Monday, August 10, 2020

 

147 कोरोना बाधितांना औषोधोपचारानंतर सुट्टी

 59 बाधितांची भर    

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :-  सोमवार 10 ऑगस्ट रोजी सायं. 6  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात 147 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 59 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकुण 369 अहवालापैकी  274 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 3 हजार 356 एवढी झाली असून यातील  1 हजार 779 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 440 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 110 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 120 एवढी झाली आहे.  

आज बरे झालेल्या 147 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 2, नायगाव कोविड केअर सेंटर येथील  31, देगलूर कोविड केअर सेंटर 13, कंधार कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालय 15, किनवट कोविड केअर सेंटर 5,मुखेड कोविड केअर सेंटर 4, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 70, धर्माबाद कोविड केअर सेंटर 5 येथील बाधितांचा समावेश आहे. आजवर एकूण 1 हजार 779 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये नांदेड मनपाक्षेत्र 12, लोहा तालुक्यात 2,  उमरी तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 2, कंधार तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 4, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 4, देगलूर तालुक्यात 1, हिमायतनगर तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 8, किनवट तालुक्यात 8, मुखेड तालुक्यात 2, परभणी 1 असे एकुण 48 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 2,मुखेड 1, बिलोली 2, किनवट 5, मुदखेड 1 असे एकूण 11 बाधित आढळले.

जिल्ह्यात 1 हजार 440 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 173, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 552, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 40, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 39, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 24, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 115, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 112, लोहा कोविड केअर सेंटर येथे 8, हदगाव कोविड केअर सेंटर 50, भोकर कोविड केअर सेंटर 10,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 8, किनवट कोविड केअर सेंटर येथे 42, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 20, मुदखेड कोविड केअर सेटर 13, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 20,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 16, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 31, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 143 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 येथे बाधित संदर्भित झाले आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

 सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार22,

घेतलेले स्वॅब- 22 हजार 58,

निगेटिव्ह स्वॅब- 17 हजार 14,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 59,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 356,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 24,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,

मृत्यू संख्या- 120,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 779,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 440,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 213, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 110

 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

0000

 

 

 

अभियांत्रिकी पदविका प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया-२०२०

१० ऑगस्टपासून सुरु

 

नांदेड (जिमाका) दि.10 :- अभियांत्रिकी पदविका प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया-२०२० सुरु करुन ती सुरळीत पार पाडण्यासाठी कोविड-१९ च्या परिस्थितीशी सुसंगत अशी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ८ ऑगस्ट रोजी सहसंचालक, नोडल अधिकारी, सर्व प्रवेश सुविधा केंद्रांचे प्राचार्य व केंद्र समन्वयक यांची ऑनलाईन कार्यशाळा डॉ. अभय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत या  प्रणालीची सविस्तर माहिती देण्यात आली.

या संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना नाव नोंदणी व आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यासाठी व त्याची पडताळणी करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. ज्यांच्याकडे संगणक आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे असे विद्यार्थी घरनच आपला अर्ज भरन सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड कर शकतील. कागदपत्रांची पडताळणी पण ऑनलाईनच होईल. विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये विद्यार्थी आपला अर्ज मोबाइल किंवा संगणकावरून भरन कागदपत्र अपलोड करणे व त्याची पडताळणी करणे यासाठी विद्यार्थ्याला जवळच्या सुविधा केंद्रावर जावे लागेल.  जाण्याआधी सुविधा केंद्राचा उपलब्ध 'टाईम स्लॉट' ऑनलाईन पद्धतीने निवडावा लागेल.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्येक प्रवेश सुविधा केंद्रावर खबरदारीचा उपाय म्हणून प्रमाणित कार्यपद्धती (SOP) जारी करण्यात आली असून त्यामध्ये केंद्र शासन, राज्यशासन, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेली मार्गदर्शक तत्वे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत निर्दे देण्यात आलेले आहे. यानुसार सर्व सुविधा केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी, प्रवेशासाठी येणारे विद्यार्थी व त्यांचे पालक या सर्वांनी मास्कचा वापर करणे, हात सॅनिटाईझ करणे, संस्थेच्या प्रवेश द्वारावर स्पर्शविरहित थर्मामीटर व ऑक्सिमीटर ने तपासणी करणे, दोन व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतर राखणे हे बंधनकारक राहील.

