Monday, March 22, 2021

 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर

दहावी, बारावी परीक्षेच्या वेळेत वाढ

सुधारित अंतिम वेळापत्रक, विशेष मार्गदर्शक सूचना निर्गमीत 

नांदेड (जिमाका) दि. 22 :-  कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये दहावी व बारावी लेखी परीक्षेतील पेपरची वेळ 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे व 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने एप्रिल-मे 2021 दहावी व बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात वेळेत बदल करुन सुधारित अंतिम वेळापत्रके मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 

एप्रिल-मे 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकारी संकेतस्थळावर 26 फेब्रुवारी 2021 पासून उपलध करुन देण्यात आले होते. 

लेखी, प्रात्यक्षिक व तत्सम परीक्षांना प्रविष्ठ होणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी कोविड-19 विषाणुच्या पार्श्वभुमीवर विशेष मार्गदर्शन सूचना मंडळामार्फत निश्चित करण्यात आलेल्या असून या सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. परीक्षार्थ्यांनी या विशेष मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शिक्षण राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.  

00000

 

 

निवृत्ती वेतनधारकांनी ओळखपडताळणीसाठी

आपआपल्या मंजुरी प्राधिकाऱ्याशी साधवा संपर्क

नांदेड (जिमाका) दि. 22 :- येत्या 1 एप्रिल पासून सर्वच कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन मंजुरी प्राधिकाऱ्यांनी त्यांची ओळखपडताळणी नमुने अ, ब, क आणि एमटीआर 42 हे ऑनलाईन कोषागाराकडे पाठवणे आवश्यक आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांची (कुटूंब निवृत्तीवेतनाची प्रकरणे वगळता) प्रत्यक्ष ओळखपडताळणी कोषागार स्तरावर करण्यात येणार नाही. त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांनी ओळखपडताळणीसाठी आपआपल्या मंजुरी प्राधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडचे कोषागार अधिकारी अभय चौधरी यांनी केले आहे.

याबाबत सर्व अनुदानित कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन मंजुरी प्राधिकाऱ्यांना जसे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, शिक्षण उपसंचालक लातूर, सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड, सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय किनवट यांना कोषागार अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

शासन निर्णय 30 डिसेंबर 2015 अन्वये राज्य शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास शासनाच्या कोषागारातून निवृत्तीवेतन देय असणाऱ्या प्रकरणात निवृत्तीवेतन प्रदान करणाऱ्या कोषागारात निवृत्तीवेतन धारकास उपस्थित राहून ओळखपडताळणी करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे आदेशीत केले आहे. परंतू सेवार्थ प्रणालीमध्ये वेतन न घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांची प्रत्यक्ष / ऑफलाईन ओळखपडताळणी करण्यात येत होती, असेही कोषागार अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  

0000

 

नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 291 व्यक्ती कोरोना बाधित

दहा जणांचा मृत्यू

अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 61 अहवालापैकी 1 हजार 291 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 771 तर अँटिजेन तपासणीद्वारे 520 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 33 हजार 7 एवढी झाली आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चैतन्यनगर नांदेड येथील 54 वर्षाची एक महिला, शिवाजीनगर नांदेड येथील 53 वर्षाचा पुरुष, अंबानगर येथील 70 वर्षाची एक महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे राजनगर नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, भाग्यनगर येथील 47 वर्षाची माहिला, खाजगी रुग्णालयात सोमेश कॉलनी येथील 90 वर्षाचा पुरुष, शिवाजीनगर येथील 50 वर्षाचा पुरुष, चैतन्यनगर येथील 68 वर्षाचा पुरुष आणि नांदेड येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा समावेश आहे. हे मृत्यू दिनांक 20 ते 22 मार्च 2021 या कालावधीत झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 658 एवढी झाली आहे.

 

आजच्या 5 हजार 61 अहवालापैकी 3 हजार 390 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 33 हजार 7 एवढी झाली असून यातील 25 हजार 855 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 6 हजार 264 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 59 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 19, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 305, कंधार तालुक्यांतर्गत 3, माहूर तालुक्यांतर्गत 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 16, हदगाव 1, मुखेड 5, खाजगी रुग्णालय 32 असे एकूण 392 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.33 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 566, भोकर तालुक्यात 11, देगलूर 12, हदगाव 2, कंधार 1, लोहा 36, नायगाव 9, परभणी 4, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 21, बिलोली 5, धर्माबाद 17, हिमायतनगर 14, किनवट 23, मुखेड 33, उमरी 13, यवतमाळ 1, आदिलाबाद 2 असे एकूण 771 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 341, भोकर तालुक्यात 11, धर्माबाद 7, कंधार 7, लोहा 33, मुदखेड 37, नायगाव 6, परभणी 2, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 15, देगलूर 30, हदगाव 3, किनवट 6, माहूर 16, मुखेड 2, लातूर 2, आदिलाबाद 1 असे एकूण 520 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 6 हजार 264 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 188, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 80, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 99, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 15, किनवट कोविड रुग्णालयात 76, मुखेड कोविड रुग्णालय 125, देगलूर कोविड रुग्णालय 19, हदगाव कोविड रुग्णालय 43, लोहा कोविड रुग्णालय 130, कंधार कोविड केअर सेंटर 20, माडवी कोविड केअर सेंटर 7, बारड कोविड केअर सेंटर 4, महसूल कोविड केअर सेंटर 102, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 132, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 112, खाजगी रुग्णालय 375 आहेत. 

सोमवार 22 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 76 हजार 352

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 37 हजार 866

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 33 हजार 7

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 25 हजार 855

एकुण मृत्यू संख्या-658

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.33 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-26

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-354

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-329

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-6 हजार 264

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-59.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...