Wednesday, February 28, 2024

 वृत्त क्रमांक 183

 

जिल्हा परिषदेने केलेली कार्यवाही योग्यच

उच्च न्यायालयाने कंत्राटदारांची याचिका फेटाळली

 

नांदेड दि. 28 :- जिल्हा परिषदेने काळया यादीत टाकलेल्या कंत्राटदारांनी उच्च न्यायालयात दाखल केलेले याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तथापि काही कंत्राटदार यासंदर्भात चुकीची माहिती माध्यमांना देत असून हा न्यायालयाचा अवमान आहे, असा खुलासा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आला आहे.

 

जल जीवन मिशन हा शासनाचा कालबद्ध महत्वाकांक्षी कार्यक्रम असल्याने विहीत कालावधीत कामे पूर्ण करून घेण्याचा दृष्टीकोनातून कंत्राटदारांना वेळोवेळी झालेल्या आढावा बैठकामध्ये पत्र देवून, नोटिसा देवून भ्रमणध्वनीद्वारे सुचीत करूनही कंत्राटदारांनी कामे सुरू न केल्याने काळ्या यादीत टाकण्याकरीता 15 कंत्राटदारांची शिफारस त्या-त्या कंत्राटदारांच्या नोंदणी करणाऱ्या यंत्रणांकडे शिफारसीत करण्यात आलेली आहे.  ज्या कामांची मुदत कंत्राटदारांच्या काम कमी गतीने करण्याच्या कारणामुळे संपलेली होती अशा कंत्राटदारांना जिल्हा परिषदेने घटित केलेल्या मुदतवाढ समितीने शिफारसीत केल्यानुसार दंड आकारून व जी कामे जागेच्या अडचणींमुळे व इतर स्थानिक कारणांमुळे विलंब झाला ती कामे दंडाशिवाय, 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.

 

या प्रक्रियेस काही कंत्राटदारांनी मिळून छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात रिट याचिका क्र. 1796/2024 व रिट याचिका क्र. 1795 / 2024 नुसार आव्हान देण्यात आलेले होते. परंतू उच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेने केलेल्या कार्यवाहीला उचीत गृहीत धरून 50 टक्के इतका दंड जमा करण्याचे आदेश पारीत केले आहेत.  दुसऱ्या याचीकेमध्ये काळ्या यादीत टाकावयाच्या कंत्राटदारांची नावे नोंदणी करणाऱ्या यंत्रणेकडे शिफारसीत करण्यात आलेले असल्याने, सन्माननीय न्यायालयाने दोनही बाजूंचे म्हणने ऐकुन घेवून सदरील याचीकेमधे कुठलीही स्थगिती न देता सदरील याचीका फेटाळुन लावली आहे.

 

यात काही कंत्राटदारांनी निकाल आपल्या बाजूने लागला असल्याचे दर्शविण्याचा केविलवाणा प्रयत्न करुन माध्यमांमध्ये चुकीची बातमी छापून आणली. न्यायालयाचा हा अवमान आहे. प्रशासनाच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न ते करत आहेत.  या दोनही याचिकेमध्ये प्रशासनाने घेतलेली भूमिका योग्य असल्याचे न्यायालयाच्या आदेशावरून स्पष्ट होते.तसेच ५०% दंडाची रक्कम याचिकेच्या निकालाच्या आधीन राहून जमा करण्यास सांगणे याचाच अर्थ याचिकाकर्त्यांचा याचिका दाखल करण्याचा उद्देश सफल झाला नाही हे प्रतित करते.व दुसऱ्या याचिकेमध्ये कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याकरिता त्या-त्या यंत्रणा जसे सदस्य सचिव म. जी. प्रा. मुंबई, मुख्य अभियंता, छत्रपती संभाजीनगर, अधिक्षक अभियंता म.जी.प्रा. मंडळ नांदेड अशा विविध यंत्रणांकडे  योग्य ती कार्यवाही करण्याकरीता शिफारस करण्यात आलेली असल्याने मा. उच्च न्यायालयाने या याचीकेवर कुठलिही स्थगिती न देता याचिका फेटाळून लावली आहे, असा खुलासा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी केला आहे.

000000

 वृत्त क्रमांक 182 

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री

नितीन गडकरी यांचा दौरा

 

नांदेड दि. 28 :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे 29 फेब्रुवारी 2024 रोजी नांदेड विमानतळावरून तेलंगणा येथील निजमाबाद दौऱ्यावर जाणार आहेत.

