Friday, June 9, 2023

 केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सुधारित दौरा  

नांदेड (जिमाका) दि. 9 :- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

शनिवार 10 जून 2023 रोजी कुमठा ता. उदगीर येथून विश्रामगृह नांदेड येथे सायं. 4.30 वा. आगमन. सायं. 5.30 वा. नांदेड विश्रामगृह येथून अबचलनगर गुरूद्वारा परिसरकडे प्रयाण व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेस उपस्थिती. रात्री 8.30 वा. देविदास राठोड यांच्या नवीन सिडको येथील निवासस्थानी सदिच्छा भेट. रात्री 10 वा. नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.  

0000

 सहकार मंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे हे शनिवार 10 जून 2023 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

शनिवार 10 जून 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने दुपारी 12 वा. नांदेड येथे आगमन व राखीव.  सायं. 6 वा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या सभेस उपस्थिती. स्थळ- सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरूद्वारा नांदेड. सोईनुसार सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरूद्वारा नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

0000

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवार 10 जून 2023 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

शनिवार 10 जून 2023 रोजी मुंबई येथून विमानाने सायंकाळी 4.20 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 5.30 वा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आगमन प्रसंगी उपस्थिती. सायं. 5.35 वा. मोटारीने तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरूद्वारा नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.45 वा. तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरूद्वारा नांदेड येथे आगमन. सायं.  5.45 वा. दर्शनासाठी राखीव. सायं. 6  वा. मोटारीने सभास्थळ तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरूद्वारा नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.05 वा. सभास्थळ-तख्त सचखंड श्री हुजूर बचलनगर साहिब गुरूद्वारा नांदेड येथे आगमन व सभेसाठी राखीव (खासदार प्रताप पाटील चिखलीकर). सायं. 7 वा. मोटारीने श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. सायं. 7.10 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायं. 7.15 वा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रयाण प्रसंगी उपस्थिती. सायं. 7.30 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.

00000 

 सामाजिक न्याय व सशक्तिकरण 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- केंद्रीय सामाजिक न्याय  सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

शनिवार 10 जून 2023 रोजी हैद्राबाद येथून वाहनाने दुपारी 1.45 वा. बोंढार येथे आगमन. दुपारी 1.45 वा. बोंढार येथे मयत अक्षय भालेराव यांच्या कुटूंबियाची सात्वंनपर भेट. दु. 2.30 वा. समाज कल्याण अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने हैद्राबादकडे प्रयाण.

0000

 महाराष्ट्र विधान परिषद गटनेता प्रविण दरेकर यांचा दौरा

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- महाराष्ट्र विधान परिषद गटनेता प्रविण दरेकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार 9 जून 2023 रोजी नरखेड ता. मोहोळ जि. सोलापूर येथून मोटारीने सायं. 7 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड  येथे आगमन, राखीव व मुक्काम.

शनिवार 10 जून 2023 रोजी दुपारी 4.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सायं. 4.30 वा. श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ, नांदेड येथे आगमन व गृहमंत्री अमित शाह यांच्या आमगन प्रसंगी उपस्थिती. सायं. 5.10 वा. श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथून श्री. सचखंड हुजूर साहेब गुरुद्वाराकडे मोटारीने प्रयाण. सायं. 5.25 वा. सचखंड हुजूर  साहेब गुरुद्वारा नांदेड येथे आगमन व दर्शन. सायं.5.40 वा. सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा नांदेड येथून अबचलनगर ग्राऊंड नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सायं. 5.50 वा. अबचलनगर ग्राऊंड नांदेड येथे आगमन व सभेस उपस्थिती. सायं. 7.15 वा. अबचलनगर ग्राऊंड नांदेड येथून सोमेश कॉलनी कलामंदिर नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सायं. 7.25 वा. श्री. राजेंद्र हुरणे (व्यापारी असोसिएशन आघाडी) यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. (स्थळ- सोमेश कॉलनी कलामंदिर नांदेड). सायं. 7.35 वा. सोमेश कॉलनी कलामंदिर, नांदेड येथून वसंत नगर नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सायं. 7.45 वा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. स्थळ:- साई सुभाष वसंतनगर नांदेड . सायं. 7.55 वा. वसंत नगर नांदेड येथून श्री. गुरु  गोविंदसिंघजी विमानतळ नांदेडकडे मोटारीने प्रयाण. रात्री. 8.05 वा. श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ, नांदेड येथे आगमन व गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रस्तानसमयी उपस्थिती. रात्री 8.30 वा. श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथून औरंगाबाद कडे मोटारीने प्रयाण.

