Friday, March 24, 2017

  नांदेड तालुक्यात रास्‍तभाव दुकानात  
गहु, तांदुळ, साखरेचे वाटप सुरु  
            नांदेड दि. 24 :- नांदेड तालूक्‍यातील रास्‍तभाव दुकानदार यांच्‍यामार्फत फेब्रूवारी व मार्च महिन्याचे शेतकरी लाभार्थी योजनेच अन्‍नधान्‍य गहु व तांदुळ वाटप करण्‍यात येत आहे. मार्च महिन्याचे अंत्‍योदय योजनेचे गहू 29 किलो व तांदूळ 6 किलो, प्राधान्‍य कुटूंब योजनेचे प्रति व्‍यक्‍ती 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू वाटप करण्‍यात येत आहे. मार्च महिन्यासाठी अंत्‍योदय व बीपीएल (पीएचएस) या योजनेसाठी प्रति व्‍यक्‍ती 0.430 ग्रॅम प्रमाणे साखर रास्‍तभाव दुकानदार यांच्‍यामार्फत वाटप करण्‍यात येत आहे.
या सर्व योजनानिहाय लाभार्थ्‍यांनी आपले अन्‍नधान्‍य संबंधीत रास्‍तभाव दुकानदार यांच्‍याकडून घ्‍यावे, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.

0000000
आरटीओ कार्यालयाचा धर्माबाद येथील कॅम्प रद्द
नांदेड दि. 24 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा धर्माबाद येथील सोमवार 27 मार्च 2017 रोजीचा नियोजित कॅम्प तेथील शासकीय विश्रामगृहाचे नुतनीकरण काम चालू असल्याने  रद्द करण्यात आला आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
आयटीआय धर्माबाद मधील शिल्पनिदेशक पदासाठी
3 एप्रिल रोजी मुलाखती
नांदेड दि. 24 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे शिल्प कारागीर योजनेअंतर्गत शिल्पनिदेशकांचे पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात निव्वळ तासिका तत्वावर तत्वाभ्यास व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी नेमणूक करावयाची आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी सोमवार 3 एप्रिल 2017 रोजी थेट मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्राच्या प्रतीसह सकाळी 11.30 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे उपस्थित रहावे, असे आवाहन धर्माबाद औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.
ज्या व्यवसायासाठी शिल्पनिदेशकांचे पद निव्वळ तासिका तत्वार भरावयाची आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. यांत्रिक मोटार गाडी, यांत्रिक कृषित्र, अभियांत्रिकी चित्रकला निदेशक, संधाता, जोडारी. या व्यवसायाकरीता शैक्षणिक अर्हता ही संबंधीत व्यवसायामधील मेकॉनिकल अभियांत्रिकी किमान द्वितीय श्रेणीत पदवी, पदविका व एक , दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी / एटीएस परीक्षा उत्तीर्ण व तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णयानुसार अटी मान्य असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतरच तासिका तत्वावरील नियुक्ती मिळेल.  या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस यापुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सोमवार 3 एप्रिल 2017 रोजी संस्थेत उपस्थित रहावे. तसेच त्यानंतर आलेल्या संबंधीत उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, असेही आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद जि. नांदेड यांनी केले आहे.

000000
समाज कल्याणच्या विविध सेवा ऑनलाईन प्रणालीत उपलब्ध
नांदेड दि. 24 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय 24 नोव्हेंबर 2015 नुसार व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसुचित सेवा अन्वये देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा अपंगाना ओळखपत्र देणे, अपंग विद्यार्थ्यांना शासकीय, शासनमान्य अनुदानीत अपंग शाळेत, कर्मशाळेत प्रवेश देणे, अनुदानित विशेष शाळा, कार्यशाळा, मतिमंद बालगृहाकरीता नोंदणी प्रमाणपत्र नुतनीकरण करणे या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसुचित सेवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपले सरकार या पोर्टलवर महाऑनलाईनद्वारे ऑनलाईन करण्याची कार्यान्वीत करण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   

