Thursday, December 8, 2022

 श्री खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

नांदेड (जिमाका) दि. 8 :- माळेगाव येथील खंडोबा यात्रेतील पालखी मिरवणूक व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे. त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व शांतता रहावी म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये 20 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्रीपासून ते 28 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात व माळाकोळीचे सहा. पोलीस निरीक्षक माणिक डोके यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलम अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार प्रदान केले आहेत. 


श्री खंडोबा यात्रेत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, इतर राज्यातून भाविकांची दर्शनासाठी व यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याअनुषंगाने रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे हे फर्मविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबद्दल. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यांमध्ये, घाटांत किंवा घाटांवर, सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवालये आणि सार्वजनिक स्थळी किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखण्याबद्दल. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना देण्यासंबंधी. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राखणे कामी योग्य आदेश देण्याबाबत. 

कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात व माळाकोळीचे सहा. पोलीस निरीक्षक माणिक डोके यांचेकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सुचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीर सभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. परवानगी दिलेल्या जाहिर सभा/मिरवणूका/पदयात्रा यात समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असे आदेशही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत.

00000

 जिल्ह्यात गोवर आणि रुबेलाबाबत

घाबरून न जाता काळजी घ्या

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत     

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- गोवर व रुबेलाचा प्रभाव जिल्ह्यात वाढू नये, याचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य विभाग दक्ष आहे. यादृष्टिने जिल्ह्यात 15 ते 25 डिसेंबर या कालावधीत विशेष लसीकरण मोहिम हाती घेतली जाणार असून अधिकाधिक पालकांनी आपल्या मुलांना आणून या लसीची मात्रा घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

गोवर व रुबेला दूरीकरण जिल्हा टास्क फोर्सची बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) रेखा काळम आदी अधिकारी उपस्थित होते.

 

नांदेड महानगरात सुमारे 65 हजार बालकांची संख्या आहे. गोवरचा आजार लहान मुलांना होऊ नये यासाठी बालकांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक असून महानगरपालिकेने यात अधिक भर देऊन काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी  दिल्या. हा आजार जिल्ह्यात होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सर्व आरोग्य यंत्रणेने सर्व्हीलन्स, शाळेत जर मुले गैरहजर असतील त्यांच्याबाबत चौकशी यावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

00000



 सर्व पक्षीय सहभागातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा

अमृत महोत्सव अधिक लोकाभिमूख करू

- खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

 

·         सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत

सर्वसमावेशक समितीचा शासन निर्णय    

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- अनेक अर्थाने महत्वपूर्ण असलेला मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव अधिक व्यापक व सर्वसमावेशक व्हावा यासाठी शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शासन निर्णयाद्वारे समिती गठीत केल्याची माहिती खासदार तथा या समितीचे अध्यक्ष प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. हे अमृत महोत्सवी वर्षे लोकशाही मुल्यांच्यादृष्टिने, सांस्कृतिक मुल्यांच्यादृष्टिने अधिक व्यापक व्हावे यासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींसह साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांची समिती आवश्यक होती, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील कला, साहित्य, इतिहास या क्षेत्रात भरीव योगदान देणारे साहित्यिक यांचा समावेश करतांना अधिक आनंद असल्याचे ते म्हणाले.

 

या समितीच्या अशासकीय सदस्यपदी माजी पालकमंत्री आमदार अशोकराव चव्हाण, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकरराव श्रृंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार तुषार राठोड, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार सुभाषराव साबणे यांची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

 

याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव, नांदेड मसापचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, प्रा. सुरेश सावंत, श्रीमती वृषाली माधवराव किन्हाळकर, प्रा. जगदीश कदम, देविदास फुलारी, यशवंत गादगे, ज्येष्ठ गायक संजय जोशी, श्रीमती आनंदी विकास, रत्नाकर आपस्तंभ, ज्येष्ठ नाट्यकर्मी लक्ष्मण संगेवार, नाथा चिंतळे, प्रा. निवृत्ती कौसल्ये, राजेश कपूर, राम तुप्तेवार, डॉ. सान्वी (भरत) जेठवाणी, शाहीर रमेश गिरी हे अशासकीय सदस्य आहेत.

 

ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, संपादक विजय सोनवणे, संपादक शंतनू डोईफोडे, पत्रकार विजय जोशी,  चारुदत्त चौधरी, प्रल्हाद उमाटे, व्यंकटराव गोजेगावकर, प्रविण साले, दिलीप कंदकुर्ते, गंगाधरराव जोशी, सुनील नेरलकर, प्रविण पाटील चिखलीकर, मिलिंद देशमुख, डॉ. शाम तेलंग, ॲड दिलीप ठाकूर, सुरेश गायकवाड, दिपकसिंह रावत यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

 

शासकीय सदस्य म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, उपवनसंरक्षक, अधिक्षक अभियंता, जिल्हा माहिती अधिकारी, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई हे या समितीचे शासकीय सदस्य म्हणून असतील.

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत आयोजित करावयाच्या कार्यक्रमाचे नियोजन व रुपरेषा याबाबत सदर समिती संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यामार्फत शासनास शिफारस करेल. समितीची ही कार्यकक्षा असून दिनांक 30 सप्टेंबर 2023 किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत ही समिती कार्यरत राहील.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...