Thursday, March 4, 2021

 नांदेड जिल्ह्यात 125 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू  

1 हजार 799 अहवालापैकी 1 हजार 658 निगेटिव्ह

नांदेड (जिमाका) दि. 4 :- गुरुवार 4 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 125 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 60 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 65 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 81 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 1 हजार 799 अहवालापैकी 1 हजार 658 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 31 एवढी झाली असून यातील 22 हजार 516 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 698 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

बुधवार 3 मार्च 2021 रोजी किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 603 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 58, मुखेड कोविड रुग्णालय 2, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 12 असे एकूण 81 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 93.69 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 45, लोहा तालुक्यात 7, हिंगोली 3, नांदेड ग्रामीण 3, माहूर 1, यवतमाळ 1 असे एकुण 60 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 36, भोकर तालुक्यात 1, धर्माबाद 4, माहूर 2, किनवट 1, उमरी 1, नागपूर 1, नांदेड ग्रामीण 3, देगलूर 6, लोहा 3, मुखेड 4, हिंगोली 2, यवतमाळ 1 असे एकूण 65 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 698 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 39, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 62, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 29, किनवट कोविड रुग्णालयात 19, मुखेड कोविड रुग्णालय 5, हदगाव कोविड रुग्णालय 6, महसूल कोविड केअर सेंटर 52, देगलूर कोविड रुग्णालय 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 274, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 109, खाजगी रुग्णालय 97 आहेत. 

गुरुवार 4 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 146, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 35 हजार 470

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 7 हजार 123

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 31

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 516

एकुण मृत्यू संख्या-603

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 93.69 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-201

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-698

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-18.

0000

 

वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत

नांदेड (जिमाका) दि. 4 :-:- शासन निर्णयान्वये राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत देण्यात आली होती. याबाबत या उद्योगाच्या संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने या कालावधीत वाढ करण्यात येत असुन नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 मे, 2021 पर्यंत देण्यात येत आहे. या मुदतीत जर संबंधित यंत्रमागांनी अर्ज केला नाही तर त्यांची वीज सवलत जो पर्यंत ते यंत्रमाग घटक नोंदणी करीत नाहीत तो पर्यंत बंद करण्यात येईल.

शासन निर्णयान्वये 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांना नोंदणी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारक ऑफलाईनद्वारे सादर करावयाचा अर्ज वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईटवर डाऊनलोड करुन आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे सादर करु शकतात असे शीतल तेली-उगले, भा.प्र.से. आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी कळविले आहे.

*****

 

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...