 

गुरूवार 29 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्ली विमानतळ येथून विमानाने दुपारी 2.50 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 3 वा. नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने निजामाबादकडे प्रयाण करतील. त्यानंतर निजामाबाद येथून हेलिकॉप्टरने सायं 5.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व 5.45 वा. विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील.

000000

 वृत्त क्रमांक 181 

अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी साखर  नियतन 

 

नांदेड दि. 28 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या तीन महिन्यासाठी प्रतिमाह एक किलो साखर नियतन सुलभ पॅकींगमध्ये मंजूर केले आहे. 

 

या तीन महिन्यासाठी शासनाकडून 1 हजार 548 क्विंटल साखर प्राप्त झाली आहे. पुढीलप्रमाणे तालुकानिहाय साखर नियतन देण्यात आले आहे. यात नांदेड तालुक्यासाठी 105, अर्धापूर 34, मुदखेड 38, कंधार 79.50, लोहा 27, भोकर 85, उमरी 66, देगलूर 126, बिलोली 113.50, नायगाव 119, धर्माबाद 72.50, मुखेड 188, किनवट 94.50, माहुर 209, हदगाव 99.50, हिमायतनगर 91.50  असे एकूण 1 हजार 548  नियतन साखर नांदेड जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. सर्व अंत्योदय शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्य दुकानातून वरील तीन महिण्याच्या साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

000000

 वृत्त क्रमांक 180 

जिल्हा परिषदेच्या गट-क सरळसेवा पदभरती

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड दि. 28 :-  नांदेड जिल्‍हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या  राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युत नगर नांदेड, शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर  नांदलादिग्रस, खडकूत या 2 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 29 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 179 

केंद्रीय माध्‍यमिक शिक्ष बोर्डाच्‍या

दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड दि. 28 :- केंद्रीय माध्‍यमिक शिक्षण बोर्डाच्‍या इयत्‍ता दहावी  व बारावी परीक्षा-2024 परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्‍मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 15 फेब्रुवारी ते ते 2 एप्रिल 2024  या कालावधीत ज्‍या दिवशी सदर परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडणार आहे त्‍या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/ एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

 

नांदेड जिल्ह्यात ही परीक्षा ग्‍यानमाता विद्या विहार, नसरतपुर विमानतळाजवळ कामठा रोड नांदेडकिडस् किंगडम पब्‍लीक स्‍कूल, खुरगांव, नांदुस रोड/मालेगाव रोड नांदेडनागर्जुना पब्‍लीक स्‍कूल कौठा नांदेडपोदार इंटरनॅशनल स्‍कूल पुर्णा रोड नांदेडएकलव्‍य रेजिडेन्शिअल स्‍कूल सहस्‍त्रकुंड ता. किनवटजवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर ता. बिलोली व केंद्रीय विद्यालय, सीआरपीएफ, सी टी सी-III, ता. मुदखेड येथे घेण्यात येत आहे.

0000

 वृत्त क्रमांक 178

 

मागास प्रवर्गात व्यावसाईक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना

वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

·    जिल्ह्यात विद्यार्थ्यासाठी दोन वसतिगृह मंजूर

 

नांदेड दि. 28 :- राज्यातील इतर मागास प्रवर्गविमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागस प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसाईक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जिल्हानिहाय दोन याप्रमाणे शासकीय वसतिगृह सुरु करण्यास महाराष्ट्र शासनइतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय 29 नोव्हेंबर 2022 नुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात मुलांसाठी-1 व मुलींसाठी-1 अशा दोन वसतिगृहाचा यात समावेश आहे.

गरजु विद्यार्थी व विद्यार्थींनिंनी वसतिगृहातील प्रवेशाबाबतचे अर्ज सहाय्यक संचालकइतर मागास बहुजन कल्याण नांदेडडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनजाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे वरील बाजुस नांदेड येथे संपर्क साधुन विनामूल्य अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. सदरचे अर्ज हे 10 मार्च 2024 पुर्वी या कार्यालयात सादर करावेतअसे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

एकविसावे शतक हे स्पर्धात्मक युग असून त्यामध्ये इतर मागास प्रर्गविमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्याना टिकूण राहणेइतर प्रवर्गातील विद्यार्थ्याशी स्पर्धा करणे तसेच आवश्यक ते कौशल्य व गुणवत्ता धारण करणेविद्यार्थी / विद्यार्थीनिना आर्थिकसामाजिक व शैक्षणिकदृष्टया विविध क्षेत्रात स्पर्धला तोंड देता यावे आणि शैक्षणिकदृष्टया उन्नती होणे आवश्यक आहे. या दृष्टीकोणातून व्यावसाईक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जिल्हयाच्या ठिकाणी वसतिगृहाची सुविधा नसल्याने शासनाने मुलांसाठी-1 व मुलींसाठी-1 अशी दोन वसतिगृहे नांदेड जिल्ह्यासाठी मंजुर केलेली आहेत.

