Wednesday, August 5, 2020

वृत्त क्र.  730  

अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ऑनलाईन कार्यशाळा

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :  दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका प्रवेशाच्या अनुषंगाने विद्यार्थी व पालकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे हे सोमवार 7 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन कार्यशाळा सकाळी 11.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व पालकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकिय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांनी केले आहे.

 

कोविड-19 च्या अनुषंगाने प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया व पदविका अभ्याक्रमानंतर विविध क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या संधी व महाविद्यालय व शाखा निवड करण्यासाठी विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी meet.google.com/kkw-ighe-tfc https://youtu.be/zkVghQ5ZuBs ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करणार आहेत. या meet.google.com/kkw-ighe-tfc व प्लॅटफॉर्मवर 11.20 वाजेपर्यत नोंदणी करावी. या मार्गदर्शनाच्या मिटींगची लिंक gpnanded.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन केले आहे.  

00000

 


वृत्त क्र.  729  

 खरीप हंगामात पिकावर फवारणी करतांना खबरदारी घ्यावी

-         जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे

 

नांदेड (जिमाका), दि. 5 : खरीप हंगामात पिकावर फवारणी  करताना  केल्यानंतर शेतकऱ्यांनी सुरक्षिततेच्यादृष्टिने खबरदारी घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हा  अधिक्षक  कृषि  अधिकारी रविशंकर  चलवदे यांनी केले. पद्मश्री  विठ्ठलराव विखे  पाटील  यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.   

 

यावेळी नांदेड कापुस  संशोधन केंद्राचे वरिष्ठ  संशोधन  सहाय्यक डॉ. शिवाजी तेलंग,  जिल्ह्यातील उपविभागीय कृषि अधिकारी आर.टी. सुखदेव, बालाजी कदम, एम.के. सोनटक्के यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.  प्रारंभी  पद्मश्री  विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.  

 

डॉ.  शिवाजी तेलंग यांनी सोयाबीन पिकावरील चक्री भुंगा, खोड किड कपाशीवरील मावा, तुडतुडे, पांढरी माशी शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅप्स, ट्रायकोकार्ड वापर करुन पिकावरील प्रादुर्भावानुसार किटकनाशकाच्या फवारणीबाबमार्गदर्शन केले. रासायनिक किटकनाशकांची फवारणी करण्यापुर्वी जैविक किटकनाशके फरोमन ट्रॅप्सचा वापर करुन फवारणी करतांना घ्यावयाच्या आवश्यक काळजीबाबत मार्गदर्शन केले.

 

पविभागीय कृषि अधिकारी आर.टी. सुखदेव  यांनी  प्रास्ताविकात शेतकऱ्यांना मार्गदर्शन  केले. तसेच जैन  इरिगेशनचे संजय मुटकुळे यांनी ठिबक तुषार संचाची दुरुस्ती व देखभालीबाबत शेतकऱ्यांना  मार्गदर्शन केले. यावेळी श्री. चलवदे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा  सत्कार  करुन त्यांना  फेरोमन ट्रॅप व  मास्कचे वाटपही करण्यात आले. शेवटी  तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सी. डी. कदम   यांनी  सुत्रसंचालन  करुन  आभार मानले.

00000


कोरोनातून आज 75 व्यक्ती बरे 

जिल्ह्यात 196 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू 

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :-  जिल्ह्यात आज  5 ऑगस्ट रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 75  व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 196 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण  933 अहवालापैकी 619 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 2 हजार 692 एवढी झाली असून यातील 1 हजार 132 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 444 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 57 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 37 महिला व 19 पुरुषांचा समावेश आहे.

 

मंगळवार 4 ऑगस्ट रोजी  नायगाव नांदेड येथील 50 वर्षाची एक महिला, साठेनगर मुदखेड येथील 61 वर्षाचा एक पुरुष शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नांदेड येथे तर किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा किनवट कोविड केअर सेंटर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवार 5 ऑगस्ट रोजी शिवाजी चौक लोहा येथील 74 वर्षाचा एक पुरुष, वाघी रोड नांदेड येथील 52 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, शिवदत्तनगर नांदेड येथील 64 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 103 एवढी झाली आहे.  

 

आज बरे झालेल्या 75 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नांदेड येथील 5, हदगाव कोविड केअर सेटर 10, देगलूर कोविड केअर सेटर 20, खाजगी रुग्णालय 8,  मुखेड कोविड केअर सेटर 20, धर्माबाद कोविड केअर सेटर 2, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 10 असे एकूण 75 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

 

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये अर्धापूर तालुक्यात 4, धर्माबाद तालुक्यात 2, कंधार तालुक्यात 2, लोहा तालुक्यात 1, नांदेड शहरात 23, मुदखेड तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 8, लातूर 1, पुणे 1, ठाणे 1, देगलूर तालुक्यात 18, हदगाव तालुक्यात 10, किनवट तालुक्यात 3, माहूर तालुक्यात 3, नांदेड ग्रामीमध्ये 4, मुखेड तालुक्यात 18, हिंगोली 1, परभणी 4, पुसद 2 असे 107 बाधित आढळले.

 

अँटिजेन तपासणीद्वारे अर्धापूर तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 1, नांदेड शहरात 63, नायगाव तालुक्यात 4, परभणी 2, बिलोली तालुक्यात 2, हदगाव तालुक्यात 5, माहूर तालुक्यात 6, मुदखेड तालुक्यात 2, मुखेड तालुक्यात 1 असे 89 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 1 हजार 444 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 135, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 540, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 44, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 81, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 35, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 106, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 107, लोहा कोविड केअर सेंटर येथे 6, हदगाव कोविड केअर सेंटर 80, भोकर कोविड केअर सेंटर 4, उमरी कोविड केअर सेंटर 14, कंधार कोविड केअर सेंटर येथे 19, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 30, किनवट कोविड केअर सेंटर येथे 25, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 12, मुदखेड कोविड केअर सेटर 13, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 20,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 3, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 5, खाजगी रुग्णालयात 157, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1 बाधित, हैदराबाद येथे 1 तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

 

सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 631,

घेतलेले स्वॅब- 18 हजार 168,

निगेटिव्ह स्वॅब- 14 हजार 156,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 196,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 2 हजार 692,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 13,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,

मृत्यू संख्या- 103,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 132,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 444,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 147. 

 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यात गुरुवार 6 ऑगस्ट 2020 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 6 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 20 ऑगस्ट 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...