Monday, August 1, 2022

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  4.70 मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 1 :- जिल्ह्यात सोमवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 4.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 752.90 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सोमवार 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 17.40 (712.70), बिलोली-1.40 (728), मुखेड- 1.80 (682.90), कंधार-00 (693.50), लोहा-7.10 (682.30), हदगाव-5.50 (709.30), भोकर-7 (881.10), देगलूर-2 (640.50), किनवट-0.70 (859.80), मुदखेड- 0.40 (894.20), हिमायतनगर-00 (1029.30), माहूर- 0.50 (680.30), धर्माबाद- 3.30 (877.40), उमरी- 1.10(918.90), अर्धापूर- 2.30 (679.90), नायगाव-16.80 (683.80मिलीमीटर आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 74 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, किनवट 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकूण 6 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 182 एवढी झाली असून यातील 1 लाख 420 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 70 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 7  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 4 असे एकूण 11  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 56, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 12, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2 असे एकुण 70 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 13 हजार 57
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 92 हजार 487
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 182
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 420
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.32 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-02
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 02
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-70
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00
0000

 नांदेड जिल्ह्यातील 125 शाळांमध्ये

बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रम

 

नांदेड (जिमाका) दि.  1 :- शालेय विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्याबाबत जाणीव आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात विशेष उपक्रम हाती घेतला आहे. महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, आणि एसबीसी 3 मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील 125 जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.यातून जिल्ह्यातील 3 लाख विद्यार्थी व 6 लाख पालकांपर्यंत बालविवाह निर्मूलनाच्या संदेश पोहचणार आहे.


या कार्यक्रमाची सुरूवात नांदेड येथून झाली असून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर- घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातील महिला व स्वयंसेवक यांना प्रशिक्षण करून त्यांच्या मार्फत मोफत कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

याबाबत नांदेड येथे 30 व 31 जुलै   रोजी दोन दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी मिलिंद वाघमारे, गजानन जिंदमवाड, एसबीसी 3 मुंबईच्या संस्थापक सीमा कोनाळे, स्मिता फुलझेले, प्रकल्प समन्वयक दिना सायमूल यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम नांदेड, हिंगोली, परभणी, व जिल्ह्यातील 94 महिला व स्वयंसेविका व सामाजिक संस्थेचे पर्यवेक्षक यांच्या सहभागाने राबविण्यात येत आहे.

0000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...