Monday, April 11, 2022

गावाचा विकास साधायचा असेल तर

सरपंच हा कडक गुरूजीच हवा

-        माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील  

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- ग्राम विकासाची संकल्पना बाहेरचा कोणी व्यक्ती येऊन आपल्या गावात राबवेल ही धारणा चुकीची आहे. आपल्या गावात जे काही चांगले होते, जे काही वाईट होते ते गावातले लोकच करत असतात, ग्रामस्थच ठरवत असतात. चांगल्या गोष्टीची मेळ साधण्यासाठी व वाईट प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावातील सरपंच हा कडक गुरुजीच्याच भूमिकेत असला पाहिजे, असे अग्रही प्रतिपादन औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

 

आज होट्टल महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमासमवेत ग्राम विकासाच्या दृष्टिने लोकप्रबोधन व्हावे यासाठी आवर्जून माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे भाषण ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.

 

या समारोपात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, नांदेड उपविभागीय अधिकारी विकास माने, देगलूरचे गटविकास अधिकारी मुक्कावार, पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर यांची विशेष उपस्थिती होती.

 

जीवन जगण्यासाठी केवळ आहाराची आवश्यकता नसते तर त्याच्याबरोबर शुद्ध हवा ऑक्सिजनची तेवढीच गरज असते. याकडे आपण लक्ष दिले नाही. चांगले ऑक्सिजन झाडे देतात. यासाठी गावकऱ्यांनी झाडांची जोपासना केली पाहिजे. ही झाडे प्रत्येक ग्रामस्थांनी पुढे येऊन लावली पाहिजेत. ती जपली पाहिजेत. आमच्या गावात प्रत्येक प्रकारची फळ झाडे लावण्यावर आम्ही भर दिला. स्मशानभूमीत जांभळाची झाडे लावली, नारळाची झाडे लावली, सिताफळाची लावली. यात 60 क्विंटल जांभळे मिळाली, 20 लाखाची नारळ झाली. गावकऱ्यांना सीताफळ सारखा रानमेवा मिळाला. आरोग्यासाठी या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा झाला, असे सांगून त्यांनी फळझाडे लावण्यावर भर दयावा, असे आवाहन केले.

 

प्रत्येक ग्रामस्थांनी आपल्या ग्राम विकासाच्या आराखड्यात सहभाग घेतला पाहिजे. साध्या कचऱ्यापासून प्रत्येक गोष्टीची वर्गवारी ग्रामपंचायतला करता आली पाहिजे. ग्रामसेवकाकडे विकासाचा दूत म्हणून सर्वांनी पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी गावातील वृद्ध, निराधार लोकांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांनी पाटोदा गावातील वृध्द आणि निराधाराचे केले जाणारे संगोपन याची माहिती दिली. गावासाठी जे काही चांगले करता येईल ती करण्याची शुद्ध भावना ही ग्रामपंचायतीची असली पाहिजे. महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोण हा बदला पाहिजे. महिलांच्या सुविधांसाठी खूप काही गोष्टी ग्रामपंचायतला करता येण्यासारख्या असतात. पिठाच्या गिरणी पासून मसाले काढणे, शेवाळ्याची मशिन, तेलाची मशीन हेही ग्रामपंचायतीने उभे केले पाहिजेत. आम्ही आमच्या गावात या सर्व गोष्टी करून त्यांना मोफत सॅनिटरी नॅपकिनही पुरवत असल्याचे त्यांनी स्पष्ट करून महिलांप्रती सन्मानाची दूरदृष्टी ठेवण्याचे आवाहन केले.

 

अर्चना सावंत व लहान मुलींनी सादर केलेल्या

लावणी नृत्यांने रसिकांची मने जिंकली

 

प्रसिद्ध लावणी नर्तिका अप्सरा आली फेम अर्चना सावंत यांनी बहारदार लावण्याद्वारे होट्टल येथे जमलेल्या हजारो ग्रामीण रसिकांची मने जिंकून महोत्सवाची सांगता केली.

 

तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात प्रथितयश गायक मंगेश बोरगावकर यांच्या सदाबाहर गाण्यांची मैफल तर खंडेराय प्रतिष्ठाणने गण-गवळण-गोंधळ हा लोककला प्रकार सादर केला. ललीत कला केंद्र पुणेच्या कुमारी श्रृती संतोष पोरवाल यांनी कथ्थक नृत्य सादर केले. ऐनोद्दीन फखरोद्दीन वारसी व त्यांच्या संचाचे बासरी वादन केले. राजेश ठाकरे यांचे शास्त्रीय गायन, डॉ. भरत जैठवाणी यांच्या शिस्यांनी शास्त्रीय नृत्य तर विजय जोशी यांनी मराठी पाऊल पडते पुढे, मराठी लोकरंग हे कार्यक्रम सादर झाले.

