Sunday, October 17, 2021

 नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 432 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे  5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 357 एवढी झाली असून यातील 87 हजार 682 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 4, कंधार तालुक्यांतर्गत 1 असे एकुण 5 बाधित आढळले आहेत. आज जिल्ह्यातील मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आज 23  कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 19 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 44 हजार 901

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 41 हजार 866

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 357

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 682

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) निमित्त मार्गदर्शक सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) जुलूस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी 19 किंवा 20 ऑक्टोंबर रोजी (चंद्रदर्शनावर अवलंबून) ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) साजरी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे दिल्या आहेत. 

कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता राज्य महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन विभागाचे परिपत्रक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आदेश तसेच ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक  सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ईद-द-मिलाद (मिलादुन नबी) शक्यतोवर घरात राहूनच साजरी करावी.  मिरवणुका काढावयाच्या झाल्यास पोलीस प्रशासनाच्या पूर्व परवानगीने एका मिरवणुकीत जास्तीतजास्त 5 ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त 5 व्यक्तींना परवानगी राहील. मिरवणूक दरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. 

मिरवणुकीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनीप्रदुषण नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मिरवणुकीच्या दरम्यान मिरवणुकीच्या स्वागतासाठी पंडाल बांधावयाचे असल्यास शासनाच्या नियमानुसार संबंधित महापालिका, पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. या पंडालमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत स्थानिक प्रशासनाचे ठरविलेल्या विहित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24 सप्टेंबर रोजीच्या शासन आदेशातील नियमांचे काटेकोर पालन करुन मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात येत आहे. प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. केबल टिव्ही, फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी. 

सबील / पाणपोई ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) निमित्त मिरवणुकीच्या रस्त्यावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबील (पाणपोई) लावण्यात येतात. सबीन (पाणपोई) बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्याठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहून नये. या ठिकाणी सीलबंद पाण्याच्या बाटलींचे वाटप करण्यात यावे. सबील (पाणपोई)च्या ठिकाणी स्वच्छता राखावी. सोशन डिस्टन्सिंगचे पालन करावे. 

प्रतिबंधीत क्षेत्रात सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यात कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही. कोविड-19 परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे असे उपक्रम राबविण्यात यावेत. या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी. या सूचनेव्यतीरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकारी संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनाला असतील. 

कोविड-19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. शासन परिपत्रकानंतर व मिरवणूक सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे आश्यक राहील, असेही गृह विभागाने शासन परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

00000

 वाचन प्रेरणा दिनानिमित्त शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- माजी राष्ट्रपती स्व. डॉ.  . पी. जे. अब्दूल कलाम यांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात डॉ. . पी. जे. अब्दूल कलाम यांनी लिहिलेले साहित्य व स्पर्धा परीक्षा विषयक ग्रंथाचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन लेखाधिकारी (शिक्षण) प्रताप भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी, संजय कारले, संजय पाटील, कांताबाई सुर्यवंशी, रामगडीया महाराज, राजू कदम, इसादकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हे ग्रंथप्रदर्शन सर्वांसाठी खुले असून या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी केले.

000000




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...