Saturday, October 7, 2017

मानार नदीकाठच्या
नागरिकांना सतर्कतेचा इशारा  
नांदेड दि. 7 :-  उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी या धरणाचा जीवंत पाणीसाठा 71.46 टक्के इतका असून पाण्याचा येवा चालू आहे. सद्यस्थितीत अतिवृष्टीचा इशार देण्यात आला असल्यामुळे धरण केंव्हाही भरु शकते. त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी दरवाजे उघडून मानार नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क रहावे, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र. 2 नांदेड यांनी केले आहे. 
त्यामुळे लिंबोटी, डोंगरगाव, हनमंतवाडी, चोंडी, दगडसांगवी, मजरेसांगवी, बोरी खुर्द, उंबरज, संगमवाडी, कोल्ह्याची वाडी, शेकापूर, अंबेवाडी, जंमलवाडी, बाळंतवाडी व घोडज या नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहून गुरे-ढोरे व इतर मालमत्ता सुरक्षीत राहील यादृष्टिने उपाययोजना करावी. तसेच लोहा तालुक्यातील उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी या धरणाचे जलाशय खोल असल्यामुळे जलाशयात कोणीही पोहण्यास जाऊ नाही, असेही आवाहन उपकार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र. 2 नांदेड यांनी केले आहे.

000000
जागतिक आपत्‍ती निवारण दिवस
13 ऑक्टोबरला साजरा करावा
नांदेड दि. 7 :- संयुक्‍त राष्ट्रांनी घोषित केल्‍यानुसार महाराष्ट्र शासनाने 13 ऑक्‍टोबर हा दिवस "जागतिक आपत्‍ती धोके निवारण" दिवस म्हणुन साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. जगभर हा दिवस आपत्‍ती धोके निवारणासंबंधी जनजागृती करुन व यासंबंधी निरनिराळे उपक्रम राबवुन साजरा करण्‍यात येतो.
जिल्‍हयातील सर्व शाळा, कॉलेजमध्‍ये या आठवडयात निबंध स्‍पर्धा, चित्रकला स्‍पर्धा, पथनाटय इत्‍यादी कार्यक्रम आयोजित करावयाचे निर्देश आहेत. दि. 8 सप्टेंबर 2017 रोजीच्या शासन परिपत्रकातील निर्देशाप्रमाणे जिल्‍हयातील सर्व शैक्षणिक संस्‍था, शाळा महाविद्यालये, महानगरपालिका व जिल्‍हा परिषद शिक्षण विभाग यांनी  9 ते 13 आक्‍टोबर 2017 या कालावधीत निबंध स्‍पर्धा, चित्रकला स्‍पर्धा, पथनाटय, इत्‍यादी कार्यक्रम आयोजित करावीत. तसेच प्रादेशिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रभाग, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, पोलीस जलदकृती दल, अग्निशमन व आणिबाणी सेवा यांची संयुक्‍त रंगीत तालिम या कालावधी दरम्‍यान जनतेसाठी जनजागृती करण्यासाठी  आयोजित करावीत. आपत्‍ती व्‍यवस्‍थापन संबंधी जनजागृती साहित्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन शाखा जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.  

000000
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचा दौरा
नांदेड दि. 7 :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 8 ऑक्टोंबर 2017 रोजी मुंबई येथुन शासकीय विमानाने श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे सकाळी 8.55 वा. आगमन व राखीव. सकाळी 9.05 वा. शासकीय हेलीकॉप्टरने परळी जि. बीडकडे प्रयाण. परळी येथुन शासकीय हेलिकॉप्टरने श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे सकाळी 11.45 वा. आगमन व राखीव. सकाळी 11.55 वा. शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...