Sunday, July 1, 2018


जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ
नागरिकांनी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग नोंदवावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड दि. 1:- नागरिकांनी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे  आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
राज्यात 1 जुलै ते 31 जुलै 2018 या कालावधीत होणाऱ्या 13 कोटी वृक्ष कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय 3 लाख 42 हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ हदगाव तालुक्यातील अंबाळा येथील राखीव वन कक्ष क्र. 493 येथे झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते. उद्घाटक म्हणून आ. नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी वृक्षारोपण केले.  

यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, सहायक वनसंरक्षक डी. एस. पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते. तर पंचायत समिती सभापती सुनिताताई दवणे, तहसिलदार संदीप कुलकर्णी, पोलीस निरीक्षक डी. के. चौरे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव सावतकर, पंचायत समिती सदस्य लताताई निळे, आंबाळाचे सरपंच सौ. जयश्री पवार, हदगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) शरयु रुद्रावार, सौ. सुषमा मोतेवार, अंबाळा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांचीही उपस्थिती होती.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा  सत्कार पिंपळाचे वृक्ष देवून करण्यात आला.   
वायफणी ता. माहूर येथे जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या वृक्षारोपण
वायफणी ता. माहूर येथे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार प्रदीप नाईक, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती श्रीमती निलाबाई राठोड, जि.प. सदस्य विशाल जाधव, माहूर तहसीलदार सिध्देश्वर वरणगावकर, किनवट सहा. वनसरंक्षक डॉ. राजेंद्र नाठे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मेघराज जाधव आदि. प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा प्रारंभ करण्यात आला.
****


13 कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ
नेरलीचे नंदनवन ऑक्सीजन पार्क बनले पाहिजे यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत
                                                                --- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 1:- मराठवाडा लोकसेवा मंडळ नंदनवन नेरली ऑक्सीजन पार्क बनले पाहिजे, या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.  
राज्यात 1 जुलै ते 31 जुलै 2018 या कालावधीत होणाऱ्या 13 कोटी वृक्ष कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय शुभारंभ आज करण्यात आला.  महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्प पुर्तीस निमित्त मराठवाडा लोकसेवा मंडळ नंदनवन नेरली,वन व सामाजिक वनीकरण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नंदनवन नेरली येथे 5 हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते संपन्न झाला.
 यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, वनसंरक्षक आशिष ठाकरे, सौ. अजंली डोंगरे, डॉ सुनील कदम, डॉ. हंसराज वैद्य, डॉ शीला कदम, विजय मालपाणी, अरविंद नरसीकर, डॉ. बजाज, विविध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थित होती.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले की, वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबी गांभिर्याने घेत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामार्फत व जनेतेच्या सहभागातून वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.  तसेच नागरिकांना वृक्ष लागवडीबाबतही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आवाहन केले.
तसेच व लोकसहभागतून तयार करण्यात येत असलेल्या तलावाची यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पाहणी केली . यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले की, पावसाचे पाणी तलावात साठविल्याने येथील 5 हजार वृक्षांना पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी माहेश्वरी व अग्रवाल महिला मंडळाच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे तुळशीचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला.

****

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...