Friday, March 24, 2023

 'दिलखुलासकार्यक्रमात नांदेड जिल्हा परिषदेच्या 

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुलाखत

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर शनिवार दि. 25 व सोमवार दि. 27 मार्च 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

 

राज्यात ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदांची भूमिका ही महत्वपूर्ण ठरत असते. त्याअनुषंगानेच नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कोणते नाविन्यपूर्ण लोकाभिमुख उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत याबाबतची माहिती नांदेड जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ‘दिलखुलास’  कार्यक्रमातून दिली आहे. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000000



 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी

नवीन अर्ज करण्यास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23 साठी पात्र विद्यार्थ्यांना नविन अर्ज करण्यासाठी  31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपला अर्ज http://www.syn.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर भरुन त्या अर्जाची प्रत (प्रिंट) 31 मार्च 2023 पर्यत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक नांदेड येथे कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर नांदेड यांनी केले आहे.

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 13 जून 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.

 

लाभाचे स्वरूप या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणिक संस्था याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे आहे. भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता 15 हजार रुपये, निर्वाह भत्ता 8 हजार रुपये, प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम 51 हजार रुपये, वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल. 

 अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रे व संकेतस्थळ- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना या  http://www.syn.mahasamajkalyan.inसंकेतस्थळवर उपलब्ध आहे. गरजू विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून सदर अर्जाची एक प्रत सहाय्यक आयुक्त कार्यालयातील स्वाधार शाखेकडे जमा करावी, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 मान्सूनपूर्व उपाययोजनेबाबत संबंधित

विभागाने सतर्क राहून कामे करावीत

-   जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरात अनिनो समुद्र प्रवाह सक्रिय झाला आहे. त्याचा आपल्या देशातील मान्सूम हवामान पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हयात येत्या काळात पाणी टंचाई भासू नये यादृष्टीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्देश दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूम पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. याबैठकीत विभागनिहाय आढावा घेतांना त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना निर्देश केल्या. पाटबंधारे विभागाचे अधिकारीसार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंताविजवितरण कंपनीचे अधिकारीआरोग्य विभागाचे अधिकारीनगर पालिका प्रशासनउपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

   

उन्हाळयात नागरी भागात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विष्णुपुरी जलाशयातील पाणीसाठा नियंत्रित करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या. ग्रामीण भागातही पाणी पुरवठाबाबतचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतला. पाण्याच्या अवैध उपसावर नियंत्रण करुन वेळ पडल्यास टॅकरची व्यवस्था करण्यात यावी. पाण्याचे आराखडे तयार करावेत. तसेच याशिवाय आवश्यकता भासल्यास महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन रोजगार विभागानी करावे. पिण्याच्या पाण्यासाठी रेन हार्वेस्टिंगजलयुक्त शिवारजलसिंचनअटल भूजल आदी योजना मिशन मोडवर अभियान स्वरुपात राबवाव्यात. जलजीवन मिशनमध्ये जी कामे अपूर्ण आहेत ती जलद गतीने पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला दिल्या. तसेच उन्हाळयात वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी पाणवठेजलपात्र उपलब्ध करुन देण्याच्या सूचना वन विभागाला दिल्या.

 

या बैठकीत जुलै ते ऑगस्ट महिन्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनाचा कृती आराखडा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नांदेड जिल्ह्यातील गोदावरीसह पैनगंगा, आसना, मन्याड, पुर्णा आदी नद्या आणि पाझर तलाव यांची संख्या लक्षात घेता दरवर्षी मान्सूम पूर्व कामाच्या नियोजनात प्रत्येक विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे. याचबरोबर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांमध्ये लहान-मोठे पाझर तलाव यांची संख्याही अधिक आहे. हे तलाव अपेक्षित पर्जन्यमान झाल्यास अधिक सुस्थितीत व सुरक्षित राहण्याच्यादृष्टिने सर्व संबंधित विभागाने अधिक दक्षता घेतली पाहिजे. छोटया नदी नाले यांना थोडया वेळात पूर येतात यावेळी विशेष काळजी घेण्यासाठी प्रत्येक गावात अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन आराखडा 1 मे रोजी ग्रामसभेत मांडण्यात यावा.

 

रस्त्याचेपुलाचे ऑडीट करुन आपत्तीच्या परिस्थितीत वाहतूक विस्कळीत होणार नाही यांची काळजी घ्यावी असे निर्देश संबंधित विभागाना दिले. पावसाळयात औषधाच्या उपलब्धतेबाबत आरोग्य विभागाने माहिती सादर केली. तसेच आरोग्य विभागाला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास औषधे पुरवठा आवश्यक तेवढा ठेवण्याबाबतच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच विद्युत विज वितरण कंपनीने नागरिकांची गैरसोय होवू नये यांची काळजी घ्यावी.  सर्व तहसिलदारकृषी अधिकारी यांनी अवर्षण किंवा अतिवृष्टी काळात दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

00000

 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...