Friday, May 22, 2020


आरोग्य सेतूचा नियमित वापर करा ;
 प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील नमूद बाबींना
सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत नियम, अटीच्‍या अधीन राहून मुभा
नांदेड, दि. 22 (जिमाका) :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपायोजना करण्याबाबत नांदेड जिल्‍हयात  शुक्रवार 22 मे 2020 पासून पुढील आदेशापर्यंत नियम, अटी व शर्तीच्‍या अधिन राहून प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून उर्वरित क्षेत्रातील नमूद बाबींना सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत नियम व अटीच्‍या अधीन राहून मुभा देण्‍यात आली आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशाद्वारे मुभा दिली आहे.
नांदेड जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे निर्गमीत आदेश, 17 मे 2020 अन्‍वये नांदेड जिल्‍हयात जमावबंदी आदेश, नियमावलीसह 17 ते 31 मे 2020 पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात संदर्भात नमूद या कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश व शुध्‍दीपत्रकानुसार निर्गत आदेशातील अटी व शर्ती जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. राज्य शासनाने दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनानुसार नांदेड जिल्‍हयात प्रतिबंधीत वगळून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले आहे.
नांदेड जिल्‍हयात पुढील बाबी प्रतिबंधित राहतील
·         सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्‍था व शिकवणी वर्ग इ. बंद राहतील. तथापि ऑनलाईन / आंतर शिक्षण यास मुभा राहील.
·         हॉटेल / रेस्‍टॉरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटीच्‍या सेवा, गृहनिर्माण / आरोग्‍य / पोलीस / शासकिय अधिकारी / आरोग्‍य सेवा कर्मचारी / पर्यटकांसह अडकलेल्‍या व्‍यक्‍ती आणि विलगिकरण सुविधेसाठी वापरता येईल. तसेच उपरोक्‍त सेवेसाठीच बसस्‍टॉप, रेल्‍वेस्‍टेशन येथे चालू असलेल्‍या कॅन्‍टीनचा सुध्‍दा वापर करता येईल. रेस्‍टॉरंटला खाद्य पदार्थाच्‍या होम डिलेव्‍हरीसाठी स्‍वयंपाकघर वापरण्‍यास मुभा असेल.
·         सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्‍यायामशाळा व जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्‍ली हॉल व इतर तत्‍सम ठिकाणे बंद राहतील.
·         सर्व सामाजिक / राजकीय / खेळ / करमणूक / शैक्षणिक / सांस्‍कृतिक / धार्मिककार्ये / इतर मेळावे आणि मोठया धार्मिक सभा यास प्रतिबंध असेल.
·         सर्व धार्मिक स्‍थळे / पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्‍यात येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्‍यादीवर बंदी राहील.
·         नांदेड जिल्‍हयातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.
·         नांदेड जिल्‍हयातील सर्व ढाबे, तंबाखु व तंबाखुजन्‍य पदार्थाची दुकाने, चहा-कॉफी सेंटर, पानठेला व शितपेयाची दुकाने बंद राहतील.
नांदेड जिल्‍हयातील टाळेबंदीच्‍या कालावधीत सायं. 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागु राहील. कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्‍यावश्‍यक सेवेकरिता नेमण्‍यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकिय कारणास्‍तव रुग्‍ण व त्‍याच्‍यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. सदर वेळेत विनाकारण फिरतांना आढळल्‍यास अशा व्‍यक्‍तींच्‍या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल.
आरोग्‍य सेतुचा नियमित वापर करा
·         आरोग्‍य सेतुचा वापरामुळे कोव्हिड 19 आजाराच्‍या प्रादुर्भावाबाबत त्‍वरीत सूचना मिळते व त्‍याचा        फायदा व्‍यक्‍तीश व समाजाला सुध्‍दा होतो त्‍यामुळे Android Phone चा वापर करणा-या सर्व    नागरिकांनी मोबाईलमध्‍ये आरोग्‍य सेतू अॅप डाऊनलोड करावे.
