Thursday, September 12, 2024

  वृत्त क्र. 833

"एक पेड मां के नाम" अभियान अंतर्गत

17 सप्टेबर रोजी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम 

 

नांदेड दि. 12 :- एक पेड मां के नाम वृक्ष लागवडीची मोहिम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या अभियान अंतर्गत मंगळवार 17 सप्टेंबर रोजी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाचे छायाचित्र मेरी लाईफ पोर्टलच्या https://merilife.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करावेत. तसेच गुगल शीटमध्ये वृक्ष लागवडीची परिपूर्ण माहिती भरावी, असे नागपूरचे रोजगार हमी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीणचे आयुक्त अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

 

या कार्यक्रमाअंतर्गत भारतात पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तनाशी सामना करण्यासाठी आवाहन केले आहे. या मोहीमेंतर्गत 80 कोटी झाडे सप्टेंबर 2024 पर्यंत व 140 कोटी झाडे मार्च 2025 पर्यंत लागवड करण्याची मोहीम राबविण्याबाबत केंद्र शासनाने सुचित केले आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याकरीता सप्टेंबर 2024 पर्यंत 2 कोटी 57 लाख उद्दीष्टे पुर्ण करण्यात येणार असून मार्च 2025 अखेर पर्यंत 4 कोटी 30 लक्षचे उद्दीष्टे पूर्ण करावयाचे आहे, असेही म्हटले आहे.

00000

 वृत्त क्र. 832

संविधान महोत्सवाचे औचित्य साधून "संविधान मंदीरउद्घाटन सोहळा

 

नांदेड दि. 12 :- संविधान महोत्सवाचे औचित्य साधून संविधान मंदीरउद्घाटन मा. उपराष्ट्रपती महोदय जगदीप धनखड यांच्या शुभहस्ते रविवार 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने करण्याचे विभागामार्फत सुनिश्चित केले आहे.

 

सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील 434 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे.

 

त्याअनुषंगाने प्रस्तुत संस्थेत संविधान महोत्सवाचे औचित्य साधून 12 ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचे आयोजन शिल्प निदेशक तथा प्रशिक्षणार्थ्यांसाठी करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 15 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे सकाळी 11 वा. संविधान मंदिराचे उद्घाटन आभासी पद्धतीने करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्रीमा. मंत्रीमा. आमदार विधानसभा व विधानपरिषदजिल्हयातील सर्व मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेतअसे नांदेड औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.

00000

वृत्त क्र. 831


नांदेड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड दि. 12 :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्तईद-ए-मिलाद व गणपती विसर्जन सणानिमित्त भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी 12 ते 18 सप्टेंबर 2024 रोजीचे 24 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत. हा आदेश जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील मुख्य रस्ताडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा ते चिखलवाडी कॉर्नरमहाविर चौक पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर तसेच नांदेड शहरातील माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथील परिसरात उपोषणेधरणेमोर्चारॅलीरास्ता रोकोआंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध केले आहे.

 

संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश 10 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमीत केले आहेत.  

0000

 विशेष वृत्  

मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी

आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी

 

मुंबई दि. १२ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.


महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.


या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. उद्या शुक्रवार दि.१३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...