Sunday, June 1, 2025

 वृत्त क्रमांक 559

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड दि. 1 जून  :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 2 जून 2025 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे.  

या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर  यांनी दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक 558

अन्न व औषध प्रशासन मंत्री 

नरहरी झिरवाळ यांचा दौरा 

नांदेड दि. 1 जून :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे 2 जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 1 जून 2025 रोजी नाशिक येथून रात्री 7.55 वा. नंदीग्राम एक्सप्रेसने सहस्त्रकुंड जि. नांदेडकडे प्रयाण. सोमवार 2 जून 2025 रोजी सकाळी 7 वा. सहस्त्रकुंड जि. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व इस्लामपुर शासकीय विश्रामगृह कडे प्रयाण व राखीव. सकाळी 8 वा. शासकीय विश्रामगृह इस्लामपूर येथून सहस्त्रकुंड धबधबा कडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. सहस्त्रकुंड धबधबा नांदेड येथे शेतकरी बांधवासोबत भेट व चर्चा. सकाळी 10 वा. श्रीमती भाग्यरथाबाई शेषराव मिराशे यांची कन्या चिसौका. सोनु यांचे विवाहास उपस्थिती. स्थळ- थारा ता. किनवट जि. नांदेड . सकाळी 11 वा. थारा जि. नांदेड, किनवट येथून हुडी कडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. श्री. निर्गुण कदम यांचे फार्महाऊस येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. हुडी ता. किनवट येथून नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. गुरुगोविंदसिंग गुरुद्वारा नांदेड येथे आगमन व दर्शन. दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व लोकप्रतिनिधी व विविध संघटनासमवेत चर्चा. सायं. 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून रेल्वे स्टेशन कडे प्रयाण. सायं. 6.45 वा. नांदेड येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

  वृत्त क्रमांक 557

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क ची सयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत 

नांदेड, दि. १ जून:- महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग, नवी मुंबई यांचे मार्फत महाराष्‍ट्र गट क सेवा संयूक्‍त पूर्व परीक्षा 2024 हि परीक्षा आज दिनांक 01 जून, 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत एका सत्रात नांदेड जिल्‍हयात 37 परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली. 

या परीक्षेसाठी आयोगाचे निर्देशानूसार 37 उपकेंद्रप्रमुख, 09 समन्‍वय अधिकारी, ०२ भरारी पथक, ८५ मदतनिस, १४८ पर्यवेक्षक, ४७५ समवेक्षक, ८३ शिपाई, ७१ पाणीवाला, ३७ केअरटेकर यांची नियूक्‍ती करण्‍यात आली होती.

या परीक्षेसाठी एकूण ९६२३ परीक्षार्थी पैकी ६७५३ परीक्षार्थी उपस्थित होते तर २८७० परीक्षार्थी अनूपस्थित होते. परीक्षा विनाव्‍यत्‍यय सुरळीत पणे पार पडली.

०००००

 वृत्त क्रमांक 556

१०० दिवसांच्या मुख्यमंत्री प्रशासकीय सुधारणा मोहिमेत नांदेड तालुका मराठवाड्यात प्रथम

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते तहसीलदार संजय वारकड यांचा सत्कार

नांदेड, दि. ३० :- मुख्यमंत्री 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेअंतर्गत नांदेड तालुका मराठवाड्यामध्ये प्रथम आला आहे.त्या अनुषंगाने आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, शाल,बुके देऊन तहसीलदार संजय वारकड यांचा छत्रपती संभाजी नगर येथे सत्कार करण्यात आला. 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी ,सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व अपर जिल्हाधिकारी ,सर्व निवासी उप जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी सामान्य ,उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार यांची विशेष उपस्थिती होती.

०००००




  26 जुलै #कारगिल #विजयदिवस शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र #अभिवादन...!