·         शासकिय कार्यालय व खाजगी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना आपल्‍या व इतरांच्‍या सुरक्षितेकरिता आरोग्‍य सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील.
·         नांदेड जिल्‍हयातील सर्व नागरिकांनी आरोग्‍य सेतु अॅप डाऊनलोड करुन त्‍याचा नियमित वापर करण्‍याचे आवाहन जिल्‍हा प्रशासनाचे वतीने करण्‍यात येत आहे.
जेष्ठ नागरिक, लहान मुलांनी घरीच रहावे
आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने धोकादायक वयोगट असणारे 65 वर्षाचे वरिल जेष्‍ठ नागरिक, अनेक व्‍याधी असणारे व्‍यक्‍ती, गरोदर माता, दहा वर्षाखालील मुले यांनी टाळेबंदी (Lockdown) काळात अत्‍यावश्‍यक कामाचे / आरोग्‍याचे कारणाचे अपवाद वगळता घराबाहेर पडता येणार नाही. त्‍यांनी घरीच रहावे व प्रशासनास सहकार्य करावे.
नांदेड जिल्‍हा नॉन रेड झोनमध्‍ये असल्‍याने नांदेड जिल्हादंडाधिकारी यांनी समक्रमांकीत आदेश क्रमांक (1) व (2) नुसार दिलेल्‍या सवलती, मुभा व परवानग्या जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. तसेच त्‍याव्‍यतिरिक्‍त पुढील नमूद प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून उर्वरित क्षेत्रातील बाबींना सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत नियम व अटीच्‍या अधीन राहून मुभा देण्‍यात आली आहे.
·         क्रीडा कॉम्‍पलेक्‍स आणि स्‍टेडिअम आणि इतर सार्वजनिक खुली जागा वैयक्तीक व्‍यायामकरीता मोकळी राहील. परंतू या ठिकाणी प्रेक्षक आणि Group Activities करीता मुभा राहणार नाही. सर्व शारीरिक व्‍यायाम व त्‍यासंबंधीत इतर क्रिया सामाजिक अंतर राखुन करता येतील.
·         सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूकीस पुढीलप्रमाणे मुभा राहील टु व्हिलर- 1 व्‍यक्‍ती, थ्री व्हिलर 1+2 व्‍यक्‍ती, फोर व्हिलर 1+2 व्‍यक्‍ती.
·         नांदेड जिल्‍हयांतर्गत बससेवा जास्‍तीतजास्‍त 50 टक्‍के क्षमतेनुसार सुरु करण्‍यास मुभा देण्‍यात येत आहे. परंतु सामाजिक अंतर व स्‍वच्‍छतेची उपाययोजना करणे आवश्‍यक राहील.
·         सर्व दुकाने, बाजारापेठ सुरु ठेवण्‍यास मुभा देण्‍यात आली आहे. परंतु नमूद दुकाने / बाजारपेठच्‍या ठिकाणी गर्दी वाढल्‍यास किंवा सामाजिक अंतराचे व वेळोवेळी निर्गत आदेशाचे पालन करण्‍यात येत नसल्‍याचे दिसून आल्‍यास दंडात्‍मक व कायदेशीर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्‍यात येईल.
·         या बाबींपैकी प्रतिबंधीत क्षेत्रात (Containment Zone) मध्‍ये केवळ जीवनावश्‍यक वस्‍तुंचा पुरवठा तसेच अत्‍यावश्‍यक वैद्यकीय सेवांना मुभा राहील.
वरील दुकाने / आस्‍थापनाच्‍या ठिकाणी पुढील उपाययोजना बंधनकारक असतील.
Ø  कामाच्‍या ठिकाणी / दुकानात प्रवेशापुर्वी हॅन्‍डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे.
Ø  एका वेळेस दुकानात 5 पेक्षा जास्‍त ग्राहकास प्रवेश राहणार नाही.
