Monday, August 15, 2022

तृतीयपंथीय सेजलकडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील

सेतू सुविधा केंद्र सन्मानाने हस्तांतरीत


 ·   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

सामाजिक न्याय विभागाचा नवा अध्याय 

·  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा पुढाकार

 

नांदेड (जिमाका), दि. 15 :- भारतीय राज्यघटनेने तृतीयपंथीय अर्थात किन्नरांना इतरांसारखेच समान अधिकार बहाल केलेले असून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजना राबविल्या जातात. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातच किन्नर सेजल हिला सेतू सुविधा केंद्र आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सन्मानपूर्वक हस्तांतरीत केले. याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फित कापून प्रस्तावित होते. तथापि डॉ. इटनकर यांनी सेजलला पुढे करून तिच्याच हस्ते या सेतू सुविधा केंद्राचा शुभारंभ करून सामाजिक न्यायाचा नवा अध्याय सुरू केला. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, डॉ. सौ. शालिनी इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, समाज कल्याण आयुक्त तेजस माळवदकर, जात पडताळणी संशोधन अधिकारी सत्येंद्र आऊलवार, लातूर प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याणचे प्रतिनिधी श्री गोडबोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

 

या  अद्यावत सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन पार पडताच चार लाभार्थ्यांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे प्रातिनिधीक स्वरुपात ऑनलाईन काढून देण्यात आली. किन्नरांसाठी असलेल्या सेवाभावी संस्थाचे प्रतिनिधी गोधने, नांदेड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने किन्नरांसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठीही यापूर्वी बैठका घेऊन निर्देश दिलेले आहेत. त्यांच्या स्मशानभूमीचाही प्रश्न आता मार्गी लागला असून यात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विशेष लक्ष दिले आहे.

00000






 

 जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबाखू मुक्तीची शपथ 

नांदेड (जिमाका)दि. 15 :- भारत सरकारचा तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा व महाराष्ट्र शासनाच्या याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी उपस्थितांना तंबाखु मुक्तीची शपथ दिली. नियोजन भवन येथील सभागृहात सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यक्रमात ही शपथ घेतली.

 

शपथ

तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई-हुक्का, ई-सिगारेट व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे होणारे आजार यांच्या दुष्परीणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा  संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त रहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा व थुंकदानीचा वापर करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 तसेच महाराष्ट्र शासनाचा तंबाखूजन्य पदार्थ यांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त व ई-सिगारेट मुक्त करेन. मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन.  

00000




 


 भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

नांदेड (जिमाका)दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, प्रणिता देवरे-चिखलीकर, किशोर स्वामी, प्रवीण साले, स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आदी उपस्थित होते.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाचे हे ध्वजारोहण असल्याने या समारंभास विशेष पोलीस महानिरीक्षक ‍निसार तांबोळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगेमहापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण

मुख्य ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते पूर्व उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 2020, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी 2021, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 2021 मधील शहरी व ग्रामीण विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सन 2020 मध्ये ग्रामीण विभागात जि.प.प्रा.शा. मणिराम थडचा अनिरुद्ध राऊत, संस्कृती पेटकुले तर सीबीएसई विभागात किड्स किंग्डम पब्लिक स्कूलचा प्रद्युम्न तापडिया, ज्ञानमाता विद्याविहारची मधुरा बोडके, नागार्जुना पब्लिक स्कूलचा संकल्प तापडिया, निनाद दगडे, श्रेयस कृष्णापूरकर, निहार देशपांडे.

 

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी सन 2020 ग्रामीण विभागात जिज्ञासा विद्यालयचा क्षितिज नरवाडे तर शहरी विभागात केंब्रीज माध्य. विद्यालयाची शिवलिला भिमराव तसेच सीबीएसई विभागात नागार्जूना पब्लिक स्कूलची ऋतिका हाके, हर्षवर्धन सुकलकर, निखिल गिरी, सुमित करखेडे, ज्ञानमाता विद्या विहारची विशाखा कट्टे, स्वरा चालिकवार, प्रथमेश चकरवार, ऑक्सफोर्ड इंटर नॅशनल स्कूलचा क्रिष्णा पाटील, श्रेया बवलगावे, आदित घोडके, ऑक्सफोर्ड द ग्लोबल स्कूलचा श्रेयस लोहारे.

 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सन 2021 साठी ग्रामीण विभागात ब्लू बेल्स प्रायमरी इंग्लिश स्कूल नायगावची स्नेहा जमदाडे तर सीबीएसई विभागात ऑक्सफोर्ड इंटर नॅशनल स्कूलची प्राची जाधव, सोहम मंत्रे, नागार्जूना पब्लिक स्कूलचा मयुरेश वागशेट्टे, विघ्नेश राजे, ज्ञानज्योती पोतदार लर्न्स स्कूल बेंदी किनवटचा समर्थ मोरे.

 

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 2021 ग्रामीण विभागात श्री शिवाजी विद्यालय बारूळ कंधारचा केदार चिद्रावार तर शहरी विभागात गुजराथी हायस्कूलचा सोहम विभुते, केंब्रीज माध्य विद्यालयाचा शरयू पवार तर सीबीएसई विभागात नागार्जूना पब्लिक स्कूलचा पियुष बल्लोरे, अर्चित कोटलवार, सुमित पाटील, किड्स किंग्डम पब्लिक स्कूलचा श्रावण तम्मेवार, सार्थक दुरुगकर, ज्ञानमाता विद्याविहारचा अनिश माचेवार, ऋत्विक पबितवार, अर्थव भुरे, केंद्रीय विद्यालय रेल्वे कॅम्पसची वैष्णवी मुदखेडे, ऑक्सफोर्ड द ग्लोबल स्कूल पयुणीचा कृष्णा पिसलवार, ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचा ज्ञेय बन्नाळीकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा या पुरस्कार वितरणात समावेश आहे.

00000







  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...