Friday, October 13, 2023

नवरात्र उत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास प्रतिबंध

 नवरात्र उत्सवाच्या काळात

डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास प्रतिबंध

 

 

नांदेड (जिमाका) दि. 13  :- जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या काळात 15 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2023 च्या मध्यरात्रीपर्यतच्या कालावधीत डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुण्‍याही व्‍यक्‍तीस फौजदारी प्रक्रिया सहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार डॉल्‍बी सिस्‍टीमचा वापर करण्यास / चालविण्‍यास याद्वारे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे.

 

नवरात्र उत्सवाच्या काळात जिल्हयातील डॉल्बी चालक व मालक यांचेकडे असलेल्या डॉल्बी सिस्टीम उत्सव कालावधीत रोखून ठेवणे आवश्यक आहे. डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुणीही व्यक्ती  हे डॉल्बी सिस्टीम वापरू / चालवू नये याकरीता सदर डॉल्बी सिस्टीम मालक व  चालक यांना फौजदारी प्रक्रिया सहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार प्रतिबंधात्‍मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केला आहे. संबंधीतावर नोटीस बजावून त्‍यांचे म्‍हणने ऐकूण घेण्‍यास पुरेसा अवधी नसल्‍याने आणीबाणीच्‍या प्रसंगी फौजदारी प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत 12 ऑक्टोबर 2023 रोजी करण्‍यात आला आहे.   

00000 

सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मोफत औषधांची मदत

                                       सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे डॉ. शंकरराव चव्हाण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मोफत औषधांची मदत

 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :-  सचखंड गुरुव्दारा बोर्डातर्फे डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील  बाहयरुग्ण व आंतररुग्ण विभागामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी 12 ऑक्टोबर रोजी अत्यावश्यक औषधींचा मोफत पुरवठा करण्यात आला.

 

या रुग्णालयामध्ये मोठया प्रमाणात गोर-गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. त्यांना गुरुव्दारा बोर्डाकडून पुरविण्यात आलेल्या औषधीमुळे रुग्णसेवेस मदत होईलअधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांनी  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या पुढाकाराने मिळालेल्या औषधींच्या मदतीबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व सचखंड गुरुव्दारा बोर्डाचे धन्यवाद व्यक्त केले.

 

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊतअधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडेगुरुव्दारा बोर्डाचे अधीक्षक एस.ठान.सिंगजी बुंगईदशमेश हॉस्पिटल चे डॉ.एस.परमविर सिंगडॉ.अभिजीत देवगरेउपवैद्यकीय अधीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

0000

महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा

 महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्याचे महसूलपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

 

रविवार 15 ऑक्टोबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर, विमानतळ येथून श्री गुरू गोविंद सिंहजी विमानतळ नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.40 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम. सकाळी 11.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आगमन व पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषद आयोजित शेतकरी सन्मान सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : प्रेक्षागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड . दुपारी 1.15 वा. राखीव. दुपारी 1.30 वा. महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या आढावा व समन्वय बैठकीस उपस्थिती. (अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा. नुकसानीच्या अनुषंगाने ई पिक पाहणी, पिकविमा आढावा. गौण खनिज आढावा. वहिवाट रस्ते, पाणंद रस्ते. लम्पी आढावा) स्थळ: नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड . दुपारी 3 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.10 वा. शासकीय विश्रामगृह , नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.40 वा. मोटारीने श्री गुरु गोविंद सिंह जी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.50 वा. श्री. गुरु गोविंद सिहजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. सायंकाळी 4 वा. विमानाने अकोला कडे प्रयाण करतील.

00000  

 


अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन

 अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 16 ऑक्टोबर रोजी

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस (GEM) पोर्टलवरुन खरेदीत अधिकाधिक वापर करण्यासाठी तसेच पोर्टलवर नोंदणी तसेच पोर्टलच्या संपूर्ण वापरासाठी प्रशिक्षण देण्याचे शासनाने निर्देशित केलेले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय विभागातील खरेदी धोरणाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत प्रशिक्षण आयोजित केले आहे. तरी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय विभाग व त्यांच्या अधिनस्त कार्यालये, औद्योगिक संघटना, औद्योगिक समुह, उत्पादक घटक, पुरवठादार यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

 

शासनाचे सर्व विभाग, शासकीय उपक्रम/महामंडळे व त्याअंतर्गत सर्व कार्यालयाकडून वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी शासनाने मानवी हस्तक्षेपाशिवाय व खरेदी प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यासाठी गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस (GEM) पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलचा अधिकाधिक वापर करुन पोर्टलद्वारे वस्तू व सेवांची खरेदी करण्यास शासकीय, निमशासकीय व स्वायत्त संस्था यांना बंधनकारक करण्यात आलेले आहे असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक आपत्‍ती धोके न्‍युनिकरण दिन विविध उपक्रमाद्वारे संपन्‍न

 जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक आपत्‍ती धोके

न्‍युनिकरण दिन विविध उपक्रमाद्वारे संपन्‍न

              

नांदेड, (जिमाका) दि. 13 :-  संयुक्त राष्‍ट्र संघाने आपत्‍ती धोके कमी करण्‍यासाठी लोकांमध्‍ये जागृती करण्‍याच्‍या दृष्‍टीने 13 ऑक्‍टोंबर हा जागतिक आपत्‍ती न्युनिकरण दिन घोषित केला आहे. दिनांक  8 सप्‍टेंबर 2017 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये राज्यातही  दरवर्षी सर्व जिल्ह्यामध्ये 13 ऑक्‍टोंबर हा दिवस आपत्‍ती धोके निवारण दिवस म्‍हणून साजरा करण्यात येतो. राष्‍ट्रीय आपत्‍ती प्राधिकरण नवी दिल्ली एनडीएमए यांनी आपत्‍ती प्रतिसादासाठी कटिबध्‍द होण्‍यासंदर्भात प्रतिज्ञा दिलेली आहे. या प्रतिज्ञेचे जिल्हाधिकारी  कार्यालयात सकाळी 11 वा. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सामुहिक ग्रहण केले.

 

जिल्हा आपत्‍ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने आयोजीत आग या आपत्‍ती सदंर्भात महानगरपालिका नांदेडच्‍या अग्नीशमन दलामार्फत रंगीत तालीम व प्रात्‍याक्षीके सादर करण्‍यात आली. यावेळी आगीपासून बचाव करण्‍याबाबत माहिती देण्‍यात आली. तसेच हाय बिल्‍डींग रेस्‍क्युचे प्रात्‍यक्षिक दाखविण्यात आले. उपस्थित अधिकारी, कर्मचारीनागरिक पत्रकार यांच्‍या हस्‍ते प्रत्‍यक्ष अग्नीरोधक उपकरण Fire Extinguisher कशा प्रकारे हाताळावेत याबाबत प्रात्‍याक्षीकही देण्‍यात आले.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्‍या संकल्‍पनेतून अपर जिल्हाधिकारी एस.बोरगांवकरनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  किशोर कुऱ्हे यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती संतोषी देवकुळेउपजिल्हाधिकारी सामान्‍य संदीप कुलकर्णीतहसिलदार विजय अवधानेरामदास कोलगणेशंकर लाड,  अग्नीशमन अधिकारी केरोजी दासरे व अग्नीशमनदलाचे कर्मचारीजिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे बारकुजी मोरेकोमल नागरगोजे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीकर्मचारीनागरिक व पत्रकार आदींची उपस्थिती होती.

00000

 

 

 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...