सहकारी
संस्थांच्या निवडणुकांसाठी संकेतस्थळ कार्यान्वित
·
संकेतस्थळावरील
सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड, (जिमाका) दि. 20 :- राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मतदार याद्यांचे अधीक्षण, निर्देशन, नियंत्रण करणे व सहकारी संस्थांच्या निवडणुका चांगल्यारितीने पार पाडण्यासाठी https://scea.maharashtra.gov.in/ हे संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (250 सभासद व त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था), सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्याचे निवडणूक कामकाजाचे संनियंत्र प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. https://scea.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर सहकारी संस्था आणि कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सभासद, निवडणूक कामकाजाची विविध टप्यांची माहिती, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची संरचना, निवडणुकांची कार्यपद्धती, त्यासंबंधित अद्यावत कायदे व नियम, हस्त पुस्तिका, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी / तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांची संपर्क यादीसह अन्य उपयुक्त माहिती सुलभरितीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या संकेतस्थळाचा नांदेड जिल्ह्यातील सर्व सहकारी
संस्था, कृषि उत्पन्न बाजार समित्या, सभासद आणि पदाधिकारी / कर्मचारी यांना कार्यान्वित
केलेल्या https://scea.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरील सुविधेचा लाभ होणार आहे. या संकेतस्थळास राज्य सहकारी
निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्याशी संबंधित सहकार आयुक्त व निबंधक, साखर आयुक्त, पणन
संचालक, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त, वस्त्रोद्योग आयुक्त, गृहनिर्माण विभाग, यांच्या
संकेतस्थळाची लिंक देखील उपलब्ध आहे. त्यामुळे संबंधित कामांसाठी नागरिक, सहकारी
संस्था व त्यांचे सभासद यांनी या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन नांदेडचे जिल्हा
सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी
केले आहे.
000000