Friday, July 15, 2022

 नांदेड जिल्ह्यात 11 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 152 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, उस्मानाबाद  1, धर्माबाद 1, हिंगोली 1 , देगलूर 1, किनवट 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे मुखेड 1, बिलोली 1 असे एकूण 11 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 989 एवढी झाली असून यातील 1 लाख 261 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 36 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 2  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 2 असे एकुण 4  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 14, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 18, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, अश्विनी हॉस्पिटली 3 असे एकुण 36 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 10 हजार 489
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 90 हजार 156
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 2 हजार 989
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 261
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.36 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-36
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
0000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 7.80 मि.मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात शुक्रवार 15 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 7.80मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 588.20 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात शुक्रवार 15 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 0.20 (576.70), बिलोली-21 (623.40), मुखेड- 3.70 (529.30), कंधार-2.70 (594.40), लोहा-1.60 (550.90), हदगाव-3.70 (537.70), भोकर- 3.80 (664.90), देगलूर-5.70 (499.50), किनवट-12.40 (605.80), मुदखेड- 2.90 (749.50), हिमायतनगर-4.60 (784.80), माहूर- 13.30 (495.90), धर्माबाद- 24.70 (615.80), उमरी- 21.50 (722.40), अर्धापूर- 6.20 (574.70), नायगाव- 7.10 (542.50) मिलीमीटर आहे.
0000

सातबाऱ्यावर यावर्षी पेरलेल्या पिकांची

नोंद नसली तरी पिक विमा भरता येतो 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-  नांदेड जिल्ह्यामध्ये विविध समाजमाध्यमांद्वारे पिक विमा भरतांना सातबाऱ्यावर यावर्षीच्या पिकाची नोंद आवश्यक असल्याबाबत चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. त्याऐवजी अद्ययावत सातबारा व पिक पेरणीबाबत स्वयंघोषणा पत्र आवश्यक आहे. सातबाऱ्यावर यावर्षी पेरलेल्या पिकांची नोंद नसली तरी देखील पिक विमा भरता येतो. 

पिक विमा नोंदणीच्या अंतिम आठवड्यामध्ये पोर्टलवर जास्त दाब येऊन पोर्टल हळू होते परिणामी पिक विमा भरताना अडचणी येतात. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी पिक पेरणीचे (सात-बारावर पिक नोंदीची आवश्यकता नाही) स्वयंघोषणापत्र देऊन अंतिम मुदतीची वाट न बघता पिक विमा योजनेमध्ये लवकरात लवकर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

00000

पिक विमा भरल्यानंतर ई-पिक पाहणीअंतर्गत

पिकांची नोंद करण्याचे आवाहन  

 नांदेड (जिमाका) दि. 15 :- शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदवल्यानंतर / पिक विमा भरल्यानंतर शेतात पेरलेल्या पिकांची ई-पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

शेतकरी पिक पेरणीबाबत स्वयंघोषणापत्र देऊन विमा योजनेत सहभागी होतात परंतू प्रत्यक्ष काही शेतात पेरलेले पिक वेगळे असते. शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या पिकांचाच विमा होणे आवश्यक आहे. विमा घेतलेले पीक शेतात पेरले नसल्यास शेतकऱ्यांचा विमा अर्ज बाद केला जाऊन त्याचे भरलेला विमा हप्ता जप्त केला जातो आणि त्यास विमा नुकसान भरपाईचा कोणताही दावा मिळत नाही. 

शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेनंतर घेतलेल्या पिक संदर्भात त्यांनी चालू हंगामात ई-पिक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहित धरण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी स्वयंघोषणापत्रात नोंदविलेल्या पिकांचीच नोंद वेळेत ई-पिक पाहणीद्वारे करुन घ्यावी.