Ø  दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्‍या चेहऱ्यावर मास्‍क असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अन्‍यथा 1 हजार रुपयांचा एवढा दंड संबंधितांकडून आकारण्‍यात येईल.
Ø  मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्‍तू / ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत र्निजंतूकीकरण करणे.
Ø  ग्राहकांकडून खरेदीनंतर पैश्‍यांची देवाण-घेवाण आरबीआयच्‍या सुचनेनुसार ई-वॉलेटस व स्‍वाईप मशीनव्‍दारे करणेस भर द्यावा.
Ø  वरील  नेमून दिलेल्‍या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्‍यास तसेच उपाययोजनेचे भंग केल्‍यास 5 हजार रुपये एवढा दंड संबंधित दुकानदारास आकारण्‍यात येईल.
परिशिष्‍ट-2
·         सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे.
·         सार्वजनिक ठिकाणी थुंकल्‍यास 1 हजार रुपये दंड आकारण्‍यात येईल.
·         सार्वजनिक कामाची ठिकाणे व सार्वजनिक वाहतूक याठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळले
    जावेत.
·         लग्नसमारंभ निमित्ताने होणारे जमाव संबधाने सामाजिक अंतराचे नियम पाळावे व अशा ठिकाणी 50 पेक्षाजास्त आमंत्रित असु नयेत. तसेच लग्‍न सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीतच पार पाडणे आवश्‍यक असेल.
·         अंत्यविधीमध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत व 50 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असु नये
·         दारु, पान, गुटखा, तंबाखू इत्यादीचे सार्वजनिक ठिकाणी सेवन निषिद्ध आहे अन्‍यथा कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल.
·         सर्व दुकाने ही दोन ग्राहकामध्ये सहा फूट अंतर या नियमांनुसार व एका वेळेस 5 पेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत अशा प्रकारे चालु राहतील.
कामाचे ठिकाणी अवलंबवायच्या अतिरिक्त मार्गदर्शक सुचना
·         थर्मल स्क्रीनींग हॅंडवाश सॅनिटायजर्स हे कामाचे ठिकाणी प्रवेश व निर्गमन मार्गावर तसेच सामान्य   
     ठिकाणी उपलब्ध करुन द्यावे.
·         कामाचे संपूर्ण क्षेत्र वारंवार मानवी संपर्कात येणारी ठिकाणे उदा. दरवाज्याचे कडी, कोंडी इ. चे    निर्जंतुकीकरन वारंवार तसेच शिफ्ट दरम्यान करावे.
·         सर्व प्रभारी अधिकारी व संबंधितांनी कामाचे ठिकाणी कामगारांमध्ये पुरेशा प्रमाणात अंतर ठेवून सामाजिक अंतर राखले जावे. तसेच शिफ्ट दरम्यान अंतर ठेवावे व जेवणाच्या वेळा नियंत्रित कराव्यात.
·         या आदेशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही या बाबी तपासून आवश्‍यक कायदेशर व दंडात्‍मक  कारवाई करण्‍यास पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्‍यात आले आहे.
Ø  महानगरपालिका हद्दीत  :-  महानगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत
Ø  नगरपालिका हद्दीत        :- नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत  करावीत                             
Ø  गावपातळीवर          :-  ग्रामपंचायत  व पोलीस विभागाचे संयुक्‍त पथक गठीत करावे.
      याप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांच्याकडे सादर करावीत.  संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल.
  या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897  आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल.
सर्व संबंधित यंत्रणांनी अत्‍यावश्‍यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुध्‍द कठोर कारवाई करावी. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हे आदेश नांदेडचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 21 मे 2020 रोजी निर्गमित केले आहेत.                   
