Tuesday, April 3, 2018


मतदारांना मतदानासाठी 6 एप्रिलला सुट्टी
नांदेड दि. 3 :-  कुंडलवाडी नगरपरिषद पोटनिवडणूक-2018 व पंचायत समिती बिलोली अंतर्गत सगरोळी गण व पंचायत समिती लोहा अंतर्गत मारतळा गण पोटनिवडणूकीसाठी शुक्रवार 6 एप्रिल 2018 रोजी मतदानाच्‍या दिवशी शासनाने भरपगारी सुट्टी जाहिर केली आहे. ही सुट्टी निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्‍त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्‍यांना लागू राहील.
सदर सुट्टी उद्यो, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्‍थापना, कारखाने, दुकाने इत्‍यादींना लागू राहील (उदा. खाजगी कंपन्‍या यामधील आस्‍थापना, सर्व दुकाने व इतर आस्‍थापना, निवासी हॉटेल, खादयगृहे, अन्‍य गृहे, नाटय गृहे, व्‍यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्‍थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्‍या शॉपींग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ), असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000




स्पर्धा परीक्षा शिबिराचे 5 ऐवजी 6 एप्रिलला आयोजन
अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, भुगोल, रेल्वे परीक्षा
या विषयावर धनंजय आकांत यांचे मार्गदर्शन  
नांदेड दि. 3 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेंतर्गत शुक्रवार 6 एप्रिल 2018 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, गोल आणि रेल्वे परक्षा या विषयावर औरंगाबाद येथील धनंजय आकांत हे मार्गदर्शन करणार आहेत.   
जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड मनपा जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने गुरुवार 5 एप्रिल ऐवजी शुक्रवार 6 एप्रिल रोजी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षस्थेखाली संपन्न होणाऱ्या या शिबिरास अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिराउपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
00000


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
पुरस्कारासाठी प्रस्तावाची 13 एप्रिल मुदत  
            नांदेड, दि. 3 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सन 2017-18 या वर्षाकरिता नांदेड जिल्हयातील मातंग समाजातील  कलावंत, साहित्यिक व समाजसेवक इत्यादी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व  संस्था यांचे कडून शुक्रवार 13 एप्रिल 2018 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहे.   
या प्रस्तावासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नमस्कार चौक रोड, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड यांचे कार्यालयात विहित नमुना व आवश्यक माहिती प्राप्त करून घेवून आपला प्रस्ताव शुक्रवार 13 एप्रिल पर्यंत कार्यालयीन वेळेत तीन प्रतीत सादर करावा, असे अवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000


मतदान, मतमोजणी
केंद्र परिसरात 144 कलम
नांदेड दि. 3 :- जिल्ह्यातील पंचायत समिती बिलोली 66- सगरोळी निर्वाचक गण व पंचायत समिती लोहा 83- मारतळा निर्वाचक गणाच्या निवडणुकीची संपर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने मतदानाच्या दिवशी शुक्रवार 6 एप्रिल रोजी मतदान केंद्र परिसरात व मतमोजणीच्या दिवशी शनिवार 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश लागू केला आहे.  
 या निर्वाचक गणाच्या मतदान व मतमोजणी केंद्राच्या हद्दीपासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे. या मतदान केंद्राच्या हद्दीपर्यंत 6 एप्रिल रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत तर मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत 7 एप्रिल रोजी सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात म्हटले आहे.
00000


राज्यसेवा पुर्व परीक्षा केंद्र
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 3 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पुर्व) परीक्षा-2018 परीक्षा रविवार 8 एप्रिल 2018 रोजी नांदेड शहरातील 24 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड शहरातील विविध 24 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 8 ते सायं 5 या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी 7 हजार 56 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात रविवार 8 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.
000000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...