कोलामपोड येथे नागूबाई जेव्हा
Saturday, August 13, 2022
फाळणी दु:खद स्मृती दिनानिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात चित्र प्रदर्शनाचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 13 :- “फाळणी दु:खद स्मृती दिन” हा 14 ऑगस्ट 2022 रोजी पाळण्यात येत आहे. या दिनावर आधारित चित्र प्रदर्शन, घडामोडींचे आयोजन रविवार 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे सकाळी 11 वा. करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते होणार आहे. सदर माहिती http://amritmahotsav.nic.in/
दिनांक 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या देशाच्या फाळणी दरम्यान हजारो लोकांना ज्या मरण यातना, मन:स्ताप आणि दु:ख भोगावे लागले त्याची कल्पना देशातील सर्व नागरिकांना व्हावी यादृष्टीने फाळणी दु:खद स्मृती दिनावर आधारित चित्र प्रदर्शन, घडामोडींचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनास सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, निमंत्रित, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, पत्रकार आणि कर्मचारी, आदींची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास व प्रदर्शनास सर्व संबंधितांनी भेट देऊन पाहणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.
000000
जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित
फ्रीडम वाल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड (जिमाका) दि. 13 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित फ्रीडम वॉल या स्पर्धेस शाळा व महाविद्यालये यांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.
ही स्पर्धा कृषीतंत्र महाविद्यालय यांच्या संरक्षक भिंतीवर आयोजित करण्यात आली होती. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, हर घर तिरंगा व स्वातंत्र्य चळवळीतील घटना, नेते व देशभक्तीपर चित्रे काढण्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती. अशा आशयाची एकूण 16 सुंदर आकर्षक चित्रे या भिंतीवर काढण्यात आली व भिंत ही आजादी का अमृत महोत्सवाची साक्षीदार बनली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक ललीत कला अकादमी नांदेड चित्रकला शिक्षक यांना मिळाला तर द्वितीय क्रमांक किड्स किंग्डम यांना तर तृतीय क्रमांक नागार्जुन पब्लिक स्कूल यांना मिळाला.
00000
भारतीय ध्वज संहितेचे पालन करावे
नांदेड (जिमाका) दि. 13 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने या कालावधीत नोंदणीकृत सर्व दुकाने, आस्थापनांनी राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी प्रेरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दुकाने, व्यापारी संकुल व सर्व आस्थापनांवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अनवर सय्यद यांनी केले आहे.
राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या व हाताने विणलेल्या किंवा पॉलीस्टर, सिल्क, खादीपासून तयार केलेल्या कापडाचे असावेत. हा उपक्रम राबवतांना भारतीय ध्वज संहितेचे पालन करावे. जाणते, अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता सर्व दुकान, आस्थापना मालकांनी घ्यावी, असेही सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...