000000





सोबतच्या छायाचित्राच्या ओळी –

ऑनलाइन शिक्षण : जिल्हा परिषद हायस्कुल विष्णुपुरीच्या इयता दहाव्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.  शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक तथा तंत्रस्नेही शिक्षक आनंद रेगुंटवार यांनी आपल्या शाळेच्या शिक्षकांच्या सहकार्याने विज्ञान, गणित आणि  इतर विषय रोज सकाळी विद्यार्थी आपआपल्या घरून मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत.  ( छाया - विजय  होकर्णे, नांदेड ).


कोरोनाचे आज 11 रुग्ण बरे झाल्याने सुट्टी ;    
एकुण 116 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 52 रुग्ण बरे ;  
तर 56 रुग्णांवर औषधोपचार सुरु
नांदेड, दि. 22 (जिमाका) :- कोरोना विषाणुसंदर्भात नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी शुक्रवार 22 मे 2020 रोजी सायं. 5 वा. प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार यात्री निवास एनआरआय कोविड केअर सेंटर येथील 10 रुग्ण व डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील 1 रुग्ण असे एकुण 11 रुग्ण औषधोपचारामुळे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 116 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 52 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत 56 रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.
            नांदेड जिल्ह्यात 22 मे पर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 29 हजार 474 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकुण 2 हजार 961 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 2 हजार 541 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून गुरुवार 22 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 134 रुग्णांचे अहवाल उद्या पर्यंत प्राप्त होतील व 43 रुग्णांचे स्वॅब तपासणी चालू आहे. सदर घेतलेल्या एकुण स्वॅबपैकी 116 रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
            गुरुवार 21 मे रोजी प्राप्त झालेले एकुण 87 अहवालांपैकी 6 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. त्यामध्ये 4 पुरुष ज्यांचे अनुक्रमे वय वर्षे 14, 18, 33, 74 आहे तर दोन स्त्री रुग्णांचे वय अनुक्रमे 34 व 65 आहे. त्यामधील एका पुरुषाचे वय वर्षे 74 यांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांपैकी 2 रुग्ण मुखेड तालुक्यातील, एक बिलोली तालुक्यातील तर एक रुग्ण प्रवासी एनआरआय भवन येथे व उर्वरीत दोन रुग्ण हे नांदेड शहरातील लोहारगल्ली भागातील आहेत.
            एकुण 116 रुग्णांपैकी 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 52 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचे 56 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 42 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये 1 रुग्ण, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 3 रुग्ण, भोकर ग्रामीण रुग्णालय येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थिर आहे.  
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा, जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


शिधापत्रिका नसलेल्या गरजू व्यक्तींना   
तांदूळ वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना
नांदेड, दि. 22 (जिमाका) :-  अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा शासन निर्णय 19 मे 2020 अन्वये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी लावण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्‍या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी केंद्र शासनाच्‍या आर्थिक उपाययोजना अंतर्गत आत्‍मनिर्भर भारत वित्‍तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्‍या निर्दशानुसार राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेतर्गत किंवा कोणत्‍याही राज्‍य योजनेत समाविष्‍ट नसलेल्‍या विना शिधापत्रिकाधारक व्‍यक्‍तींना मे व जुन 2020 या दोन महिन्‍याच्‍या कालावधीसाठी प्रतिव्‍यक्‍ती प्रतिमाह 5 किलो तांदूळ मोफत देण्‍याबाबत निर्देशीत केले आहे.
लाभार्थ्‍यांचे निकष : राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेमधील शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे परंतु अद्याप पर्यंत शिधापत्रिका प्राप्‍त न झालेले व्‍यक्ती. अन्‍न धान्‍याची गरज असलेल्‍या सामाजिक व आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल विस्‍थापित मजूर, रोजंदारी  मजूर. संदर्भ क्र. 5 च्‍या पत्रान्‍वये प्रलंबित असलेले सर्व शिधापत्रिकाधारक. परंतू राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजना तसेच इतर राज्‍य योजनेतील शिधापत्रिकाधारक यातून पूर्णपणे वगळण्‍यात येतील.
