Wednesday, January 1, 2020


वाहनांचा व्यवसायकर निर्धारणानंतर  
ऑनलाईन कराचा भरणा करता येणार   
नांदेड, दि. 1 : परिवहन संवर्गातील वाहनांचा व्यवसायकराचे निर्धारण करण्यासाठी संबंधीत वाहन मालक, चालकांनी नांदेड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील व्यवसाय कर विभागाशी संपर्क साधावा. तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे व्यवसायकराच्या रक्कमेचे निर्धारण केल्यानंतर सदर कराचा भरणा ऑनलाईन पध्दतीने www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर E-payment हा पर्याय निवडून करता येईल.
बुधवार 1 जानेवारी 2020 पासून परिवहन संवर्गातील वाहनांचा व्यवसाय कर हा फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार आहे. त्यामुळे परवानाधारक यांचा व्यवसाय कर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे  स्विकारला जाणार नाही, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून यापूर्वी करण्यात आले होते. त्यामध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे. व्यवसायकराचे निर्धारण करण्यासाठी संबंधीत वाहन मालक, चालकांनी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील व्यवसाय कर विभागाशी संपर्क साधावा. तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे व्यवसायकराच्या रक्कमेचे निर्धारण केल्यानंतर सदर कराचा भरणा ऑनलाईन पध्दतीने www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर E-payment हा पर्याय निवडून करु शकतात. याबाबत नांदेड जिल्हयातील सर्व चालक, मालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
००००

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...