000000
जालना येथील सैन्य भरतीसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 24 :-  सैन्यभरती सोल्जर जीडी, सोल्जर टेक्रीकल, सोल्जर क्लार्क, एसकेटी व सोल्जर ट्रेडसमॅन या पदासाठी होत आहे. नांदेड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी पात्रतेसंबंधी www.joinindianarmy या संकेतस्थळावरुन माहिती घ्यावी. ऑनलाईन अर्ज मंगळवार 11 एप्रिल 2017 पर्यंत भरावेत. ऑनलाईन अर्ज भरणे झाल्यावर जिल्हा व तालुका भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
सैन्य भरती कार्यालय औरंगाबाद यांच्याकडून सैन्य भरतीचे आयोजन जालना येथे गुरुवार 27 एप्रिल ते रविवार 7 मे 2017 या कालावधीत करण्यात आले आहे. ही सैन्य भरती नांदेड, हिंगोली, जालना, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, बुलढाणा व जळगाव या नऊ जिल्ह्यासाठी आहे.
पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनमान्य माजी सैनिक महामंडळ संचलित मेस्को करीअर ॲकडमी सातारा व बुलढाणा येथे अल्पदरात 6 हजार 500 रुपयात एक महिन्याची ट्रेनींग दिली जाते. यामध्ये भोजन, निवास व ट्रेनिंग शुल्क समाविष्ट आहे. याचा युवकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर व्ही. व्ही. पटवारी यांनी केले आहे.

000000
जिल्ह्यात 8 एप्रिल रोजी
राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
नांदेड दि. 24 :- जिल्हा न्यायालय नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार 8 एप्रिल 2017 रोजी आयोजित करण्यात आलआहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढुन आपला पैसा, वेळ वाचवावा या राष्ट्रीय लोकअदालतीच्या रूपाने चालून आलेल्या  संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा सत्रन्यायाधीश सविता बारणे यांनी केले आहे.
मागील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये मिळालेले यश पाहता यावेळी देखील ऱ्या मोठया प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. एस. आर. नरवाडे यांनी व्यक्त केला असून पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात दाखलपुर्व प्रकरणे जवळच्या तालुका विधी सेवा समितीकडे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड या कार्यालयाकडे फक्त एक अर्ज देवून आपले प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवण्याची विनंती करावी. यासाठी आपणास कुठलीही शुल्क आकारण्यात येणार नाही. या अदालतीत तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, चेकबाऊंसची प्रकरणे (138 एन.आय.अॅक्ट), बॅंक रिकव्हरी, दिवाणी प्रकरणे: भूसंपादन, महसूल प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, मनपा, नपा प्रकरणे, विद्युत आणि पाणीपट्टी प्रकरणे तसेच विविध बॅंकांची, फायनान्स कंपन्याची प्रलंबित दाखल पूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. विधिज्ञ, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, ..पा. अधिकारी, र्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, विमा कंपन्याचे अधिकारी, बॅंक अधिकारी संबंधित सर्व पक्षकारांना या राष्ट्रीय लोकअदालतीत परस्परांतील वाद मिटविण्याची या लोकन्यायालयाच्या रुपाने संधी चालून आली आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे       

00000
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचा दौरा 
नांदेड दि. 24 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 26 मार्च 2017 रोजी मुंबई येथून नंदीग्राम एक्सप्रसेने सकाळी 5.10 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 5.15 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने कंधारकडे प्रयाण करतील. सकाळी 10 वा. कंधार येथे आगमन व कंधार पंचायत समिती कार्यालयास भेट. सकाळी 10.15 वा. कंधार येथून शासकीय वाहनाने चिंचोली ता. कंधारकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. चिंचोली येथे आगमन व छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालय रौप्यमहोत्सवी वर्षपुर्ती अधिवेशनास उपस्थिती व राखीव. सकाळी 11.30 वा. चिंचोली ता. कंधार येथून हैद्राबाद (तेलंगणा) कडे वाहनाने प्रयाण करतील.

000000
डिजीधन मेळाव्यातील लोकराज्यच्या
दालनास पालकमंत्री खोतकर यांची भेट
नांदेड दि. 24 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमेत आज डिजीधन मेळावा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात या मेळावा आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रदर्शनात नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाचे प्रदर्शन दालनही उभारण्यात आले. या दालनास राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आवर्जून भेट दिली व लोकराज्य विषयी प्रशंसा केली.
पालकमंत्री श्री. खोतकर यांच्या समवेत आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदींचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी मान्यवरांना लोकराज्यचा अंक व पुष्प देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी निशिकांत तोडकर, छायाचित्रकार विजय होकर्णे, लिपीक अलका पाटील, काशिनाथ आरेवार, युसूफ पठाण, प्रवीण बिदरकर, बाल नरसय्या अंगली यांनी प्रदर्शन दालनासाठी संयोजन केले.
या दालनात लोकराज्यचे विविध अंक, विशेषांक प्रदर्शीत करण्यात आले. तसेच लोकराज्य वार्षिक वर्गणीची नोंदणी व अंकविक्रीही करण्यात आली. लोकराज्यविषयीच्या दृक-श्राव्य जिंगल्सचेही प्रसारणही करण्यात आले. यामुळे दालन आकर्षणाचे केंद्र ठरले. त्यामुळे लोकराज्यच्या या दालनास दिवसभरात अनेकांनी भेट देऊन लोकराज्यविषयी माहिती घेतली.

