Tuesday, May 26, 2020


जिल्ह्यात सायं 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी
या कालावधीत नागरिकांनी मुक्त संचार करु नये
नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेड जिल्ह्यात सायं. 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लागू केली आहे. या संचारबंदी कालावधीत वैद्यकीय व अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी मुक्त संचार करता येणार नाही. अन्यथा संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व भारतीय दंडसंहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल. 333याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे.   
जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी त्यांचे आदेश 22 मे 2020 पासून नांदेड जिल्ह्यात अटी व शर्तीचे अधीन रेड झोन / प्रतिबंधीत क्षेत्राव्यतिरिक्त भागात सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत दुकाने व आस्थापनांना चालू ठेवण्यास मुभा दिली आहे. तथापी सायं. 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण नांदेड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144 (1) (3) अन्वये पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू केली आहे, असेही अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...