Thursday, July 4, 2019


वृक्षारोपणाची मोहिम जलदगतीने राबवा
औरंगाबाद, दि.4, (विमाका) :- पर्यावरणाच्या रक्षणाकरीता दि.1 जुलै 2019 पासून शासनाने 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत शासकीय यंत्रणेसह लोकांचासुध्दा सहभाग आहे. वृक्षरोपणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वृक्षारोपणाच्या मोहिमेला सर्वांनी गती द्यावी. ज्याठिकाणी वृक्षारोपण योग्य पाऊस झाला असेल (जमिनीमध्ये 20 सें.मी. ते 30 सें.मी.ओलावा असेल) अशा ठिकाणी त्वरीत लागवड कामे सुरू करावीत. यासाठी संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी यांनी वेळोवेळी लागवड कामांचा आढावा घेऊन संबंधीतांचे अडचणींचे निराकरण करावे आपल्या औरंगाबाद महसूल विभागातील वृक्षारोपण कामे गतिमान पध्दतीने आघाडीवर नेऊन उद्दिष्ट यशस्विरित्या पुर्ण करावे, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने कळविले आहे. 
*****

पालकमंत्री रामदास कदम यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची शनिवारी बैठक



नांदेड, दि. 4 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांचे अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवार 6 जुलै 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवनाच्या मुख्य सभागृहात सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीस जिल्ह्यातील सर्व सन्माननिय खासदार, आमदार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...