Thursday, November 23, 2017

धर्माबाद तालुक्यातील
बीएलओ, तलाठ्यांची आज बैठक 
नांदेड, दि. 23 :- मतदार नाव नोंदणी विशेष मोहिमेबाबत धर्माबाद तालुक्यातील संबंधीत बीएलओ व तलठ्यांची शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी  दुपारी 2 वा. तहसील कार्यालय धर्माबाद येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मतदार नोंदणीची माहिती घेण्यासाठी आवश्‍यक असणारे नमुने 1 ते 8, बीएलओ  नोंदवही, फॉर्म नंबर 6, 78 प्राप्त अर्जाबाबत आढावा घेण्यात येणार आहे. धर्माबाद तालुक्यातील संबंधीत बीएलओ, तलाठ्यांनी बुथ निहाय विशेष मोहिमेच्या माहितीसह उपस्थित रहावे, असे तहसिलदार धर्माबाद यांनी कळविले आहे.

000000
प्रलंबित शिष्यवृत्तीसाठी ई-स्कॉलरशीप पोर्टल सुरु
प्रस्ताव सादर करण्याची 30 नोव्हेंबरची मुदत
नांदेड, दि. 23 :- प्रथम टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सन 2015-16, सन 2016-17 साठी मार्च अखेर पर्यंत ऑनलाईन अर्ज केली आहेत परंतू शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा आदी लाभ मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडे प्रलंबित असलेले अर्ज, नुतनीकरण करावयाचे प्रस्ताव महाविद्यालयानी ई-स्कॉलरशीप संकेतस्थळावरुन गुरुवार 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे पाठवावीत, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.   
काही विद्यार्थ्यांची शुल्क, भत्ता प्रलंबित असल्याने तो अदा करण्यासाठी ई-स्कॉलरशीप हे संकेतस्थळ मर्यादित कालावधीसाठी सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा निर्वाह भत्ता, विद्यावेतन आदी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-18  साठी राज्य शासनाने सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती महा-डीबीटी पार्टलमार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला असल्याने  सामाजिक न्याय विभागाचे https://mahaeshol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ संस्थागित करण्यात आले होते.
शाळा, महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सादर केलेले सन 2015-16 व 2016-17 चे पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित आणि नुतनीकरणाचे प्रस्ताव त्वरीत सादर करावीत. अधीक माहितीचे परिपत्रक आणि वेळापत्रक www.sjsa.maharashtra.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही आवाहन समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी  केले आहे.

000000
राजमाता जिजाऊ स्वालंबन पुरस्कारासाठी
बँकर्सनी 28 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
            नांदेड, दि. 23 :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत दरवर्षी अतिउत्कृष्ट व सक्षम बचतगटांना जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार शासनामार्फत दिला जातो. जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य असलेल्या बँक शाखांनी आपले प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरुन संबंधित गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड यांचे कार्यालयात मंगळवार 28 नोव्हेंबर 2017 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रामुख्याने बँकेशी संबंधित असल्याने याअंतर्गत स्थापित स्वयंसहाय्यता गटासंबंधी जिल्हास्तरावर सन 2016-17 साठी सर्वोत्कृष्ट काम असलेल्या व पतपुरवठ्याचे जास्तीतजास्त उद्दिष्ट साध्य केलेल्या एका बँक शाखेस प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

00000
शेतकऱ्यांसाठी कृषि संदेश
            नांदेड, दि. 23 :- नांदेड कृषि उपविभागातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार या 5 तालुक्यामध्ये तूर, कापूस, हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पातंर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पिक किडीच्या संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
            कापशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेनवलेरट 20 इसी 8 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यु पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.         तुर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेंझोएट 5 एस जी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, एनएसई (निंबोळीतेल) 5 टक्के फवारणी करावी. हरभरा पिकांवरील मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी 1 टक्का डब्ल्यु पी  9 ग्रॅम प्रति किलो बियाणे बिजप्रक्रिया करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000
इंटरनेट पाहण्याचा कालावधी निश्चित असावा
                                                                                    - डॉ. नंदकुमार मुलमुले
नांदेड दि. 23 :- इंटरनेट पाहण्याचा कालावधी निश्चित केला पाहिजे. यासाठी मोबाईल वापराचा अतिरेक टाळुन मोबाईल वापरण्यात शिष्टाचार असला पाहिजे, असे प्रतिपादन "माध्यम संस्कृती   वाचन संस्कृती"  या विषयावर आयोजित परिसवांदात डॉ. मुलमुले यांनी केले.
वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी ग्रंथगुढी उभारली पाहिजे असे डॉ. हनुमंत भोपाळे म्हणाले. पुस्तकाचे वाचन काही कमी झाले नाही. अनेक पुस्तकांच्या 30 ते 50 आवृत्या निघाल्या आहेत. पुस्तकांची माहिती इंटरनेटवर जास्त कळते त्यामुळे माध्यमे पुस्तकं वाचन संस्कृती वाढण्याला नक्कीच सहाय्यभूत ठरत आहे असे डॉ. गोविंद हंबर्डे म्हणाले. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी माध्यमांचा उपयोग झाला पाहिजे असे अप्पर कोषागार अधिकारी नीळकंठ पांचगे यांनी सांगितले. स्वा.रा.ती.विद्यापिठाच्या प्राध्यापिका डॉ. शैलजा वाडीकर यांनी माध्यमामुळे एकमेकांपासून दूर जात असल्याची खंत व्यक्त केली माध्यमांचा वापर कसा करावा हे ठरविले पाहिजे असे सांगितले.
परिसंवादाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले तर संचालन द्ममाकर कुलकर्णी यांनी केले. आभार बी.जी.देशमुख यांनी  मानले.
                                कथाकथन कार्यक्रम चांगलाच रंगला
ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित पहिल्या सत्रात कथाकथन झाले त्यामध्ये डॉ. जगदिश कदम यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. नागनाथ पाटील, प्रा.नारायण शिंदे, डॉ.शंकर विभूते, रविचंद्र हडसनकर, शंभूनाथ कहाळेकर यांनी भन्नाट कथा सादर केल्या आणि प्रेक्षकांची दाद मिळविली. राजेंद्र हंबिरे यांनी आभार मानले.
000000


