Sunday, May 4, 2025
वृत्त क्रमांक 469
जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून
डिजिटल माध्यमातून प्रचार प्रसिद्धीसाठी योग्य डेटा (माहिती) असणे आवश्यक असून जाहिरात प्रकियेत डेटा केंद्रबिंदू आहे. कोणत्याही प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा असणे महत्त्वाचे आहे. अचूक डेटा मिळविण्यासाठी शोध घेणे, योग्य नियोजन, योजना आणि मूल्यमापन आवश्यक आहे, असे ग्रुप एम साऊथ एशियाचे मुख्य धोरण अधिकारी एम. ए. पार्थसारथी यांनी सांगितले.
समाजमाध्यमांतील इनफ्लुएंसर्सने स्वतःची खरी ओळख जपणे गरजेचे असल्याचे मत ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.
वृत्त क्रमांक 468
धाबा व सार्वजनिक ठिकाणी
अवैधपणे मद्यसेवन करणाऱ्यांवर कारवाई
नांदेड दि. 4 मे :- महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68, 84 व 85 अन्वये जिल्ह्यातील 35 धाब्यावरील 35 धाबाचालक, मालक, धाब्यावर अवैधपणे 116 मद्यपींवर व अनधिकृतरित्या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या 21 मद्यपींवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नुकतीच कारवाई करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, राज्य उत्पादन शुल्कचे नांदेड विभागीय उपआयुक्त बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड रा.उ.शु. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यकारी, भरारी पथकाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी 23 एप्रिल 2025 ते 3 मे 2025 या काळात केलेल्या कारवाईत 35 धाब्यामध्ये विनापरवाना तेथे येणाऱ्या ग्राहकांना मद्यसेवनास अवैध परवानगी देत असलेल्या धाब्यावर दारुबंदी गुन्हेकामी छापा घातला असता एकूण 116 ग्राहकांना मद्य पिण्याचे परवानगी दिल्याचे आढळून आल्याने या ठिकाणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 व 84 अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली.
अनधिकृतरित्या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या इसमांविरुद्ध 3 मे 2025 रोजी निरीक्षक, विभागीय भरारी पथक, निरीक्षक नांदेड शहर व निरीक्षक भरारी पथक यांनी शेतकरीपुतळा परिसर, अशोकनगर, वर्कशॉप कॉर्नर परिसर, लातूरफाटा परिसर, जुनामोंढा परिसर व शिवाजीनगर परिसर येथे विशेष मोहिम घेण्यात आली होती. यात एकुण 21 इसमावर 3 मे 2025 रोजी महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे 85 अंतर्गत कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व निरीक्षक, दु.नि., स.दु.नि. जवान, जवान-नि-वाहन चालक यांनी कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली.
अधीक्षक अतुल कानडे यांचे आवाहन
महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (क), (ख) अन्वये अवैध हॉटेल,धाबा,क्लब इत्यादी चालक मालक यांनी अवैध हॉटेल, धाबा, क्लब इत्यादीमध्ये शासनमान्य अनुज्ञप्ती नसताना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास त्यांना 3 ते 5 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा 25 ते 50 हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही होवू शकते.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 84 अन्वये एखादी ग्राहक, व्यक्तीने अवैध हॉटेल, धाबा, क्लब इत्यादी ठिकाणी मद्यप्राशन केल्यास त्यांना 5 हजार रुपयापर्यंत दंड होवू शकतो. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 85 अन्वये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन केल्यास त्यांना 6 महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा आणि 10 हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकते. नागरीकांना कुठल्याही अवैध ढाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारु पितांना आढळून आल्यास ढाबा मालकासह मद्यसेवन करणाऱ्या इसमाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 506 शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत विभाग स्तरावर जिल्ह्यातील 6 कार्यालयांना प्रथम क्रमांक द्वितीय क्...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
-
वृत्त क्र. 1 47 नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी नांदेड दि. ४ फेब्रुवारी : सिडकोचे उपाध्यक्ष व व्य...