Monday, March 22, 2021

 

निवृत्ती वेतनधारकांनी ओळखपडताळणीसाठी

आपआपल्या मंजुरी प्राधिकाऱ्याशी साधवा संपर्क

नांदेड (जिमाका) दि. 22 :- येत्या 1 एप्रिल पासून सर्वच कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन मंजुरी प्राधिकाऱ्यांनी त्यांची ओळखपडताळणी नमुने अ, ब, क आणि एमटीआर 42 हे ऑनलाईन कोषागाराकडे पाठवणे आवश्यक आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांची (कुटूंब निवृत्तीवेतनाची प्रकरणे वगळता) प्रत्यक्ष ओळखपडताळणी कोषागार स्तरावर करण्यात येणार नाही. त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांनी ओळखपडताळणीसाठी आपआपल्या मंजुरी प्राधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडचे कोषागार अधिकारी अभय चौधरी यांनी केले आहे.

याबाबत सर्व अनुदानित कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन मंजुरी प्राधिकाऱ्यांना जसे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, शिक्षण उपसंचालक लातूर, सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड, सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय किनवट यांना कोषागार अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

शासन निर्णय 30 डिसेंबर 2015 अन्वये राज्य शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास शासनाच्या कोषागारातून निवृत्तीवेतन देय असणाऱ्या प्रकरणात निवृत्तीवेतन प्रदान करणाऱ्या कोषागारात निवृत्तीवेतन धारकास उपस्थित राहून ओळखपडताळणी करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे आदेशीत केले आहे. परंतू सेवार्थ प्रणालीमध्ये वेतन न घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांची प्रत्यक्ष / ऑफलाईन ओळखपडताळणी करण्यात येत होती, असेही कोषागार अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...