वृत्त क्र. 648
11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
नियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे
- विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप
नांदेड दि. 21 जून :- नियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे. सर्वांनी या योग दिनाच्या औचीत्याने नियमीत योगा करुन आपले आरोग्य सुदृढ करावे, असे आवाहन विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले. आज 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आयुष मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, योग विदया धाम, पतंजली योग समिती, जिल्हा योग संघटना, योग विद्येचा प्रसार करणाऱ्या स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी व विविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज 21 जून,2025 रोजी सकाळी 7 वा. पोलीस परेड मैदान, वजिराबाद, नांदेड येथे या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी अनन्या रेडडी, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधीक्षक श्रीमती अश्विनी जगताप, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित नागरिकांना करो योग रहो निरोग असा संदेश देवून 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने 21 जूनहा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी सन 2014 च्या राष्ट्रीय महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगादिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. योगा दिनाच्या निमीत्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती अंगीकारणे, ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. योगा हा आपल्या भारतीय संस्कृती वारसाचा अविभाज्य घटक आहे.
याप्रसंगी योग विदयाधाम व पतंजली योग समिती यांचेमार्फत उपस्थितांना आयुष मंत्रालय, भारतसरकार च्या प्रोटोकालनुसार पोलादवार (योगगुरु), श्रीमती शकुतंला कलंबरकर,श्रीमती अनिता नेरकर, श्रीमती राणी दळवी,श्रीमती सुजाता गोरेआदीनी योगासनाचे धडे दिले. याप्रसंगी संजय पवार, रवी पालमकर, रेणगुंटवार, श्रीमती श्रृती चिंतावार, श्रीमती मंगला जोंधळे, नारायण आष्टुकर आदी योगसाधकाच्या कृती मधील सुधारणा करण्याचे काम केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रलोभ कुलकर्णी यांनी तरआभार माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी मानले.
या योग दिन कार्यक्रमासाठी जिल्हयातील पिनॅकल इंग्लिश मेडीयम स्कुल, डीव्हीएम इंग्लिश मेडीयम स्कुल, व विविध शाळा/संस्थेतील विदयार्थी, जिल्हयातील एकविद्य क्रीडा संघटनेचे खेळाडू मुले-मुली व पदाधिकारी तसेच जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी, पोलीस अधिकारी/ कर्मचारी, एसडीआरएफचे अधिकारी/कर्मचारी, जिल्हा योग संघटना व योग विद्येचा प्रसार करणा-या स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी व योगप्रेमी आदीनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवला.
हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यासन प्रमुख राज्य क्रीडा मार्गदश्रक बालाजी शिरसीकर, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपुल दापके, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण,आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, यश कांबळे, सोनबा ओव्हाळ आदीनी सहकार्य केले.
00000