Saturday, February 10, 2018


महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे  आज नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल महोदयांचे महापौर श्रीमती शिलाताई भवरे यांनी स्वागत केले. याप्रसंगी खा. अशोकराव चव्हाण, आ. अमर राजूरकर,   आ. डी. पी. सावंत, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड, मनपा आयुक्त गणेश देशमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. पंडीत विद्यासागर, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे,  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी आदि उपस्थित होते.


विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांचा दौरा
नांदेड, दि. 10 :-  महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 12 फेब्रुवारी 2018 रोजी औरंगाबाद येथुन नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.10 वा. रेल्वे स्टेशन नांदेड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह येथुन मोटारीने शारदानगर सगरोळी ता. बिलोलीकडे प्रयाण. दुपारी 2 वा. शारदानगर सगरोळी येथे आगमन व कृषि विज्ञान केंद्र सगरोळी आयोजित कृषिवेद या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा व कृषि तंत्रज्ञान महोत्सव 2018 या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- बजरंग मैदान शारदानगर सगरोळी. सोईनुसार शारदानगर सगरोळी येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सायं. 5.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन मोटारीने रेल्वे स्टेशन नांदेडकडे प्रयाण. सायं 6.05 वा. रेल्वे स्टेशन येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने औरंगाबादकडे प्रयाण करतील.  
00000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  
नांदेड, दि. 10 :- जिल्ह्यात सोमवार  26 फेब्रुवारी 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 फेब्रुवारी 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


केळी पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 10 :-  केळी पिकाच्या अपरिपक्कव केळावर छोटे लालसर ठिपके खालील भागावर आढळून येत असल्यास 10 - 15 फुलकिडे /  प्रति झाड आहेत, असे समजून व्हर्टीसोलियम लेकॉनी ( 2X108CFU/g) 3 ग्रॅम / लि. + स्टीकर 1 मिली / लि. किंवा निमार्क 5 टक्के फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...