Friday, November 4, 2016

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आज आयोजन
नांदेड, दि. 4 :-  ज्ज्वल नांदेड या मोहिमेअतंर्गत  राबविण्यात येत असलेल्या दरमहा 5 तारखेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शनिवार 5 नोव्हेंबर 2016 रोजी सायंकाळी 5 वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
            जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने होणा-या या शिबिराचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी हे राहणार अस वैभव हिंगमिरे, आर.बी.आय. अधिकारी पुणे यांचे र्थशास्त्र या विषयावर व्याख्यान होईल. मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांचीही याप्रसंगी उपस्थिती राहणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचे वतीने करण्यात येत आहे.

000000
निवडणूक प्रचाराच्या
वाहन परवानगीसाठी आरटीओचे आवाहन
नांदेड, दि. 4 :- विधानपरिषद, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी वाहनांवर विविध पक्षाचे ध्वज, जाहिराती लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडकडून परवानगी देण्यात येते. याबाबत रितसर अर्ज व शुल्क भरणा केल्यास त्वरीत परवानगी देण्यात येईल. संबंधितानी याची नोंद घ्यावी. विनापरवानगी निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
विधानपरिषद निवडणुकीतून
एका उमेदवाराकडून अर्ज मागे
नांदेड, दि. 4 :- महाराष्ट्र विधान परिषद, नांदेड स्थानीक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2016  साठी वैध ठरलेल्या तीन उमेदवारांपैकी एका उमेदवाराने आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड जिल्हा स्थानीक प्राधिकारी मतदारसंघ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
 वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांमध्ये  अमरनाथ अनंतराव राजूकर (इंडियन नॅशनल काँग्रेस), गजानन श्रीराम पवार (अपक्ष), शिंदे शामसुंदर दगडोजी (अपक्ष) यांचा समावेश होता.  त्यापैकी गजानन श्रीराम पवार (अपक्ष ) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज  मागे घेतला. निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शनिवार 5 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. 

0000000
हातमाग कापडाच्या खरेदीसाठी
स्पेशल हॅण्डलूम एक्सपो-2016ची पर्वणी
प्रदर्शन 10 नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले
नांदेड, दि. 4 :- केंद्र शासनाच्या सीएचडीएस योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्यावतीने राज्य हातमाग महामंडळ नागपूर यांनी नांदेड येथे स्पेशल हॅण्डलूम एक्सपो-2016 चे आयोजन केले आहे. विमानतळ रोड सौभद्र मंगल कार्यालय येथे आयोजित हे भव्य प्रदर्शन 10 नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात हातमागावरील पारंपारिक कापड खरेदीची पर्वणी उपलब्ध झाली आहे. यामध्ये खरेदीवर 20 टक्क्यांपर्यंत सूटही देण्यात येत असल्याची माहिती हातमाग महामंडळाच्या प्रदर्शन आयोजकांनी दिली आहे.
पारंपारिक हातमागावरील पण आधुनिक शैलीला साजेसे कापड या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. यामध्ये टसर, सिल्क, कॅाटन, सहावार प्रिंटेड साड्या, ड्रेसमटेरीलय, बेडशीट, चादर, टॅावेल, नॅपकीन्स, जॅकेटसं, इंडिया हॅण्डलूम उत्पादने, दरी, सतरंजी, पोछा यांच्यासह तयार शर्टस, शर्टींग-सुटींग यांच्यासाठीचे कापड आदी वैविध्यपुर्ण प्रकार उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादी तसेच हातमाग कारागिरांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हातमागावरील विविध वस्त्रप्रावरणांच्या खरेदीचे आवाहन केले आहे. त्यानुसार या प्रदर्शनात पुर्ण सूती कापड आणि त्याचे प्रकार कुटुंबातील प्रत्येकासाठी उपलब्ध असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. हे प्रदर्शन सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यातील खादी, सूती कापड प्रेमी तसेच हातमाग कारागिरांना-उद्योगाला प्रोत्साहन देऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्यासाठी नागरिकांनी कुटुंबासह भेट द्यावी, असे आवाहन विपणन अधिकारी तथा या प्रदर्शन प्रमुख ज्ञानदेव बाभुळकर यांनी केले आहे.

0000000
हॅाकीच्या प्रचार-प्रसारासाठी प्रेरणादायी खेळ करा
- जिल्हाधिकारी काकाणी
राज्यस्तरीय शालेय हॅाकी क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन
नांदेड , दि. 4 :-  हॅाकी हा राष्ट्रीय खेळ आहे. त्यामुळे या राज्यस्तरीय स्पर्धेतून इतरांनाही प्रेरणा घ्यावी, असे क्रिडा प्रदर्शन करा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे व्यक्त केली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित राज्यस्तर शालेय हॅाकी क्रीडा स्पर्धा-2016-17चे आज येथे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते उद्घाटन झाले , त्याप्रसंगी ते बोलत होते. 
राज्यस्तरीय शालेय हॉकी क्रिडा स्पर्धा 2016-17 चे यजमान पद नांदेड जिल्ह्यास मिळाले आहे. सतरा वर्षाखालील मुला-मुलींच्या गटातील या स्पर्धा 6 नोव्हेंबर 2016 पर्यंत खालसा हायस्कूल मैदानावर होत आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संत बाबा बलविंदरसिंघजी, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, महाराष्ट्र राज्य क्रिडा परिषदेचे सदस्य लड्डुसिंग महाजन, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रामलू पारे, मैदान व्यवस्थापक प्रा. डॉ. बळीराम लाड, दृष्ट दमन शिरोमणी क्रिडा युवक मंडळाचे सचिव हरविंदरसिंघ कपूर , खालसा हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. चांदसिंघ, मैदान व्यवस्थापक रमेश चौरे, जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक ठाणसिंग बुंगई, निवड समितीचे सदस्य उमेश बडवे, उदय पवार, अजीज सय्यद शेख जमीर आदींची उपस्थिती होती.
स्पर्धेत राज्यातील 18 संघ सहभागी झाले आहेत, ज्यामध्ये मुला, मुलींचे प्रत्येकी नऊ संघ आहेत. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, हॅाकी हा राष्ट्रीय खेळ आहे. त्याच्या प्रचार-प्रसारात मागे राहता कामा नये. त्यादृष्टीने या खेळाच्या प्रचार-प्रसाराच्या दृष्टीने आजच्या स्पर्धा महत्त्वपुर्ण आहेत. इतरांनीही या खेळाची प्रेरणा घ्यावी, यासाठी खेळाडूनी प्रयत्न करावे, तसे क्रिडा प्रदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले.
सुरवातीला जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. यादव यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर हॅाकी राष्ट्रीय खेळाडू मनप्रीतकौर मोहनसिंघ घूमान हिच्या हस्ते क्रिडाज्योत प्रज्ज्वलित करून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. स्पर्धा संयोजनात जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाचे मारूती सोनकांबळे, प्रवीण कोंडेकर, अनिल दंडेल, सय्यद साजिद, शिवकांता देशमुख यांचाही समावेश आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...