Friday, November 4, 2016

हॅाकीच्या प्रचार-प्रसारासाठी प्रेरणादायी खेळ करा
- जिल्हाधिकारी काकाणी
राज्यस्तरीय शालेय हॅाकी क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन
नांदेड , दि. 4 :-  हॅाकी हा राष्ट्रीय खेळ आहे. त्यामुळे या राज्यस्तरीय स्पर्धेतून इतरांनाही प्रेरणा घ्यावी, असे क्रिडा प्रदर्शन करा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे व्यक्त केली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित राज्यस्तर शालेय हॅाकी क्रीडा स्पर्धा-2016-17चे आज येथे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते उद्घाटन झाले , त्याप्रसंगी ते बोलत होते. 
राज्यस्तरीय शालेय हॉकी क्रिडा स्पर्धा 2016-17 चे यजमान पद नांदेड जिल्ह्यास मिळाले आहे. सतरा वर्षाखालील मुला-मुलींच्या गटातील या स्पर्धा 6 नोव्हेंबर 2016 पर्यंत खालसा हायस्कूल मैदानावर होत आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संत बाबा बलविंदरसिंघजी, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, महाराष्ट्र राज्य क्रिडा परिषदेचे सदस्य लड्डुसिंग महाजन, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रामलू पारे, मैदान व्यवस्थापक प्रा. डॉ. बळीराम लाड, दृष्ट दमन शिरोमणी क्रिडा युवक मंडळाचे सचिव हरविंदरसिंघ कपूर , खालसा हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. चांदसिंघ, मैदान व्यवस्थापक रमेश चौरे, जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक ठाणसिंग बुंगई, निवड समितीचे सदस्य उमेश बडवे, उदय पवार, अजीज सय्यद शेख जमीर आदींची उपस्थिती होती.
स्पर्धेत राज्यातील 18 संघ सहभागी झाले आहेत, ज्यामध्ये मुला, मुलींचे प्रत्येकी नऊ संघ आहेत. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, हॅाकी हा राष्ट्रीय खेळ आहे. त्याच्या प्रचार-प्रसारात मागे राहता कामा नये. त्यादृष्टीने या खेळाच्या प्रचार-प्रसाराच्या दृष्टीने आजच्या स्पर्धा महत्त्वपुर्ण आहेत. इतरांनीही या खेळाची प्रेरणा घ्यावी, यासाठी खेळाडूनी प्रयत्न करावे, तसे क्रिडा प्रदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले.
सुरवातीला जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. यादव यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर हॅाकी राष्ट्रीय खेळाडू मनप्रीतकौर मोहनसिंघ घूमान हिच्या हस्ते क्रिडाज्योत प्रज्ज्वलित करून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. स्पर्धा संयोजनात जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाचे मारूती सोनकांबळे, प्रवीण कोंडेकर, अनिल दंडेल, सय्यद साजिद, शिवकांता देशमुख यांचाही समावेश आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...