या सर्व बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यासाठी डॉ. गोरक्ष गर्जे, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतनन बाबानगर नांदेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन नांदेड हे एक प्रवेश सुविधा केंद्र म्हणून कार्यान्वयीत करण्यात आले असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करन देण्यात आलेली आहे. तरी प्रवेशेच्छूक विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा .जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घरी राहूनच आपला प्रवेश अर्ज भरन सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करवीत, प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर जाण्याची गरज पडल्यास पालकांनी पाल्याबरोबर जाण्याचे टाळावे जेणेकरून सुविधा केंद्रावर गर्दी होणार नाही असे आवाहन प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी व प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पाहण्यासाठी www.dtemaharashtra.gov.in किंवा            www. gpnanded.org.in  या संकेतस्थळांना भेट द्यावी.

 

0000

 

 

रानभाज्या महोत्सवाने पटवून दिली

फळभाज्यांची नैसर्गिक वैभव संपन्नता

नांदेड (जिमाका) दि.10 :- कधीकाळी  अवचित भेटीला येणाऱ्या कर्टुले, कुंजरनाय, सुरणघोळ, शेवगा तरोडा, केणा, सुरकंद, चुच या रानभाज्या एकाच जागेवर सहज उपलब्ध झाल्याने ग्राहकांना कोविड -19 च्या वातावरणातून अस्सल नैसर्गिक जैवविविधतेच्या जवळ जायची संधी मिळाली. कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रानभाज्या महोत्सवाचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित केले होते. 

या महोत्सवाच्या माध्यमातून घरोघरी असलेल्या आजीच्या बटव्यातील ही औषधगुण संपन्न व नैसर्गिक संपदा पुन्हा भेटीला आल्याने स्वाभाविकच याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी अधिक पसंती दिली. आदिवासी दिनाचे औचित्य साधत या एकदिवसीय महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी माधव सोनटक्के,बाळासाहेब कदम, आरती सुखदेव, पोखरणी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.देविकांत देशमुख आदि उपस्थित होते. 

सेंद्रीय, नैसर्गिक अर्थात विषमुक्त फळ भाजीपाल्यांना आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. नांदेड जिल्ह्यात नैसर्गिकरित्या येणाऱ्या विविध रानभाज्या अधिक प्रमाणात आहेत. या रानभाज्या ग्राहकांपर्यंत पोहचणे आवश्यक असून कृषी विभाग आणि आत्मा यांचे अधिकारी यापुढेही विविध छोटेखानी उपक्रम घेतील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. महिन्यातील निवडक दिवसासाठी सेंद्रिय, नैसर्गिक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी एखादे विक्री केंद्र कसे सुरु करता येईल, याचाही आम्ही विचार करु असेही ते म्हणाले.

या महोत्सवात 40 पेक्षा अधिक प्रकारच्या फळ व रानभाज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणलेल्या होत्या. दोन तासात  सुमारे दोनशे ग्राहकांनी भेट दिली.  

विविध तालुक्यातील शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले होते. यात गंगाधर मारोतराव हनमानगे, जनार्दन विठ्ठल पाटील, प्रकाश कद, बंडू परसराम जाधव, विठ्ठल नारायण लष्करे, दत्ता दिगंबर खानसोळे, अंबिका  महिला बचत गटाच्या संचालिका अनिता गणेश पाटील, वसुधा गोल्ड गांडूळ खत प्रकल्प बळवंतराव पोळ, आत्मनिर्भर किसान उत्पादक कंपनीचे दत्ता पाटील, केशव हनुमंते, समृद्धी कृषी महिला मंडळाचे सौ. वनिता साहेबराव मोरे, अमोल सावंत, संदीप डाकुलगे, भगवान इंगोले, सचिन इंगोले, कैलाश  हनमंते, गजानन पावडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते

0000




































महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...