वृत्त क्र. 649
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात योग दिन साजरा
नांदेड दि. 21 जून :-आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व विचार विकास मंदिर नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज 21 जून रोजी जिल्हा ग्रंथालयात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात योग प्रशिक्षकांनी योगा विषयी माहिती देवून प्रात्यक्षिके करुन दाखविली. यावेळी सर्व योग साधकांना व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासण्यासाठी सभासद होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले. यावेळी योग साजरा करण्याचे महत्व सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच विचार विकास मंदिर विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक यांची उपस्थिती होती.
000
No comments:
Post a Comment