नवरात्र उत्सवाच्या काळात
डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास प्रतिबंध
नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या काळात 15 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2023 च्या मध्यरात्रीपर्यतच्या कालावधीत डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुण्याही व्यक्तीस फौजदारी प्रक्रिया सहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास / चालविण्यास याद्वारे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे.
नवरात्र उत्सवाच्या काळात जिल्हयातील डॉल्बी चालक व मालक यांचेकडे असलेल्या डॉल्बी सिस्टीम उत्सव कालावधीत रोखून ठेवणे आवश्यक आहे. डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुणीही व्यक्ती हे डॉल्बी सिस्टीम वापरू / चालवू नये याकरीता सदर डॉल्बी सिस्टीम मालक व चालक यांना फौजदारी प्रक्रिया सहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केला आहे. संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत 12 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आला आहे.
00000
No comments:
Post a Comment