Thursday, January 21, 2021

 

सरपंच पदाचे आरक्षण सोडत

28 व 29 जानेवारीला होणार

नांदेड (जिमाका) दि. 21 :- नांदेड जिल्ह्यातील नांदेड, भोकर, हदगाव, किनवट, धर्माबाद, बिलोली, देगलूर व कंधार या तालुक्याचे सरपंच पदाचे आरक्षण कार्यक्रम गुरुवार 28 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. तसेच अर्धापूर, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, उमरी, नायगाव खै., मुखेड व लोहा या तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण कार्यक्रम शुक्रवार 29 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. सर्व संबंधित तालुका मुख्यालयी होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) शरद मंडलीक यांनी दिली आहे.   

0000

 

भोकर तालुक्यातील 194 कोटीच्या विविध विकास कामांचे

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- भोकर शहरातील व तालुक्यातील 194 कोटीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत 22 जानेवारी 2021 रोजी करण्यात येणार आहे. 

भोकर तालुक्यातील विविध विकास कामे लवकर पूर्णत्वास यावे याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 4 वाजता भोकर येथील मोंढा मैदानावर जाहीर कार्यक्रमाद्वारे होईल. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जि.प. कृषी पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, हरिहरराव भोसीकर, दत्ताभाऊ कोकाटे, जि. प. गटनेता प्रकाश भोसीकर, माजी सभापती नागनाथ घिसेवाड, पं.स. सभापती निता रावलोड, कृउबा संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

विविध विकास कामांचे भूमिपूजन

हादगाव ,तामसा, भोकर, उमरी, कारेगाव, लोहगाव, रस्त्याचे पेवर शोल्ड सह दुपदरीकरण करणे, भोकर मधील विश्रामग्रहाचे बांधकाम, मुदखेड भोकर रस्ता 161 (अ) सुधारणा करणे, भोकर शहरासाठी वळण मार्गाचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, भोकर येथे 1800 मे. टन क्षमतेच्या नवीन शासकीय धान्य गोदामाचे बांधकाम, भोकर नगर परिषद विविध विकास योजने अंतर्गत विकास कामे, अशा विविध विकासकामांचा शुभारंभ सायंकाळी 4 वा. मोंढा मैदान भोकर येथे जाहीर स्वरूपात ठेवला आहे.

00000

 

आसना पूल रुंदीकरणाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- नांदेड- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आसना नदीवर कार्यान्वित असलेल्या दोन पूलांपैकी एक पूल नादुरुस्त असल्यामुळे या ठिकाणी वारंवार होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लागावा याकडे विशेष लक्ष पूरवित राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी या कामास मंजुरी दिली. या नव्याने मंजूर करण्यात आलेल्या पूल दुरुस्ती व रूंदीकरण कामाचे भूमीपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्या दि.22 जानेवारी रोजी भूमिपूजन समारंभ होणार आहे. 

361 राष्ट्रीय महामार्गावरील नांदेड-अर्धापूर दरम्यानच्या आसना नदीवर गुरु त्ता गद्दीच्या निमित्ताने नवीन पूलाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर जूना पुल वाहतूकीसाठी जवळ जवळ बंद करण्यात आला होता. एकाच पूलावरून येणार्‍या व जाणार्‍या वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल राज्य शासनाकडून दुरुस्ती व रूंदीकरणासाठी मंजूर करुन घेतला आहे. 

दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता हा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी नांदेड उत्तरचे आ.बालाजीराव कल्याणकर, विधान परिषद प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिणचे आ.मोहनअण्णा हंबर्डे, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ.मोहिनीताई येवनकर, उपमहापौर मसूद अहेमद खान, गोविंदराव शिंदे नागेलीकर, हरिहरराव भोसीकर,  दत्ता कोकाटे, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

00000

 