0000 

 केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

शनिवार 10 जून 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने दुपारी 3 वा. नांदेड येथे आगमन. दुपारी 3 ते रात्री 8 या कालावधीत नांदेड येथील आयोजित मेळाव्यास उपस्थिती. रात्री 8 वा. नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.

0000

कृपया सुधारीत वृत्त घ्यावे, ही विनंती.

वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून

नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल 

 

·         10 जून रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल बदल 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड शहरात शनिवार 10 जून 2023 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपा पक्षातर्फे अबचलनगर मैदान नांदेड येथील आयोजित जाहीर सभेस उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या अनुषंगाने नियमित चालणाऱ्या वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. ही अधिसूचना शनिवार 10 जून 2023 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत लागू राहिल. 

आसना ते विमानतळ टीपॉईट, शिवमंदीर-राज कार्नर-वर्कशॉप-भाग्यनगर-आनंदनगर-नाईक चौक-अण्णाभाऊ साठे चौक-यात्री निवास-चिखलवाडी कॉर्नर-गुरुद्वारा गेट नंबर 1 कडे येणारा-जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. नाईक चौक-महाराणा प्रताप चौक ते बाफना टीपॉइटकडे  येणारा-जाणारा रस्ता हा वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. देगलूरनाका-बाफना टी पॉइट ते हिंगोली गेटकडे येणारा-जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. जुना मोंढा ते कविता रेस्टॉरेन्टकडे येणारा-जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील.   

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग 

पुर्णा रोडवरून येणारी छोटी वाहने ही छत्रपती चौक-मौर चौक-पावडेवाडी नाका-रेस्ट हाऊस मार्गे शहरात ये-जा करतील. तसेच मोठी वाहने ही शेतकरी पुतळा-कॅनॉल रोड-साई मंदीर-संकेत हॉस्टेल मार्गे नवीन आसना बायपासने आसना टी पॉइन्ट येथून महामार्गावरून बाहेर जातील. 

मालेगाव रोडने येणारी मोठी वाहने पासदगाव-संकेत हॉस्टेल तरोडा मार्गे आसना हायवेकडे जातील व छोटी वाहने छत्रपती चौक-मौर चौक-पावडेवाडी नाका-रेस्ट होऊस मार्गे ये-जा करतील. 

वाजेगावकडून येणारी वाहने वाजेगाव-देगलूर नाका-बाफना टी पॉइन्ट मार्गे हिंगोली गेटकडे येणारी-जाणारी छोट्या वाहनांची वाहतुक देगलूरनाका ते माळटेकडी रोडचा वापर करतील व मोठी वाहने वाजेगाव ते धनेगाव मार्गे बायपासचा वापर करतील. 

जुना मोंढा ते कविता रेस्टारेन्ट ते बाफना टी पॉइन्टकडे येणारी-जाणारी वाहतुक दैनाबॅक महावीर चौक-वजिराबाद चौक या रस्त्याचा वापर करतील. 

शंकरराव चव्हाण चौक मार्गे सभेसाठी येणारी वाहने माळटेकडी उडान पुलाच्या खालुन नमस्कार चौक-महाराणा प्रताप चौक मार्गे खालसा हायस्कूल पार्कीग मैदानावर जातील. 

देगलूर, बिलोली, नायगावकडून सभेसाठी येणारी वाहने केळी मार्केटच्या जवळील चैतन्य बापु देशमुख यांच्या जागेत पार्कींग करतील. 

लोहा, कंधार, उस्माननगर, मुखेडकडून येणारी वाहने यात्री निवास मैदान येथे पार्कींग करतील. 

वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून वरीलप्रमाणे शनिवार 10 जून 2023 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत या पर्यायी मार्गाची अधिसूचना नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रसिद्ध केली आहे.

0000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...