 

समारोपाच्या लावणी नृत्यात कु. सोनल भेदेकर, कु. विद्याश्री येमचे, कु. आराध्या सेरीकर या तीन मुलींना दिलखेचक आदांनी महोत्सवात रंगत भरली व नांदेड जिल्ह्यातील कलागुणवत्तेचा प्रत्यय दिला.

0000 




 

नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 20 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या लाख 2 हजार 799 एवढी झाली असून यातील 1 लाख 106 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 692 एवढी आहे.

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- लाख 99 हजार 850

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 79 हजार 839

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- लाख 2 हजार 799

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 106

एकुण मृत्यू संख्या-हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-00

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 

000000

सामाजिक समता कार्यक्रमात 

शासनाच्या विविध योजनांची माहिती 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे प्रबोधन जिल्हास्तरावर समता दुतांमार्फत करण्यात येत आहे. या अनुषंगाने नांदेड येथील महात्मा फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर व मध्यवर्ती बसस्थानक येथे आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सामाजिक समता कार्यक्रम 6 ते 16 एप्रिल 2022 पर्यंत सुरु आहे. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी बार्टीच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती सुजाता पोहरे, गंभीर शेंबेटवाड, बार्टीचे समतादुत विनोद पाचंगे, दिलीप सोंडारे, दिगांबर पोतूलवार, अमित कांबळे, नागनाथ कोलमारे, श्रीमती ज्योती जाधव, राणी पदमावती बंडेवार, जयश्री गायकवाड, दिपाली हडोळे व सामाजिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविकात श्रीमती सुजाता पोहरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी समतादुतांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती पथनाटय व लघुनाटिकेद्वारे उपस्थितांना दिली.  

00000





 सामाजिक न्याय भवनात महात्मा फुले जयंती साजरी 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने 6 ते 16 एप्रिल 2022 या कालावधीत सामाजिक समता कार्यक्रम सुरु आहे. थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करून त्यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने येथील सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात महात्मा जोतिराव फुले यांच्या सामाजिक कार्यांवर देविदास फुलारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.    

यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, गृहपाल गणेश भायेगावकर, सुधाकर बनसोडे, श्रीमती कविता सुकळकर, श्रीमती रविता आडे, समाज कल्याण निरीक्षक दत्ताहारी कदम, पंडित खानसोळे, कैलास मोरे, रंगराव सुर्यवंशी, श्रीमती माधवी राठोड आदींसह विविध सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

देविदास फुलारी यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्यांची अनेक उदाहरणे दिली. विद्यार्थ्याना महापुरुषांच्या जीवनावरील पुस्तकांचे नियमित वाचन करावे, असेही त्यांनी सांगितले.  प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांनी केले. या व्याख्यानास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले तर आभार सहाय्यक ग्रंथपाल श्रीमती ममता गंगातीर यांनी मानले.

0000000




लोकाभिमुख प्रशासनासाठी

आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- लोकाभिमुख प्रशासनाच्यादृष्टीने अनेक कार्यालयांचा सर्व सामान्यांशी निकटचा संबंध येतो. यात भूमिअभिलेख कार्यालयावर भूमापनाच्या कामाची महत्वाची जबाबदारी आहे. भूमापनाबाबत कार्यालयास नवीन तंत्रज्ञान काही प्रमाणात उपलब्ध झाले असून काही तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. या उपलब्ध होणाऱ्या नवीन तंत्रज्ञानामुळे मोजणी प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी मदत होणार आहे. याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. भू मोजणी कामांसाठी आवश्यक ते आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन येथे भूमापन दिन नुकताच संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस.पी सेठीया, समाज कल्याण अधिकारी बापु दासरी, हास्य कलाकार रमेश गिरी, भूमि अभिलेख विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

भूमापन दिनाचे औचित्य साधून सर्व भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांनी या शिबिरातून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यासह आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी सांगितले. हे आरोग्य शिबीर किशनलालजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रेणुकाई हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते समाज कल्याण अधिकारी बापु दासरी यांनी कर्मचाऱ्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले. 

यावेळी किनवट येथील बाल कलाकार यांनी ढेमसा नृत्याचे आकर्षक नृत्य सादर केले. भूमि अभिलेख विभागाचा इतिहास व कामकाज सांगणारे शिलालेख ते डीजीटल अभिलेख हा लघुपट सादर करण्यात आला. भूमिअभिलेख खात्याचे कामकाज कसे चालते हे याद्वारे जनतेपर्यंत पोहचवणेकर्मचारी यांचे सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व लोकसहभागासाठी सनदेचे महत्व या विषयावर पथनाटय सादरीकरण करण्यात आले.

