Thursday, February 24, 2022

 नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी तंबाखू मुक्तीची शपथ मोहिम   

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :-  विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे आणि संपूर्ण जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी  जिल्ह्यातील सर्व शासकीय,निमशासकीय,आश्रम शाळा, खाजगी शाळा, महाविद्यायल आणि खाजगी शिकवणी वर्ग यांनी सोमवार 28 फेब्रुवारी 2022  रोजी तंबाखूमुक्त शपथ घ्यावीअसे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने तंबाखू मुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले असून वेळोवेळी शासकीय कार्यालयांसह अनेक ठिकाणी दंडही वसूल करण्याचे प्रावधान ठेवले आहे. आता या प्रयत्नांसमवेत विशेष शपथ मोहिम हाती घेतली आहे.

 

तंबाखूमुक्त शपथ घेतल्याचा  अहवाल ntcpnanded@gmail.com या मेलवर 2 मार्च 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावाअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्यस्तरावरून मार्गदर्शक सूचनांचे पालन करून  तंबाखूमुक्तीसाठी शैक्षणिक संस्था, जिल्हृयातील सर्व शासकीय, निमशासकीय, आश्रम शाळा, खाजगी शाळा, आणि महाविद्यालय यांनी दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत या आदेशाचे पालन करावेअसेही निर्देशीत केले आहे.

000000

नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित

तर 15 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 929 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 747 एवढी झाली असून यातील 99 हजार 997 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 60 रुग्ण उपचार घेत असून यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 690 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे धर्माबाद 1 असे एकुण 3 कोरोना बाधित आढळले आहे.

 

आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2 नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 13असे एकुण 15 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 6नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 46, खाजगी रुग्णालय 3 असे एकुण 60 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 73 हजार 143

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 53 हजार 487

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 747

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 99 हजार 997

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 690

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-01

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-60

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2.

 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातलगांनी तहसिल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी साधावा संपर्क  

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युद्ध घोषित केले असून या परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील कोणाच्या घरचे नातलग, नागरीक युक्रेनमध्ये अडकलेले असल्यास तात्काळ जिल्ह्यातील त्यांच्या परिवारातील सदस्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ती नाव व इतर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्रातील जे कोणी नागरीक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांना सुखरूपपणे भारतात परत येता यावे यादृष्टिने महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारशी संपर्क साधून मदतीची यंत्रणा तत्पर ठेवली आहे. हे लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील जर कोणाचे नातलग, कुटुंबातील सदस्य, विद्यार्थी युक्रेनमध्ये असतील त्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ही समन्वयाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणी अडकले असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबतची कार्यवाही करता येईल. नातलगांसाठी तहसिल कार्यालयासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री नंबर 1077 किंवा (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवसी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

 

अधिक मदतीसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली येथे नागरिकांच्या माहितीसाठी व मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तेथील हेल्पलाईन नंबर पुढीलप्रमाणे आहेत. १८००११८७९७ (टोल फ्री), +९१-११-२३०१२११३, +९१-११-२३०१४१०४, +९१-११-२३०१७९०५ आहे व फॅक्स नंबर +९१-११-२३०८८१२४ हा आहे व तेथील ई-मेल आय डी situationroom@mea.gov.in हा आहे.  

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...