सदर वसतिगृहे हे तातडीने सुरु करून इतर मागास प्रवर्गविमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसाईक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानी प्रवेश घेता यावा, असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. इयत्ता 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसाईक व बिगर व्यावसाईक अभ्यासक्रमास प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याना वसतिगृहामध्ये विनामुल्य प्रवेश ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे.

0000

 वृत्त क्रमांक 177 

भोगवदार रुपांतर करण्‍याची अंतिम मुदत मार्च  

 

नांदेड दि. 28 :- ज्‍या अर्जदार, खातेदार, संस्‍था यांना त्‍यांची जमीन भोगवटदार वर्ग-2 चे धारणाधिकार भोगवटदार वर्ग-1 मध्‍ये रुपांतरीत करुन घ्यावयाची असल्‍यास त्‍यांनी दिनांक 7 मार्च 2024 पर्यंत संबंधीत तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अधिमूल्‍याच्या रक्‍कमेचा भरणा करुन या अधिसूचनेनुसार शासकीय सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.

 

"महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणे) नियम 2019" दिनांक 8 मार्च 2019 महसूल व वनविभागाच्या अधिसूचनेनुसार भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-1 मध्ये सवलतीच्या दराने रुपांतरीत करण्याचा कालावधी हा अधिसूचनेच्या दिनांकापासून 3 वर्षापर्यंत दिला होता. त्‍यानंतर महसूल व वन विभागाची अधिसूचना दि. 27 मार्च, 2023 अन्वये सवलतीच्या दराने भोगवटदार वर्ग-2 चे धारणाधिकार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्याबाबतचा कालावधी हा 3 वर्षाऐवजी 5 वर्ष करण्यात आला आहे. सदरील अधिसूनेचा कालावधी दिनांक 7 मार्च 2024 रोजी संपुष्टात येत आहे.

 

त्‍यामुळे भोगवटदार वर्ग-2 चे धारणाधिकार भोगवटदार वर्ग-1 मध्‍ये रुपांतर करुन मिळणेबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयात ज्‍या अर्जदारांनी, संस्‍थेनी अर्ज केला असल्‍यास त्‍याप्रकरणामध्‍ये अधिमूल्याची रक्कम 7 मार्च पूर्वी शासन खाती भरणा करुन सदरील अधिसूचनेतील सवलतीचा लाभ घ्‍यावा. जे अर्जदार, संस्था भोगवटदार वर्ग-2 चे भोगवटदार वर्ग-1 मध्‍ये रुपांतर करण्‍याबाबत अधिमुल्‍यांची रक्‍कम दिनांक 7 मार्च 2024 पूर्वी शासन खाती भरणा करणार नाहीत त्‍यांना उक्‍त अधिसूचनेनुसार दिलेल्या सवलतीच्या दराचा लाभ मिळणार नाही, असे उपसचिव महाराष्‍ट्र शासन महसूल व वन विभागाचे पत्र दिनांक 21 फेब्रुवारी 2024 मध्‍ये नमूद केले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 176 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 

नांदेड दि. 28 : वीरशैव लिंगायत समाजातील सामाजिक कलात्मक समाज संघटनात्मक अध्यात्मिक प्रबोधनात्मक व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावेतअसे आवाहन करण्यात आले आहे.

 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे नांदेड येथील सहाय्यक संचालक शिवानंद मिगिरे यांनी आज यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी नियमावली बाबतचा शासन निर्णय मार्च 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयान्वये समाजातील वेगळ्या काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी अर्ज करणे मात्र अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

त्यामुळे या समाजातील जागरूक नागरिकांनी या समाजात वावरणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाची व संस्थांची माहिती लेखी स्वरूपात इतर मागास बहुजन कल्याण विभाग नांदेड यांच्याकडे 18 मार्चपर्यंत विहित केलेल्या नमुन्यामध्ये सादर करावीअसे आवाहन करण्यात आले आहे.

