक्यात हार्टसॅप     2018-19 केळी पिकाचे सर्वेक्षण किड रोग सल्ला प्रकल्प राबविण्यात येत आहे. या उपाययोजनेत उती संर्वधीत रोपाची लागवड केल्यानंतर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसु लागताच कार्बेन्डॅझीम 50 टक्के (50 WP) 10 ग्रॅम सोबत उत्तम प्रतिचे स्टिकर 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी संपुर्ण बागेवर करावी. रासायनिक खतामध्ये युरिया या खताची मात्रा 25 किलो प्रती एक्कर याप्रमाणे झाडांना विभाग देण्यात यावी. ह्युमिक सीड 25 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.  पिकामध्ये उसाचे पाचट, केळीचे वाळलेले पाने इत्यादी सेंद्रीय पदार्थाचे अच्छादन करावे. त्यामुळे जमिनीचे तापमान टिकून राहते. केळीची लोंबणारी  हिरवी, निरोगी तसेच वाळलेली परंतु रोगाचा प्रादुर्भाव नसलेली  पाने खोडा भोवती लपेटून ठेवावीत. रात्रीच्या वेळेस बागेच्या चोहो बाजुने बांधाच्या कडेवर ओला कचरा जाळुन धुर करावा. बागेस शक्यतो रात्रीच्या वेळेस ठिबक संचाद्वारे पाणी द्यावे. केळीची जास्तीतजास्त हिरवी निरोगी पाने झाडावर ठेवून रोगट पाने काढुन नष्ट करावी. बागेवर प्रोपेकोनेझॉल 0.05 टक्के 0.5 मिली अधिक  मिनरल ऑईल 1 टक्के एक मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आपले होणारे आर्थिक नुकसान टाळावे.
000000


वित्त अणि नियोजन मंत्री
सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा
नांदेड दि. 11 :- राज्याचे वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार हे रविवार 13 जानेवारी 2019 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 13 जानेवारी 2019 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 9 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.15 वा. हेलिकॉप्टरने नांदेडहून हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. हिंगोली येथून हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000


मुख्यमंत्र्यांचा सोमवारी शेतकऱ्यांशी लोकसंवाद
मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार
नांदेड, दि. 11 : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 जानेवारीला लोकसंवाद साधून जाणून घेतली. या लोकसंवादाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यानंतर सोमवार दि. 14 जानेवारीला सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री आणि लाभार्थी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकसंवाद होणार आहे. हा थेट लाईव्ह संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे.
            हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या www.twitter.com/Dev_Fadnavis  या ट्विटर हॅण्डलवर तसेच www.facebook.com/devendra.fadnavis या फेसबुक पेजवर आणि  www.youtube.com/DevendraFadnavis या युट्यूब चॅनलसह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे ट्विटर www.twitter.com/MahaDGIPR www.facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेजसह www.youtube.com/maharashtradgipr या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. त्याशिवाय http://elearning.parthinfotech.in/या लिंकवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी, फळबागा, कांदा चाळ, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, अन्न प्रक्रिया, शेडनेट, पॉली हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांबाबत सातत्याने आढावा घेतला आहे.
००००

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...