Tuesday, February 15, 2022

 नांदेड जिल्ह्यात 22 व्यक्ती कोरोना बाधित

तर 28 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 882 अहवालापैकी 22 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 16 तर अँटिजेन तपासणीद्वारे 6 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 581 एवढी झाली असून यातील 99 हजार 752 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 141 रुग्ण उपचार घेत असून यात 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 688 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, पुसद 1, परभणी 2, हदगाव 1, औरंगाबाद 1, तेलंगणा 1, किनवट 3, हिंगोली 1, मुखेड 1, यवतमाळ 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, माहूर 1, नायगाव 2, हिंगोली 1 असे एकुण 22 कोरोना बाधित आढळले आहे.  

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 11,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16 असे एकुण 28 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.  

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 14, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 55, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 62, खाजगी रुग्णालय 10 असे एकुण 141 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 64 हजार 425

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 45 हजार 65

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 581

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 99 हजार 752

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 688

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.24 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-141

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-5. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2021 साठी

प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ

 

· प्रवेशिका 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका दि.15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

00000

 कंत्राटी पदांसाठी माजी सैनिकांची निवड चाचणी 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-औरंगाबाद स्मार्ट सिटी बस जड वाहन वाहतूक परवानाधारक अनुभवी 100 माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर-कंडक्टरची प्राथमिक निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड प्रक्रिया 15 ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नंदनवन कॉलनी औरंगाबाद येथे राबवली जाणार आहे. यासाठी पात्रताधारक माजी सैनिक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह (डिस्चार्ज बुकची प्रतआर्मी व सिव्हिल हेव्ही वेहिकल ड्रायव्हिंग लायसन्स आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट इत्यादी) आपली नाव नोंदणी  करुन घ्यावी. नांदेड, हिंगोली, जालनाबीड, बुलढाणा, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातील इच्छूक माजी सैनिकांनाही प्रावधान देण्यात येणार आहे.

 

निवड चाचणीसाठी पात्रता :- सैन्य दलातील ट्रेड DSV (Spl Veh)/ AM-50/ Dvr/ Dvr (MT)/ DMT/ Dvr GNR/ Dvr (AFT) यापैकी असावा. दहावी / बारावी उत्तीर्ण आणि आर्मी ग्रॅजुएट शैक्षणिक आर्हता आवश्यक आहे. वैध प्रवासी बस वाहतूक परवाना (PSVBUS (TRV-PSV-Bus) धारकास प्राधान्य. निवडक उमेदवारांनी MV Act नुसार कंडक्टर बॅच (बिल्ला) निवडीच्या/ नियुक्तिच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत तयार करावा. सैन्यदलात हेव्ही वेहिकल ड्रायव्हिंगचा किमान 15 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मेडिकल कॅटेगरी SHAPE-I. वयोमर्यादा 48 वर्षे आहे. माजी सैनिकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनीऔरंगाबाद दुरध्वनी 0240-2370313 या पत्यावर / दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. निवड प्रक्रियेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा प्रत्यक्ष सहभागी नाही, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मार्गदर्शक सूचना  

नांदेड (जिमाका) दि. 15 :- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवार 19 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात  साजरी करण्यात येते.  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा उत्सव साजरा करताना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने  मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे. यावर्षी 19 फेबुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत असतांना शिवज्योत वाहण्याकरीता 200 भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरीता 500 भाविकांना परवानगी देण्यात आली  आहे.

अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी अथवा इतर गड किल्यांवर जाऊन तारखेनुसार दिनांक 18 फेबुवारी रोजीच्या मध्यरात्री  12 वाजता एकत्र  येतात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करतात. यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठया प्रमाणात  एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती  साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

प्रभात फेरीबाईक रॅली अथवा मिरवणुक काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्याठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.

छत्रपती शिवाजी महाराज  जयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरेरक्तदानआयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोनामलेरियाडेग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम मास्कसॅनिटायझर इक्यादी पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

कोविड-19 च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनवर्सनआरोग्यपर्यावरणवैद्यकियशिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिसप्रशासनस्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्धी झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, अशा सूचना शासनाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे निर्गमित केल्या आहेत.

000000

 पीसीपीएनटी बैठकीचे 17 फेबुवारीला आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-   पीसीपीएनटी कायदा 1944 च्या राज्य पर्यवेक्षक मंडळाच्या अशासकीय सदस्यांची बैठकीचे आयोजन गुरूवार दिनांक 17 फेबुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. 

या बैठकीमध्ये अशासकीय सदस्या डॉ.आशा मिरगे, वैशाली मोटे या राज्यातील मुलींचे जन्मात व लिंग गुणोत्तरात सुधारणा होण्याच्या दृष्टिने  बैकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे.असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.आय भोसीकर यांनी प्रसिध्दी  पत्रकाव्दारे माहिती दिली आहे.

0000000

 राष्ट्रीय लोकअदालतीचे 12 मार्चला आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-   महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार दिनांक 12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये तसेच कौटुंबिक, कामगार व सहकार न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.एस.रोटे यांनी  केले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील मुख्यालयासह   सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये लोक अदालतीचे आयोजन असून यामध्ये  न्यायालयील दिवाणी, फौजदारी,एनआय.ॲक्टची प्रकरणे,बँकेची कर्ज वसुली  प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे,कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, इलेक्टीसीटी ॲक्टची समझोता प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी त्यांची प्रलंबित अथवा दाखल पूर्ण प्रकरणे या लोक अदालतीमध्ये असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी प्राधिकरण कार्यालय तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. 

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व सन्मानीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी,भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग असणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोठ्या संख्येने प्रकरणाची तडजोड होण्यासाठी पक्षकार व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे  सहभागी होवून प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे  सचिव  आर.एस.रोटे  यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...