Friday, January 14, 2022

 नगरपंचायत निवडणुकीच्या दिवशी

मतदाराना सुट्टी अथवा दोन तासाची सवलत

नांदेड (जिमाका) दि. 14 :-  जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नायगाव, अर्धापूर व माहूर नगरपंचायत निवडणुकीचे मतदान मंगळवार 18 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासाची सवलत देण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासन अधिकारी शैलेश फडसे यांनी कळविले आहे. 

मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सावर्जनिक सुट्टी नायगाव, अर्धापूर व माहूर नगरपंचायत मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या-त्या मतदारसंघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बॅंका इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 553 व्यक्ती कोरोना बाधित तर 128 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 658 अहवालापैकी 553 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 475 तर अँटिजेन तपासणीद्वारे 78 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 92 हजार 742 एवढी झाली असून यातील 88 हजार 226 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 861 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 290, नांदेड ग्रामीण 31, अर्धापूर 7, भोकर 5, देगलूर 1, धर्माबाद 3, हदगाव 5, हिमायतनगर 1, कंधार 19, किनवट 25, लोहा 12, माहूर 2, मुदखेड 1, मुखेड 16, नायगांव 4, उमरी 2, अमरावती 7, औरंगाबाद 1, पुणे 3, हिंगोली 9, परभणी 20, नागपूर 1, वर्धा 1, वाशिम 3, यवतमाळ 1, कोल्हापूर 1, निजामाबाद 2, पंजाब 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 22, नांदेड ग्रामीण 4, भोकर 2, बिलोली 7, देगलूर 3, धर्माबाद 7, कंधार 33, किनवट 10, लोहा 1, माहूर 2, मुदखेड 2, मुखेड 9, नायगाव 6 असे एकूण 553 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 106, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 10, खाजगी रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

 

आज 1 हजार 861 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 389, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 432, खाजगी रुग्णालय 18 अशा एकुण 1 हजार 861 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 14 हजार 361

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 7 हजार 671

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 92 हजार 742

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 226

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.13 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-56

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 861

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 नगरपंचायत निवडणूक मतदान,

मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- नगरपंचायत नायगाव, अर्धापूर व माहूर सार्वत्रिक निवडणूक 2021-22 च्या अनुषंगाने मंगळवार 18 जानेवारी 2022 रोजी मतदानाच्या दिवशी व बुधवार 19 जानेवारी 2022 रोजी मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागु करण्यात आले आहे. 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नगरपंचायत नायगाव, अर्धापूर, माहूर सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी 18 जानेवारी रोजी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील व 19 जानेवारी 2022 रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशा मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामव्यतीथ्रकत खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे.

हा आदेश नगरपंचायत नायगाव, अर्धापूर व माहूर सार्वत्रिक निवडणूक 2021-22 च्या मतदानांच्या दिवशी मंगळवार 18 जानेवारी रोजी मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत आणि मंगळवार 19 जानेवारी रोजी मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरु झाल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील.  

00000

 कोविड बाधितांच्या मार्गदर्शनासाठी

जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियंत्रण कक्ष

 

·         लसीकरणासाठी सर्व शासकीय यंत्रणा दक्ष

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- नांदेड महानगरात या आठवड्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गत दोन दिवसांपासून दररोज चारशेच्यावर बाधित आढळून येत असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. नागरिकांना या नियंत्रण कक्षाद्वारे योग्य मार्गदर्शन व्हावे व त्यांना आवश्यक ती उपचाराची माहिती मिळावी या उद्देशाने हा नियंत्रण कक्ष कार्यरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. या नियंत्रण कक्षाशी गरजूंनी 02462-262626 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

 

कोविड-19 पासून दूर राहण्यासाठी मास्कसॅनिटायझर व गर्दीपासून दूर राहणे हा सर्वोत्तम उपाय आहे. नागरिकांनी याचे अधिक गांभीर्याने पालन करणे गरजेचे आहे. तथापि जे नागरिक बाधित झाले आहेत अथवा ज्यांना कोविड-19 ची लक्षणे आहेत त्यांनी 02462-262626 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपल्या शंकेचे निरसन करता येईल. याचबरोबर कोविड-19 प्रादुर्भावाच्या औषधांची माहितीआवश्यक असलेल्या वर्तणाबाबतची नियमावली तसेच कोविड बाधितांचे समुपदेशन या केंद्रामार्फत केले जात आहे. जे नागरिक विलगीकरणामध्ये आहेत त्यांना योग्य तो सल्ला देण्यासाठी नियंत्रण कक्षात कुशल स्वयंसेवक यांची नियुक्ती केली असून गरजू नागरिकांनी अधिक भांबावून न जाता 02462-262626 या क्रमांकावर संपर्क साधावा असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

 

जिल्ह्यात अधिकाधिक प्रमाणात लसीकरण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे स्वत: प्रत्येक गावनिहाय आढावा घेत असून सर्व यंत्रणांचा समन्वय साधून प्रत्येक विभाग प्रमुखांना यात दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.  

0000000    

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...