0000








10.4.2022

 नांदेडच्या सारस्वतांचा होट्टल महोत्सवात नृत्यांजलीसह स्वराभिषेक

 

▪ ऐनोद्दीनच्या वेणुनादासह विजय जोशीच्या लोकरंगमध्ये

▪ नांदेड जिल्ह्याच्या प्रतिभेचा दिला प्रत्यय

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- ज्या स्थानिक कातळावर अप्रतिम शिल्पकलांना साकारून होट्टल येथील विविध मंदिरांच्या शिल्पकला साकारल्या त्या मंदिरातील ऐतिहासिक वैभवाला नांदेड जिल्ह्यातील सारस्वतांनी आपल्यातील अंगभूत कलेचा प्रत्यय देत होट्टल महोत्सवाचा दुसरा दिवस भारून टाकला. कर्नाटकच्या सिमेवर असलेले होट्टलचे पठार चैत्रातल्या उष्णतेला सावध घेत दिवस मावळता गणिक शीतलतेची छाया देऊन गेला. मंदिराच्या काठावर उभे राहिलेल्या रंगमंचाची दिवे जसजसे उजळत गेले तसे गणेश वंदनेने भक्तीरसाची जोड दिली.


बिलोलीचे भूमिपुत्र असलेले दिलीप खंडेराय यांचा महाविद्यालयीन जीवनापासून लोककलालोकपरंपरा यातील फार जवळून अभ्यास राहिलेला आहे. विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत त्यांनी गणगवळणगोंधळ हे महाराष्ट्रातील लोककला प्रकार प्रवाहित केले आहेत. होट्टल महोत्सवात दिलीप खंडेराय व संचाने आज बिलोली भागातील लुप्त पावत चाललेला लोककला प्रकार हलगी व सनई नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मीना सोलापूरे यांनी शिवस्तुती गीत सादर केले. 


आपल्या पत्रकारितेसह संगिताची आवड जपत नांदेड येथील पत्रकार विजय जोशी यांनी आपल्या कलोपासनेला अंतर पडू  दिले नाही. यातील साधना सुरू ठेवत त्यांनी देशप्रेमासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले. सैनिक हो तुमच्यासाठी याचे राज्यभर 50 प्रयोग त्यांनी पूर्ण केले आहेत. नव्या पिढीपर्यंत महाराष्ट्राची लोकधारा पोहचावी यासाठी लोककलेला केंद्रभूत ठेवत त्यांनी लुप्त पावत चाललेल्या अनेक लोककलांनाकलावंतांना संधी देऊन कार्यक्रमांची निर्मिती केली. दिवाळी पहाटपाडवा  पहाट अशा अनेक उपक्रमातून त्यांनी आपले गायनही सादर केले आहे. होट्टल महोत्सवात त्यांनी मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाद्वारे मराठी लोकरंगचा सुरेख प्रत्यय दिला.


कुमारी गुंजन पंकज शिरभाते हिचे व्हायोलिन वादनकिनवटच्या बोधडी येथील अंध विद्यालयातील राजेश ठाकरे यांनी महोत्सवातील कार्यक्रमाची रंगत वाढवत नेली. आपल्या वडिलांकडूनच व्हायोलिनचे धडे घेत कुमारी गुंजनने वेगळी अनुभूती होट्टल वासियांच्या प्रत्ययाला दिली. राजेश ठाकरे यांनी या महोत्सवाला आपल्या सुराभिषेकातून न्हावून काढले. मुळात मंदिराचा परिसर असलेल्या या काठाला त्यांच्या गायनाने भक्ती व भावरसाची अप्रतिम जोड देत महोत्सवाचा दुसरा दिवस सार्थकी लावला.


अर्धनारी नटेश्वराचे रुप म्हणून ज्या शिवाकडे पाहिले जाते त्याची आराधणा शिवपुष्पांजलीशिवस्तुती आणि शिवपदमद्वारे डॉ. भरत जेठवाणींचे शिष्य श्रृती पोरवालइशा जैनअथर्व चौधरीगौरी देशपांडे यांनी अप्रतिम सादरीकरण केले.


प्रारंभी सर्व कलावंतांचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने अपर जिल्हाधिकारी डॉ खुशालसिंह परदेशी यांनी स्वागत केले. आमदार जितेश अंतापूरकर यांनी सर्व कलावंताचे कौतुक केले. दुसऱ्या दिवशी रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन कवी बापू दासरी व आश्विनी चौधरी यांनी केले. 

*****








  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...