 विद्यार्थ्यांमध्ये लहान वयात
वाचन संस्कार केले पाहिजे
- डॉ. व्यंकटेश काब्दे
             नांदेड दि.23 :- वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना लहान वयात वाचन संस्कार केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले.
             
महाराष्ट्र शासनाचा उच्च तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय (.रा.) मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या विद्यमाने  आयोजित "नांदेड ग्रंथोत्सव 2017" च्या समारोप समारंभ प्रसंगी डॉ. काब्दे बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हण मनपाचे उपमहापौर विनय गिरडे पाटील, नगरसेवक बालाजी कल्याणकर, प्राचार्य उत्तमराव सुर्यवंशी, डॉ. सुरेश सावंत, डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ. श्याम तेलंग यांची उपस्थिती होती.
            डॉ. काब्दे म्हणाले, ज्यांना ग्रंथ गुरु लाभले त्यांचे भाग्य उजळले. वाचन संस्कृतीच देशाची प्रगती साधू शकेल. पुस्तकाची आवड निर्माण होण्यासाठी आणि वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी गाव तेथे ग्रंथालय ही संकल्पना प्रत्यक्षात रुजविली पाहिजे. शासकीय जिल्हा ग्रंथालय आणि अभ्यासिकेतून शासनामध्ये अधिकारी कर्मचारी पदावर निवड झाल्याचे एक चांगले कौतुकास्पद कार्य झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
            उपमहापौर श्री. गिरडे पाटील यांनी सिडको येथे नवीन ग्रंथालय इमारत बांधण्यात आली असून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहे. आता तेथे विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध होत आहे असे सांगितले.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, ऱ्या ग्रंथालयांनी आता ऑनलाईन सेवा सुरु केल्यामुळे पाहिजे त्या ग्रंथालयातून पाहिजे ते पुस्तक मिळवता येत आहेत.
डॉ. सावंत यांनी मागेल त्याला पाहिजे ते पुस्तक दिले तरच वाचन सस्कृंती वृध्दींगत होईल. विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीची पुस्तके देण्यामध्ये शाळांनी कुठेही कमी पडू नये. पुस्तकाची निवड करताना भावनिक बौध्दिक कुपोषणाचा प्रभाव असू नये असे सांगितले.
प्राचार्य सुर्यवंशी यांनी देखील वाचन संस्कृती संदर्भांत जुन्या काळातील उदाहरणे दिली प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी दोन दिवस चाललेल्या नांदेड ग्रंथोत्सव-2017 चा आढावा घेतला. 20 पुस्तक स्टॉल उभारण्यात आले होते. लोकांनी मोठया प्रमाणात पुस्तकांची खरेदी केली. काव्य संमेलन, तुफान विनोदी कार्यक्रम, कथाकथन, परिसवांद, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
वक्तृत्व स्पर्धेत विजयी नितिन कसबे (प्रथम), व्यंकटेश नारलावार (व्दितीय), मुक्तीराम शेळके (तृतीय), राम जाधव (उत्तेजनार्थ), वैशाली भोजने (उत्तेजनार्थ) तर निबंध स्पर्धेत विजयी कु. पायल गाढे (प्रथम), कु.पल्लवी जोगदंड (व्दितीय), कु. सुप्रिया कंकाळ (तृतीय), कु.श्रध्दा कंकाळ (उत्तेजनार्थ), कु.अनघा वटपलवाड (उत्तेजनार्थ) यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते रोख बक्षिसे प्रशस्तिपत्र देण्यात आले. संत तुकाराम सार्वजनिक वाचनालय, धानोरा आडा यांच्यातर्फे आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुरेख संचालन देवदत्त साने यांनी केल्यामुळे त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रंथोत्सव चांगल्या प्रकारे आयोजित केल्याबद्द जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांचा डॉ. काब्दे यांच्या हस्ते शालश्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. आभार तांत्रिक सहाय्यक प्रताप सुर्यवंशी यांनी मानले.
000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...