Tuesday, March 12, 2019


रमेश घोडेकर बेपत्ता विद्यार्थ्यांची
माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन  
नांदेड दि. 12 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (जुने) वसंतनगर रोड लोहिया कॉम्प्लेक्सच्यामागे आनंदनगर नांदेड येथील विद्यार्थी रमेश रामचंद्र घोडेकर (वय 19) हा गुरुवार 7 मार्च 2019 रोजी वसतिगृहातून पुर्वसूचना न देता निघून गेला आहे. या विद्यार्थ्याची माहिती मिळाल्यास वसतिगृहास किंवा शिवाजीनगर पोलिस स्टेशन नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
रमेश घोडकर हा विद्यार्थी देशमुखनगर बिलोली येथील रहिवाशी असून वसतिगृहात राहून नांदेड फॉर्मसी कॉलेज येथे प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारा आहे. हरवल्याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे करण्यात आली आहे.
रामेश घोडकर या विद्यार्थ्याचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग- काळासावळा, उंची 5 फुट 2 इंच, बांधा- सडपातळ, भाषा- इंग्रजी, हिंदी, मराठी येते. पोशाख – निळा शर्ट व निळी जीन्स पॅट या विद्यार्थ्यांची माहिती मिळाल्यास त्वरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह (जुने) आनंदनगर नांदेड येथील वसतिगृह कार्यालय 02462-284836 गृहपाल मोबाईल क्र. 9697254444, 8888056859 तसेच शिवाजीनगर पोलिस स्टेशन नांदेड पो. हे. कॉ. आर. एस. घुगे मो. क्र. 9284848994 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
0000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...