00000

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  लागू

नांदेड (जिमाका) दि. 15 :- नांदेड जिल्ह्यात सोमवार 18 जुलै रोजी सकाळी  6 वाजेपासून ते 1 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात सोमवार 18 जुलै 2022  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते सोमवार 1 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000


शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिके कुजण्याची भीती,

साचलेले पाणी वेळीच शेताच्या बाहेर काढा

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून पावसाचा जोर चालू आहे. त्यामुळे अनेक शेतात पाणी साचले आहे. यात ज्या शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने पेरणी केली आहे. अशा पेरणी केलेल्या ठिकाणी पाणथळ जमिनीत पाणी साचल्याने शेतामधील पिके कुजण्याची भीती आहे. त्यामुळे हे पाणी वेळीच शेताच्या बाहेर काढण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

 

जिल्ह्यातील 93 महसुल मंडळापैकी 80 मंडळात अतिवृष्टी झाली असून अनेक शेतात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या मार्गदर्शनात घरघुती सोयाबीन बियाणे वापर बीज प्रक्रिया करून योग्य खोलीवर पेरणी केली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ यंत्रसरी वरंबा वर टोकन पद्धतीने लागवड तसेच बेडवर टोकन यंत्राद्वारे पेरणी केल्यामुळे पावसाचे पाणी सरीमध्ये जमा होऊन शेताबाहेर काढण्यास मदत झालीपरंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी पारंपारिक पेरणी यंत्राद्वारे पेरणी केलेल्या ठिकाणी पाणथळ जमिनीत पाणी साचत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. या पाण्यामुळे पिकांची मुळाद्वारे श्वसनक्रिया मंदावते व पिकाला अन्नद्रव्ये घेता येत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटते. यात सोयाबीन,कापुस व तुर यांसारख्या पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन पीक सुकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेऊन हा धोका टाळणे आवश्यक आहे.

 

ज्या शेतकऱ्यांनी पारंपारिक पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली आहे. अशा शेतकऱ्यांनी जमिनीत वापसा झाल्यानंतर दर सहा ओळींनंतर कोळप्याच्या जानोळयाला दोरी गुंडाळून मृतसरी काढून घ्यावी. मृतसरी काढून घेतल्यास पडलेल्या पावसाचे पाणी सरीद्वारे शेताबाहेर निघून जाईल व पिकांचे नुकसान टाळता येईल. तसेच साचलेले पाणी लवकर शेताबाहेर कसे काढता येईलयाबाबत उपाययोजना करावीअसे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
0000

 

 खरीप हंगाम पिक स्पर्धा-2022

 शेतकऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन   

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-  खरीप हंगाम पीक स्पर्धा 2022 कृषी विभागाकडून  राबविण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तर ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन पिकासाठी  31 ऑगस्ट 2022  पर्यंत आहे. पिक स्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी  कार्यालशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाने केले आहे. 

 

सध्याच्या पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. पिक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके ज्वारी, बाजरी, तुर, मुग, उडीद, सोयाबीन  असे  पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 आहे. पीकस्पर्धेत सहभागी लाभार्थ्याचे शेतावर त्यापिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीक स्पर्धा संबंधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 5    आदिवासी गटासाठी 4 राहिल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.  प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 रुपये एवढी राहिल. 

 

पिकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप हे तालुका पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसे रुपये पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये तर तिसरे 2 हजार रुपये तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार, तिसरे बक्षिस 5 हजार रुपये, विभाग पातळीवर पहिले 25 हजार, दुसरे 20 हजार तर तिसरे 15 हजार रुपये, राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार, तिसरे 30 हजार रुपये राहिल. 

 

खरीप हंगाम 2022  साठी देखील जिल्ह्यातील जास्तीत जास् शेतकऱ्यांनी मुग व उडीद पिकासाठी 31 जुलै पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट र्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे  यांनी केले आहे.

000000

 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना

सेवायोजन प्रमाणपत्र अद्यावत करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- शासनाच्या पूर्वीच्या रोजगार व स्वयंरोजगार व सध्याच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोकरी इच्छूक सुशिक्षित बेरोजगारांनी नाव नोंदणी केली आहे. त्या उमेदवारांनी नाव नोंदणीला आधार कार्ड लिंक करुन घ्यावेत.

 

उमेदवारांनी आपले नाव नोंदणीला आधार कार्डशैक्षणिक पात्रतामोबाईल क्रमांकई-मेल आयडी लिंक करुन माहीत अद्यावत करावी. त्यामुळे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत घेण्यात येणारे रोजगार मेळावेदिले जाणारे प्रशिक्षण याचा लाभ उमेदवारांना घेता येईलअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...