  24 कोरोना बाधितांची भर तर       

26 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 21 :- गुरुवार 21 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 24 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 9 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 26 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 936 अहवालापैकी 910 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 184 एवढी झाली असून यातील 21 हजार 175 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 326 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 9 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 580 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14, खाजगी रुग्णालय 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, देगलूर कोविड रुग्णालय 2 असे एकूण 26 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 9, हदगाव तालुक्यात 1, परभणी 2, नांदेड ग्रामीण 1, माहूर 1, हिंगोली 1 असे एकुण 15 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 7, हिंगोली 1, किनवट 1 असे एकुण 9 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 326 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 16, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 25, मुखेड कोविड रुग्णालय 16, महसूल कोविड केअर सेंटर 11, किनवट कोविड रुग्णालय 4, देगलूर कोविड रुग्णालय 6, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 150, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 53, खाजगी रुग्णालय 28 आहेत.   

गुरुवार 21 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 168, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 74 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 98 हजार 013

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 71 हजार 630

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 184

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 175

एकुण मृत्यू संख्या-580

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-326

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-9.          

00000

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका) दि. 21 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

शुक्रवार 22 जानेवारी 2021 मुंबई येथून विमानाने सकाळी 10.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वा. राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वरील नांदेड शहरास जोडणाऱ्या आसना नदीवरील जुन्या पुलाची पूर्नबांधणी व रुंदीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ आसना ब्रीज नांदेड. दुपारी 2.30 ते 4.30 या दरम्यान हदगाव-तामसा-भोकर-उमरी-लोहगाव रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. शासकीय विश्रामगृह भोकर येथील इमारतीच्या बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. भोकर-मुदखेड रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. भोकर नगरपरिषद अंतर्गत 12 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. प्रस्तावित भोकर वळण मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. आयटीआय प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. नवीन शासकीय धान्य गोदामाचे बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.30 ते 6.30 यावेळेत सभा स्थळ मोंढा मैदान भोकर. 

शनिवार 23 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयअंतर्गत दिव्यांगजन निशुल्क सहाय्यक उपकरण वितरण आणि सामाजिक अधिकारिता शिबिर स्थळ- ओम गार्डन नांदेड. दुपारी 2 वा. पोलीस विभागातील विविध विषयाबाबत बैठकीस उपस्थिती स्थळ- आयजी ऑफिस कार्यालय नांदेड. दुपारी 3 वा. जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक स्थळ- नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सायं. 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस उपस्थिती स्थळ- नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सायं. 7 वा. दैनिक गोदातीर समाचारच्या हिरक महोत्सव वर्षातील पर्दापण दिनानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- हॉटेल विसावा शिवाजीनगर नांदेड.

 

रविवार 24 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत धर्माबाद येथील रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. धर्माबाद येथील वळण रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. धर्माबाद येथील तालुका क्रीडा संकुलनाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. मुलींच्या वसतीगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 ते 2 या वेळेत सभा स्थळ- जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे मैदान धर्माबाद. दुपारी 3.30 ते 4 वाजेपर्यंत उमरी वळण रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती व उमरी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.30 ते 6 यावेळेत उमरी तालुका शहर कॉग्रेस कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- मोंढा मैदान उमरी. 

सोमवार 25 जानेवारी 2021 रोजी दुपारी 2.30 वा. दिव्यांग निधीबाबत बैठकीस उपस्थिती स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 3.30 वा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती स्थळ- नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. 

मंगळवार 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9.15 वा. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थिती स्थळ- पोलीस मुख्यालय प्रांगण नांदेड. सकाळी 10 वा. विकेल ते पिकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान शेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळाव्यास उपस्थिती स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड. सकाळी 10.30 वा. नरहर कुरुंदकर पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- कुसूम सभागृह नांदेड. दुपारी 12.30 वा. नांदेड विश्रामगृह इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास व सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग नांदेड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ बांधकाम भवन स्नेहनगर नांदेड. सायं 4 वा. सेतू सुविधा ॲप उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- उज्ज्वल. सायं. 6 वा. डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशनतर्फे कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- कुसूम सभागृह नांदेड. 

बुधवार 27 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.20 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...