मोफत तांदूळ वितरणाची कार्यपध्‍दती
विना शिधापत्रिकाधारकांची यादी निश्चित करणे :  नॅशनल डिजस्‍टर मॅनेजमेंट (NDMA) अॅथोरिटी यांचे संकेतस्‍थळावरील यादी, तहसिलदार, जिल्‍हा परिषद, महानगरपालिका यांचेकडे प्राप्‍त झालेल्‍या याद्या लॉकडाऊन काळात एनजीओ यांनी मदत केलेल्‍या लाभार्थ्‍यांची यादी व स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांची यादी या सर्व याद्या विचारात घेण्‍यात याव्‍या.
यापुर्वी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडन विनाशिधापत्रिकाधारकांची यादी तयार करण्याबाबत कळविण्‍यात आले आहे. त्‍यानुसार आपण आपल्‍या कार्यक्षेत्रातर्गत विनाशिधापत्रिकाधारक लाभार्थ्‍यांची यादी तयार केली असेलच सदर यादी संबंधीत क्षेत्रातील तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील नगरपालिका कर्मचारी व इतर शासकीय कर्मचारी यांच्यामार्फत तपासणी करण्‍यात यावी व पात्र लाभार्थी निश्चित करण्‍यात यावेत. त्यानंतर केंद्रनिहाय पात्र लाभार्थ्‍यांची यादी संबंधीत तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांच्‍या नोटीस बोर्डावर प्रसिध्‍द करुन व्‍यापक प्रसिध्‍दीच्‍या दृष्‍टीने आवश्‍यकतेनुसार इतरत्र  प्रसिद्ध करण्‍यात यावे.
अशा प्रकारच्‍या याद्या स्‍वस्‍तधान्‍य दुकाननिहाय तयार कराव्‍या व दुकाननिहाय लाभार्थ्‍याची संख्‍या निश्चित करावी. आवश्‍यकतेनुसार प्रभाग निहाय याद्या करुन सदर प्रभागातील सर्व लाभार्थी एका दुकानास जोडण्‍यास हरकत नाही. त्‍याअनुषंगाने धान्‍याचे नियतन निश्चित करावे. या कामकाजासाठी पोलिस, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कामगार विभाग, उद्योग विभाग यांचे प्रतिनिधींची मदत घेण्‍यात यावी.
अन्‍नधान्‍य वितरण केंद्र केंद्र प्रमुख निश्चित करणेः संबंधित क्षेत्रामध्‍ये स्‍वस्‍तधान्‍य दुकानदार हा केंद्रप्रमुख असेल व त्‍या क्षेत्रासाठी स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारामार्फत धान्‍याचे वाटप करण्‍यात येईल. या रास्‍तभाव दुकानावर एका शासकीय कर्मचारी यांचे नेमणूक करण्‍यात यावी. सदर शासकीय कर्मचारी हे रास्‍तभाव दुकानातुन होणारे अन्‍नधान्‍य वाटप याबाबत नियंत्रण ठेवतील व तसा अहवाल तहसिल कार्यालयास करणे बंधनकारक असेल आणि प्रत्‍येक 10 स्‍वस्‍तधान्‍य दुकानांसाठी एका नोडल ऑफीसर म्‍हणून मंडळ अधिकारी/ विस्‍तार अधिकारी किंवा तत्‍सम दर्जाचे अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात यावी. सदर नोडल ऑफीसर हे त्‍यांना नेमुण देण्‍यात आलेल्‍या 10 रास्‍तभाव दुकाना पैकी कोणत्‍याही दुकानास अचानक भेट देवुन अभिालेखाची तपासणी करतील व तसा अहवाल तहसिल कार्यालयास सादर करतील. सदर कामासाठी ज्‍या अधिकारी /कर्मचारी यांची सेवा अधिग्रहीत करताना सदर कर्मचारीकडे कोरोना विषयक सोपविलेल्‍या कामकाजावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्‍यावी. एका विहीत केलेल्‍या केंद्रावरील लाभार्थी दुसऱ्या केंद्रावर जाऊन तांदळाचा लाभ घेणार नाही याची दक्षता घेण्‍यात यावी.
