Thursday, January 21, 2021

 

आसना पूल रुंदीकरणाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- नांदेड- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आसना नदीवर कार्यान्वित असलेल्या दोन पूलांपैकी एक पूल नादुरुस्त असल्यामुळे या ठिकाणी वारंवार होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लागावा याकडे विशेष लक्ष पूरवित राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी या कामास मंजुरी दिली. या नव्याने मंजूर करण्यात आलेल्या पूल दुरुस्ती व रूंदीकरण कामाचे भूमीपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्या दि.22 जानेवारी रोजी भूमिपूजन समारंभ होणार आहे. 

361 राष्ट्रीय महामार्गावरील नांदेड-अर्धापूर दरम्यानच्या आसना नदीवर गुरु त्ता गद्दीच्या निमित्ताने नवीन पूलाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर जूना पुल वाहतूकीसाठी जवळ जवळ बंद करण्यात आला होता. एकाच पूलावरून येणार्‍या व जाणार्‍या वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल राज्य शासनाकडून दुरुस्ती व रूंदीकरणासाठी मंजूर करुन घेतला आहे. 

दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता हा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी नांदेड उत्तरचे आ.बालाजीराव कल्याणकर, विधान परिषद प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिणचे आ.मोहनअण्णा हंबर्डे, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ.मोहिनीताई येवनकर, उपमहापौर मसूद अहेमद खान, गोविंदराव शिंदे नागेलीकर, हरिहरराव भोसीकर,  दत्ता कोकाटे, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...