000000
डिजीटल प्रदान प्रणालीमुळे आर्थिक विकासाला
चालना मिळेल - पालकमंत्री खोतकर
नांदेडमध्ये डिजीधन मेळावा संपन्न
नांदेड दि. 24 :- डिजीटल प्रदान अर्थात डिजीटल पेमेंट प्रणालीमुळे राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. यासाठीच्या प्रयत्नात नांदेड जिल्हा सदैव पुढेच राहील, असा विश्वास  राज्याचे वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे व्यक्त केला. केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या डिजीटल प्रदान मोहिमेतर्गत आयोजित डिजीधन मेळाव्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परीषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार हेमंत पाटील, निती आयोगाच्या डिजीटल पेमेंट विभागाच्या संचालक श्रीमती मेरी बार्ला, राज्याच्या माहिती तंत्रज्ज्ञान विभागाचे अतिरिक्त आयुक्त पुण्यव्रत घटक, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील आदींची  प्रमुख उपस्थिती होती.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यास आणि त्यानिमित्त आयोजित प्रदर्शनातील दालनाला भेट देण्यासाठी दिवसभर या परिसरात मोठी गर्दी झाली. विद्यार्थी, तरूण, शेतकरी, व्यावसायीक, उद्योजक अशा विविध घटकांनी डिजीधन मेळाव्यास भेट दिल्या. नेटके आणि देखण्या स्वरुपात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यासाठी हा परिसर सुशोभितही करण्यात आला.
मेळाव्यातील मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री श्री. खोतकर म्हणाले की, विकासाच्या वाटेवर वाटचाल करणारा आणि नाविन्यपुर्ण उपक्रम यशस्वी करणारा जिल्हा म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख आहे. नांदेड जिल्ह्याला प्राचीन आणि ऐतिहासीक अशी वैभवशाली परंपरा आहे. अलिकडच्या काळात शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातही नांदेडने आपली ओळख निर्माण केली आहे. कृषी आणि कृषी उद्योगावरच नांदेडची आर्थिक भिस्त आहे.  हे यूग माहिती तंत्रज्ज्ञानाचे आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने ई-गव्हर्नन्सद्वारे लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण प्रस्थापित केले आहे. तंत्रज्ज्ञानाचा आणि आधुनिकीकरणाचा सामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठीच रोकडरहित आणि कॅशलेस व्यवहारांचा आग्रह केला जात आहे. डिजीधन मेळाव्यातून प्रेरणा घेऊन नांदेड जिल्हा मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांसाठी मार्गदर्शकाची भुमिका बजावेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. खोतकर यांनी नांदेड पुरवठा विभागाच्या ई-पीडीएमएस उपक्रमाचाही गौरवपुर्ण उल्लेख करतानाच, डिजीधन मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी आणि प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदनही केले.
आमदार हेमंत पाटील यांनी नांदेडला डिजीधन मेळाव्याच्या आयोजनाची संधी मिळाल्याची बाब गौरवपुर्ण असल्याचा उल्लेख केला. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशांचेही वाचन केले.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी रोकडरहित व्यवहार ही लोकचळवळ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या  डिजीधन मेळाव्यात बँकीग, तसेच शासकीय-निमशासकीय आणि विविध व्यावसायीक घटकांनी हिरीरीने सहभाग नोंदविल्याचे समाधानही व्यक्त केले. तसेच कॅशलेस व्यवहारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरापर्यंत नियोजन केल्याचेही नमूद केले.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. डिजीटल प्रदानाबाबतच्या निती आयोगाची चित्रफितही प्रदर्शीत करण्यात आली. राष्ट्रीय जलतरणपटू पारस यादव याच्या हस्ते डिजीटल पद्धतीने प्रत्यक्ष खरेदीचा व्यवहारही करण्यात आला. नांदेड जिल्ह्याच्या संकेतस्थळासह, आठ उपविभाग आणि तहसिल कार्यालयांच्या संकेतस्थळांचे प्रकाशनही डिजीटल पद्धतीने पालकमंत्री श्री. खोतकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नांदेड वाघाळा महापालिकेच्या वैशिष्ट्यपुर्ण अशा नांदेड- एमसी या ॲपचेही पालकमंत्री खोतकर यांनी अवतरण (लाँचींग) केले.
