Wednesday, June 21, 2023

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत 25 जून रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

 शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत

25 जून रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत  रविवार 25 जून रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन अबचलनगर मैदान येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

या शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरात सहभाग घेण्यासाठी अर्जदारांनी sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड व जन्मतारखेचा पुराव्यासह (पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी प्रमाणपत्र यापैकी एक) वर शिबिराच्या ठिकाणी सकाळी 11 वा. चाचणीसाठी उपस्थित राहून फेसलेस व नॉन फेसलेस शिकाऊ अनुज्ञप्ती सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...