कागदावरच्या योजनांना गरिबांपर्यंत पोहोचवून
Wednesday, June 21, 2023
शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात
प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 21 :- मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागत नगर, मालेगाव रोड नांदेड येथे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदवीत्तर या पुनर/नुतन प्रवेशासाठी 15 जुलै 2023 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही. अचूक व परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील यांची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे.
अर्जासोबत वार्षिक परीक्षेचे गुणपत्रक, सन 2022-23 या वर्षात उत्पन्न प्रमाणपत्र तहसिलदार कार्यालयाने अदा केलेले व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्राचे सत्यप्रती साक्षांकीत करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयात कार्यालयीन वेळेत 27 जून ते 15 जुलै 2023 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मिळतील. या कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्विकारले जातील .विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निवड प्रक्रीया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमित सुरु होईल. या वसतीगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची विनामुल्य सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव आहेत. प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 15 जुलै असून यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही असे मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
0000
योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी बस संवर्गातील वाहनाची तपासणी सुरु
योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी
बस संवर्गातील वाहनाची तपासणी सुरु
नांदेड (जिमाका) दि. 21 :- योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी सर्व बसेसच्या वेग नियंत्रकाच्या (स्पीड गर्व्हनर) वेगाची तपासणी सुरु करण्यात आली आहे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीसाठी येणाऱ्या बसचालकांनी त्यांचे वाहन काळी 9 वाजेपर्यत असर्जन बायपास रोड येथील मैदानाजवळ रस्त्याच्या एकाबाजूला वाहन वेग मर्यादा तपासणीसाठी सादर करावे. सकाळी 10 वाजेनंतर येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार नाही यांची सर्व बस संवर्गातील चालक/मालक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 21 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी 15 जुलै 2023 पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करावेत. उशिराने आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही असे आवाहन जिल्हा कार्यालयाने केले आहे.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्
अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शा
0000000
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी
मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 21 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक पी.जी. खानसोळे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बी.एस.दासरी यांनी केले आहे.
अनुसूचित जातीच्या उद्योजकांने हाती घेतल्याचा प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल व अर्जदारास बँकेने प्रकल्पासाठी कर्ज मंजुर केलेले असावे. तसेच अर्जदाराकडे उद्योग आधार, मागील तीन वर्षाचे विवरण, यापुर्वी इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र, तसेच पाचशे रुपयाच्या बाँडपेपरवर दोन साक्षीदारांच्या सहयासह हमीपत्र, प्रकल्पाव्दारे उत्पादित होणाऱ्या वस्तु, उत्पादन याबाबत विक्रेत्याचे मागणीपत्र, अर्जदाराचा जातीचा दाखला, जात वैद्यता प्रमाणपत्र, कंपन्यांनी केलेल्या मागणी व पुरवठा आदेश प्रती व प्रकल्पासाठी एकुण प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के बँकेने कर्ज मंजुर केलेले असणे आवश्यक आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय 9 डिसेंबर, 2020 व 16 मार्च 2020, 26 मार्च, 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत रविवारी महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत रविवारी
महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 21 :- शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रविवार दिनांक 25 जून रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा नांदेड यांच्यावतीने अबचलनगर मैदान, नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयाच्यावतीने महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थिताचे उच्च रक्तदाब, मधुमेह, मौखिक आरोग्य तपासणी, स्त्री रोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी व प्रेरणा प्रकल्पातर्गंत शेतकरी आत्महत्या संदर्भात समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच थायरॉईड व एचबी 1सी यासारख्या आवश्यक त्या रक्त तपासण्या करण्यात येणार आहेत.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या ठिकाणी जन सामान्यांचे आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून योजनेतर्गत लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड हे मोफत तयार करुन देण्यात येणार आहेत. आयुष्यमान भारत हे कार्ड तयार करुन घेण्यासाठी लाभार्थ्यांनी पीएम कार्ड किंवा रेशन कार्ड, आधार कार्ड, लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत घेवून यावा. वरील आरोग्य विषयक योजनांचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.
00000
शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत 25 जून रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन
शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत
25 जून रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 21 :- शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रविवार 25 जून रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन अबचलनगर मैदान येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
या शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरात सहभाग घेण्यासाठी अर्जदारांनी sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड व जन्मतारखेचा पुराव्यासह (पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी प्रमाणपत्र यापैकी एक) वर शिबिराच्या ठिकाणी सकाळी 11 वा. चाचणीसाठी उपस्थित राहून फेसलेस व नॉन फेसलेस शिकाऊ अनुज्ञप्ती सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000
शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत 25 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत
25 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 21 :- शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातर्गंत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी रविवार दिनांक 25 जून रोजी अबचल नगर मैदान, नांदेड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यास जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या, सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. काही अडचण असल्यास दुरध्वनी क्रमांक (02462) 251674 किंवा ई-मेल nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा.
0000
शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात
प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 21 :- मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागत नगर, मालेगाव रोड नांदेड येथे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदवीत्तर या पुनर/नुतन प्रवेशासाठी 15 जुलै 2023 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही. अचूक व परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील यांची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे.
अर्जासोबत वार्षिक परीक्षेचे गुणपत्रक, सन 2022-23 या वर्षात उत्पन्न प्रमाणपत्र तहसिलदार कार्यालयाने अदा केलेले व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्राचे सत्यप्रती साक्षांकीत करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयात कार्यालयीन वेळेत 27 जून ते 15 जुलै 2023 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मिळतील. या कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्विकारले जातील .विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निवड प्रक्रीया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमित सुरु होईल. या वसतीगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची विनामुल्य सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव आहेत. प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 15 जुलै असून यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही असे मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
0000
वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...