नॅशनल पेमेंट कार्पोरेशनचे महेंद्र जोशी यांनी नांदेडमधील हा मेळावा देशभरातील 85 वा मेळावा असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रीय स्तरावरील भाग्यवान विजेत्यांची सोडत (लकी ड्रॅा) ही काढला. यामध्ये दैनंदिन लकी ग्राहक सोडत, साप्ताहीक लकी ग्राहक सोडत, तसेच डिजीधन व्यापारी सोडत योजना अशा तीन प्रकारात सोडत काढण्यात आल्या. ज्याद्वारे पहिल्या सोडतीत पंधरा हजार, दुसऱ्या सोडतीत 7 हजार 229 ग्राहक आणि तिसऱ्या सोडतीत सात हजार व्यापारी आस्थापना असे विजेते निवडण्यात आले.
मेळाव्याच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेतील विजेते अनुक्रमे प्रथम क्रमांक - रेणुका तांबोळी, व्दितीय - आम्रपाली भोसले आणि तृतीय क्रमांक - व्यंकटेश काटकर यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.  तसेच दिवसभरातील प्रदर्शनातून उत्कृष्ट दालन म्हणून अनुक्रमे प्रथम क्रमांक- एअरटेल पेमेंट बँक, द्वितीय - पेटीएम, तृतीय क्रमांक जिल्हा पुरवठा विभाग तसेच उत्तेजनार्थमध्ये सीएमएस आणि जीओ यांच्या दालनांनाही सन्मानित करण्यात आले. जिल्ह्याच्या संकेतस्थळाच्या निर्मितीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी सुनिल पोटेकर, तहसिलदार डॉ. अरविंद नरसीकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले. शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी आभार मानले. कार्यक्रमास डिजीधन मेळाव्यात सहभागी विविध बँका, कंपन्या, व्यावसायीक आदींचे प्रतिनिधी तसेच अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमापुर्वी पालकमंत्री श्री. खोतकर यांनी डिजीधन मेळाव्यातील विविध दालनांना भेट देऊन पाहणी केली. दालनातील संयोजकांच्यावतीने डिजीटल प्रदान तसेच त्यातील विविध उत्पादने, व्यवहार याबाबत माहिती देण्यात आली. त्यांच्या समवेत आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिनगारे, आयुक्त उन्हाळे आदींनीही दालनांना भेट दिली.
तत्पुर्वी सकाळच्या सत्रात मेळाव्यात सहभागी विविध घटकांच्या दालनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, एनआयसीचे जिल्हा माहिती अधिकारी सुनिल पोटेकर आदींची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी काकाणी यांनी प्रदर्शनातील सर्वच दालनांना भेट देऊन, तेथील डिजीटल व्यवहार, विविध प्रकारची उत्पादने, उपक्रम आदींची माहिती घेतली.  दिवसभरात विद्यार्थी, तरूण, शेतकरी, व्यापारी, व्यावसायीक आदींनी दालनांना भेट देऊन माहिती घेतली. प्रदर्शनातील दिवसभराच्या घडामोडींबाबत नियंत्रण कक्षातून राजेश कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले.
 मेळाव्यात बँका, आधार क्रमांकाशी निगडीत पेमेंट, तसेच मोबाईल कंपन्या, खते, इंधन आदी कंपन्याही सहभागी झाल्या. त्यांच्याकडील विविध ॲप व त्यांच्या वापराबाबत याठिकाणी डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके तसेच खरेदी आदीबाबत माहिती दिली गेली. आधार नोंदणी करण्यात आली, तसेच भिम ॲप आदींची माहिती देण्यात आली. खाद्य पदार्थांसोबतच ग्राहकोपयोगी वस्तूंच्या दालनात डिजीटल पद्धतीने खरेदी करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून डिजीधन मेळाव्यास शुभेच्छा संदेश
डिजीधन मेळावा आर्थिक व्यवहारातील परिवर्तनासाठी सहाय्यभूत ठरेल अशा आशयाचा शुभेच्छा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्य सरकारने कॅशलेस व्यवहारासाठी रोडमॅप तयार केल्याचे तसेच महावॅलेट, प्रत्येक ग्रामपंचायतीत पीओएस मशीन आणि ते चालविण्यासाठी प्रतिनीधी नियुक्ती करण्यात येत असल्याचा उल्लेख या संदेशात आहे. सामान्य ग्राहक आणि व्यापारी यांच्यासाठी डिजीटल प्रदानातील सुलभता अशा मेळाव्यातून पुढे येईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.

0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...