Wednesday, January 1, 2020


हरवलेल्या इसमाचा शोध
नांदेड, दि. 1 :  मिलननगर नांदेड येथील फेरोजखॉ अन्सारखॉ पठाण (वय 35 वर्षे) हा 3 डिसेंबर पासून घरुन निघुन गेला आहे. या इसमाची उंची 170 सेमी, रंग सावळा, बांधा मजबुत, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व भुरखट पॅन्ट, पायात चप्पल आहे. या वर्णनाचा इसम दिसल्यास पोलीस स्टेशन नांदेड (ग्रा.) येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक पो. स्टे. नांदेड (ग्रा.) यांनी केले आहे.
००००


हरवलेल्या इसमाचा शोध
नांदेड, दि. 1 :  हिलालनगर नांदेड येथील शेख आलम शेख महेबुब (वय 32) हा 20 डिसेंबर पासून घरुन काही न सांगता निघुन गेला आहे. या इसमाचा रंग सावळा, चेहरा गोल, उंची 5 फुट 3 इंच, बांधा मध्यम, कपडे पॅन्ट शर्ट व पायात बुट, भाषा हिंदी व मराठी येते. या वर्णनाचा इसम दिसल्यास पोलीस स्टेशन नांदेड (ग्रा.) येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक पो. स्टे. नांदेड (ग्रा.) यांनी केले आहे.
००००


वाहनांचा व्यवसायकर निर्धारणानंतर  
ऑनलाईन कराचा भरणा करता येणार   
नांदेड, दि. 1 : परिवहन संवर्गातील वाहनांचा व्यवसायकराचे निर्धारण करण्यासाठी संबंधीत वाहन मालक, चालकांनी नांदेड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील व्यवसाय कर विभागाशी संपर्क साधावा. तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे व्यवसायकराच्या रक्कमेचे निर्धारण केल्यानंतर सदर कराचा भरणा ऑनलाईन पध्दतीने www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर E-payment हा पर्याय निवडून करता येईल.
बुधवार 1 जानेवारी 2020 पासून परिवहन संवर्गातील वाहनांचा व्यवसाय कर हा फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार आहे. त्यामुळे परवानाधारक यांचा व्यवसाय कर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे  स्विकारला जाणार नाही, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून यापूर्वी करण्यात आले होते. त्यामध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे. व्यवसायकराचे निर्धारण करण्यासाठी संबंधीत वाहन मालक, चालकांनी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील व्यवसाय कर विभागाशी संपर्क साधावा. तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे व्यवसायकराच्या रक्कमेचे निर्धारण केल्यानंतर सदर कराचा भरणा ऑनलाईन पध्दतीने www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर E-payment हा पर्याय निवडून करु शकतात. याबाबत नांदेड जिल्हयातील सर्व चालक, मालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
००००


संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्र कामकाजासाठी
स्वयंसेवी संस्थांना प्रस्ताव करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 1 : स्वयंसेवी संस्थांकडून वन स्टॉप क्रायसेस सेंटर (संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्र) चे दैनंदिन कामकाज हाताळण्यासाठी नेमावयाच्या पात्रताधारक संस्थेसाठी प्रस्ताव शुक्रवार 10 जानेवारी 2020 पर्यंत मागविण्यात आले आहेत.
 या केंद्राचे दैनदिन कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या वन स्टॉप क्रायसेस सेंटरच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे, पात्रताधारक एजन्सीची निवड करावयाची आहे. योजनेच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये नमुद केल्यानुसार नांदेड जिल्ह्यातील महिलांविषयक कायदे व योजनांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था, अशा स्वयंसेवी संस्थांमधून पात्रताधारक संस्थेची निवड करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील नमुद मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांकडून शुक्रवार 10 जानेवारी 2020 अखेर परिपूर्ण प्रस्ताव (अर्जात नमुद मुद्यांप्रमाणे पृष्ठांकीत केलेला) मागविण्यात आले आहेत.
इच्छूक नमुद मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्जाचा नमुना सोमवार 6 जानेवारी 2020 पर्यंत जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, 24 - गणेशकृपा, शास्त्रीनगर (भाग्यनगर जवळ), नांदेड- 431605 येथे शासकीय सुट्या वगळता उपलब्ध राहील. या कार्यालयाने वितरीत केलेल्याच अर्जाचा नमुना, निवड प्रक्रीयेदरम्यान विचारात घेतला जाईल, असे आवाहन अध्यक्ष जिल्हा व्यवस्थापन समिती तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून नांदेड जिल्ह्यासाठी वन स्टॉप क्रायसेस सेंटर मंजूर करण्यात आले आहे. हे केंद्र तात्पुरत्या स्वरुपात, लाल बहादुर शास्त्रीनगर नांदेड येथे श्री नारायण कामाजी गोरे यांची इमारत रविदास निवास, घर क्र. 1/12/849 येथे दि. 13 जून 2017 पासून जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन व कायदेशिर मदत इ. तातडीने उपलब्ध होईल यासाठी कार्यान्वीत करण्यात आली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात नमूद केली आहे.
००००

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...