Tuesday, June 20, 2023

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंधवक्तृत्व स्पर्धा

 

नांदेड (जिमाका) 20 :- राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहु महाराजांचा सामाजिक समता दृष्टीकोण” निबंध व "सामाजिक समता आणि वैज्ञानिक प्रगती" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शुक्रवार 23 जून 2023 रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे ओळखपत्र घेऊन जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे स्वखर्चाने उपस्थित रहावेअसे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याणनांदेड यांनी केले आहे.  

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त शुक्रवार 23 जून रोजी सकाळी 11 वा. जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निबंध स्पर्धेचा विषय "राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक समता दृष्टीकोण" असून निबंध 1 हजार 500 शब्दात लिहिणे आवश्यक आहे. या स्पर्धेतून प्रथमद्वितीयतृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येईल. ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे त्यांनी 23 जून रोजी सकाळी 11 वा. जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे उपस्थित रहावे. तसेच 23 जून रोजी दुपारी 2 वा. "सामाजिक समता आणि वैज्ञानिक प्रगती" या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेत सर्व महाविद्यालयीन मुला-मुलींना भाग घेता येईल. या स्पर्धेतून प्रथमद्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येईलअसे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  

000000

 राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळाच्या

कर्ज योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) 20 :- राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली (एनएसटीएफडीसी नवी दिल्ली) यांच्याकडे विविध योजनांचा / व्यवसायांचा सन 2023-24 करीता कर्ज प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. त्याअनुषंगाने शाखा व्यवस्थापक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. यांना दिलेल्या लक्षांक / उद्दिष्टांप्रमाणे त्यांच्या कार्यक्षेत्रातील कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या योग्य व पात्र लाभार्थ्यांची निवड करून मुल्यमापन समितीचे शिफारशीसह परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 15जुलै 2023 पर्यंत मुख्य कार्यालयास सादर करावा.

 

सहपत्र (लक्षांक / उद्दिष्ट) बाबत शाखा व्यवस्थापकांनी आपल्या कार्यक्षेत्रात लक्षांक पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. तसेच कोणाच्याही दबावाखाली न येता खरोखरच ज्या व्यवसायाची आवश्यकता आहेव जे लाभार्थी व्यवसाय करण्यास इच्छूक आहे व परतफेड करतील अशा लाभार्थ्यांचा प्रस्ताव सादर करावा. मात्र कुठेही व्यवसाय न करता निधी मिळवणे अशी मानसिकता दिसल्यास तसे प्रस्ताव सादर करू नयेत. आपल्याकडील परिपूर्ण कर्ज प्रस्ताव मुख्य कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर एनएसटीएफडीसी नवी दिल्ली यांच्याकडे निधी मागणी करीता प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याने सदरकामी कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाहीयाची दक्षता घेण्यात यावी.

 

हे लक्षांक पुर्ण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना पुढीलप्रामणे आहेत. एनएसटीएफडीसी नवी दिल्ली पुरस्कृत कर्ज योजनेअंतर्गत कृषी आणि संलग्न व्यवसाय (रुपये 2 लक्ष) व लघु उद्योग व्यवसाय (रुपये 3 लक्ष) अंतर्गत लाभार्थी निवड करतांना www.nstfdc.tribal.gov.in या संकेतस्थळावरील व्यवसायाच्या यादीच्या अनुषंगानेच आपल्या कार्यक्षेत्रातील वाव असणारे व्यवसायाभिमुख योजनेच्या लाभार्थ्यांचे कर्ज मंजुरी प्रस्ताव सादर करण्याची दक्षता घ्यावी. (www.nstfdc.tribal.gov.in या संकेतस्थळावर जाऊन Help Zone यावर क्लिक केल्यानंतर Indicative Schemes मधील व्यवसायाची यादी.)

 

आपणाकडे प्राप्त झालेले लाभार्थ्यांचे कर्ज मागणी प्रस्तावआपणास देण्यात आलेल्या लक्षांकानुसार मूल्यमापन समितीसमोर ठेवून समितीच्या शिफारशीसह मुख्य कार्यालयाकडे तात्काळ मंजुरीस पाठविण्यात यावे. कर्ज वाटप करतांना प्राप्त अर्जांची छाननी करून कर्जाची परतफेड करू शकणाऱ्या योग्य व पात्र लाभार्थी निवड करण्याची तसेच आवश्यक कागदपत्रांची व करारनाम्याची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधीत शाखा व्यवस्थापक यांची राहील. मुख्य कार्यालय नाशिक स्तरावर योजना निहाय नस्ती ठेवण्यात येत असल्यामुळे या कर्ज योजनांच्या मूल्यमापन समितीच्या शिफारशीसह योजनानिहाय प्रस्ताव पाठविण्यात यावेत.

 

एनएसटीएफडीसी नवी दिल्ली पुरस्कृत कर्ज योजना राबविण्याची तसेच कर्ज वितरणाची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाखा कार्यालयाची राहील व यास संबंधित शाखा व्यवस्थापक जबाबदार राहतील. मुख्य कार्यालयाकडून कर्ज प्रकरण मंजुरी दिल्यानंतर व तसे आदेश प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांचा सहभागवाढीव सहभाग रक्कम लाभार्थ्यांकडून शाखा कार्यालयास जमा करून कर्ज वितरणाची कार्यवाही करण्यात यावी.

 

किनवट शाखा कार्यालयाअंतर्गत महिला सबलीकरण योजना (रु.2 लक्ष)-8बचतगट योजना (रु. 5 लक्ष)-1कृषी आणि संलग्न व्यवसाय (रु.2 लक्ष)-11हॉटेल ढाबा व्यवसाय (रु.5 लक्ष)-3स्पेअर पार्ट / गॅरेज / ऑटो वर्कशॉप (रु.5 लक्ष)-2वाहन व्यवसाय (रु.10 लक्ष पर्यंत)-1लघु उद्योग व्यवसाय (रु.3 लक्ष)-1 याप्रमाणे एकुण 27 लक्षांक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक यांनी दिले आहे.  

00000

 कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा नांदेड दौरा  

नांदेड (जिमाका) दि. 20 :- राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

 

बुधवार 21 जून 2023 रोजी मुंबई येथुन नंदिग्राम एक्सप्रेस रेल्वेने सकाळी 5 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन. सकाळी 5.15 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. नांदेड येथे शनिवार 24 जून 2023 रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी बैठकीस उपस्थिती. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.

00000 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...