अभिलेख ठेवणेः समवेत दिलेल्‍या नमुन्‍यात सर्व स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांनी अभिलेख ठेवणे आवश्‍यक राहील व संपर्क अधिकारी यांनी सदर अभिलेखाची दैनंदिन तपासणी करावी. तहसिलदार यांनी सदर अभिलेख आपल्‍या स्‍तरावर जतन करुन ठेवावेत व त्‍यानुसार महिना निहाय अखेर विहीत नमुन्‍यात अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करावा.
जबाबदारी, दक्षता : प्रत्‍येक स्‍वस्‍तधान्‍य दुकानावर तांदुळ वितरणासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्‍ध करुन द्यावा. तसेच त्‍याकरीता संबंधित क्षेत्रातील दक्षता समिती सदस्‍य, संबंधित नगरसेवक, ग्रामसेवक, सरपंच यांची मदत घ्‍यावी.  
प्रत्‍येक वितरण केंद्रावर गर्दी टाळण्‍यासाठी सामाजिक अंतराचे Social Distance नियमांचे पालन करणे आवश्‍यक राहील. पात्र लाभार्थ्‍यांना धान्‍य वितरण करण्‍यापुर्वी विहित हमीपत्र भरुन घ्‍यावे.  
विनाशिधापत्रिका लाभार्थ्‍यांना ऑफलाईन धान्‍य वितरण करावयाचे आहे. त्‍यासाठी लाभार्थ्‍यांचा प्रमाणित आधारकार्ड क्रमांक आवश्‍यक असेल किंवा शासनाकडुन देण्‍यात आलेली कोणतेही ओळखपत्र पाहुन तपासणी करावी. सदर लाभार्थ्‍यांचे नाव, आधारकार्ड क्रमांक, धान्‍य वाटप दिनांक, मोबाईल क्रमांक (असल्‍यास) इत्‍यादी गोष्‍टींची आवश्‍यक तपशिल नमुद करावा, तसेच ezee अॅप प्रणालीद्वारे  एपीएल केशरीचे धान्‍य वाटप केले आहे, ezee अॅप वापरणेबाबत जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सविस्‍तर सुचना दिलेल्‍या आहेत. त्‍याचप्रमाणे विनाशिाधापत्रिकधारक यांनाही  ezee अॅप प्रणालीद्वारे धान्‍य वितरीत करण्‍यात यावे.आपल्‍या गावातील केंद्र निहाय पात्र लाभार्थ्‍यांची यादी गावातील सर्व केंद्रांमध्‍ये उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी.
दिलेल्या सुचनांप्रमाणे तात्‍काळ कार्यवाही करुन स्‍वस्‍त धान्‍य दुकान निहाय पात्र लाभार्थ्‍यांच्‍या याद्या निश्चित करण्‍याची कार्यवाही कोणत्‍याही परिस्थितीत आजच तात्काळ पुर्ण करण्‍यात यावी व आपल्‍या तालुक्‍यासाठी तांदळाची मागणी तात्काळ पुर्ण जिल्हा पुरवठा कार्यालयाचे ई-मेलवर सादर करावी.  शासन निर्णयातील सर्व सुचना व ezee अॅपद्वारे अन्‍नधान्‍य वाटप करावयाच्‍या सुचना  बंधनकारक असुन इतर सुचना या मार्गदर्शक स्‍वरुपाच्‍या आहेत. पात्र लाभार्थी निवड करणे व पारदर्शक धान्‍य वितरण यासाठी आवश्‍यकतेनुसार अतिरिक्‍त उपाययोजना कराव्‍यात, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना सुचित केले आहे.
000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...