 

दि. मार्च 2019 शासन निर्णयामध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे. शासनाच्या वेबसाईटवर हा शासन निर्णय उपलब्ध आहे. ही माहिती शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे समाजातील सुशिक्षित तरुणांनी अशा आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती व संस्थांना ही माहिती करून द्यावी व अर्ज करण्यास प्रवृत्त करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

0000000

 वृत्त क्रमांक 175 

जागतिक महिला दिनानिमित्त पोस्ट विभागाचे महिला सशक्तीकरण

नांदेड दि. 28 :  8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डाक विभागामार्फत महिला सन्मान बचत पत्र योजना व सुकन्या समृद्धी बचत खाते योजना प्रचार प्रसार अभियान राबविण्यात येत आहे.

 

या अभियानांतर्गत 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डाक विभागातर्फे विविध पोस्टल योजनांद्वारे महिलांना सक्षम करण्यासाठीची माहिती महिला गुंतवणूकदारांना देण्याकरिता डाक विभागातर्फे महिला दिवस पर महिला सशक्तिकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

 

या मोहिमेदरम्यान महिला गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिस मधील महिला बचत सन्मानपत्र योजना,कन्या समृद्धी बचत खाते आदी संदर्भात घरोघरी जाऊन डाक विभागाचे कर्मचारीपोस्ट कर्मचारी महिलांना माहिती देणार आहे.नांदेड जिल्ह्यातील सर्व महिला मुलींनी महिला सन्मान बचत पत्र योजनासुकन्या समृद्धी बचत खाते योजनायामध्ये गुंतवणूक करावीअसे आवाहन नांदेड विभागाचे डाक घर अधीक्षक राजू पालेकर यांनी केले आहे.

000000 

 वृत्त क्रमांक 174 

मातंग समाजातील होतकरू विद्यार्थ्यांनी उद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे : शिंदे

 

महामंडळाकडे अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 28 : मातंग समाजातील विविध 12 पोट जातीतील विद्यार्थ्यांनी व सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी विविध व्यवसाय उद्योग व उद्योग समूहात काम करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्राप्त करावे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत यासाठी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

मातंग समाजातील विविध 12 फूट जातीमध्ये शिक्षणाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे समाजातील गरजूंना आता उद्योग व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. केवळ नोकरदार होण्यापेक्षा नोकरी देणारे होण्यासाठी विविध उद्योगव्यवसायसंस्था उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध प्रशिक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाकरिता 20 मार्च 2024 पर्यंत महामंडळाकडे अर्ज दाखल करावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

 

सामाजिक न्याय भवन ज्ञानमाता शाळेसमोर साहित्यरत्न लोकशाहीर ण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे कार्यालय असून याठिकाणी यासाठी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 173 

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी पोस्ट विभागाचे कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण

 

घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा : जिल्हाधिकारी

 

नांदेड दि. 28 : भारताला सौरऊर्जेमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी डाक विभागाला अर्थात पोस्ट खात्याला देण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याच्या आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

शासनाच्या विविध योजनांसाठी विविध स्तरावरचे सर्वेक्षण सुरू असते. यामध्ये आता प्रधानमंत्री सूर्य घर योजना यासाठी पोस्ट विभाग गावागावात जाऊन सर्वेक्षण करणार आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून देशातील एक कोटी कुटुंबांना महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरविण्याचा शासनाचा उद्देश आहे. या योजनेद्वारे एक कोटी घरांना सवलतीच्या दरात सौर पॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी गावागावात पोस्ट खात्याचे कर्मचारी जाणार आहेत. तसेच पोस्टमन देखील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहे. त्यामुळे या योजने संदर्भात पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणात मदत करण्याचे आवाहन पोस्ट विभागाने केले आहे. जिल्हा प्रशासनाने देखील या योजनेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 

यासंदर्भात नांदेड विभागाचे डाक घर अधीक्षक राजीव पालेकर यांनी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे कीजास्तीत जास्त संख्येत या सर्वेक्षणात सहभागी व्हावे. या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेचा लाभ घेणारा मोठा जिल्हा म्हणून नांदेड पुढे येण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहे. वीज बिलामध्ये मोठी कपात या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक घरावर सौर पॅनल उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

नांदेड जिल्ह्यामध्ये एक मुख्य डाकघर, 53 उपडाकघर, 436 शाखा डाकघर, 775 पोस्टमन असा सर्व डोलारा पोस्ट विभागाचा आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेला यशस्वी करण्यासाठी जनतेने सहकार्य करावेअसे आवाहनही राजीव पालेकर यांनी केले आहे. 

000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...